व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाचा हाच उद्देश होता का?

देवाचा हाच उद्देश होता का?

कोणतेही बातमीपत्र वाचा. टीव्ही पाहा किंवा रेडिओ ऐका. गुन्हेगारी, युद्धे दहशतवाद याच बातम्या तुम्हाला पाहायला किंवा ऐकायला मिळतील. शिवाय, तुमच्या स्वतःच्या जीवनातल्या समस्यांचा विचार करा. एखाद्या आजारपणामुळे किंवा आपल्या प्रिय व्यक्तीच्या मृत्यूमुळे कदाचित तुम्ही अत्यंत दुःखी असाल. ईयोब नावाच्या एका सद्‌गृहस्थाला जसे वाटले तसे तुम्हालाही कदाचित वाटत असेल; त्याने म्हटले, मी “विफलतेने भरून गेलो आहे.”​—ईयोब १०:​१५, सुबोध भाषांतर.

स्वतःला विचारा:

  • माझ्याबद्दल आणि बाकीच्या मानवजातीबद्दल देवाने हेच उद्देशिले होते का?

  • माझ्या समस्यांवर मात करण्यासाठी मला कोठून मदत मिळू शकेल?

  • पृथ्वीवर कधी शांती येईल अशी खरच आपण आशा बाळगू शकतो का?

बायबल या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देते.

देव पृथ्वीवर पुढील बदल घडवून आणणार आहे, असे बायबल शिकवते.

“तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत.”​—प्रकटीकरण २१:४.

“लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील.”​—यशया ३५:६.

“अंधांचे नेत्र उघडतील.”​—यशया ३५:५.

“कबरेतील सर्व माणसे . . . बाहेर येतील.”​—योहान ५:२८, २९.

“मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”​—यशया ३३:२४.

‘पृथ्वीवर भरपूर धान्य होईल.’​—स्तोत्र ७२:​१६, पं.र.भा.

बायबलच्या शिकवणीतून लाभ मिळवा

मागील पानांवरील माहिती पाहून, हे केवळ स्वप्न आहे, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. देवाने या सर्व गोष्टी वास्तवात उतरवण्याचे वचन दिले आहे आणि हे तो कसे करेल त्याविषयी बायबल आपल्याला सांगते.

पण बायबलचा आपल्याला इतर गोष्टींतही लाभ होऊ शकतो. आपण बायबलच्या शिकवणुकींचे पालन केल्यास सध्याचे जीवनही खरोखर समाधानकारक बनू शकते. थोडे थांबून आपल्या स्वतःच्या चिंतांचा आणि त्रासांचा विचार करा. यात, पैशांची चणचण, कौटुंबिक समस्या, आजारपण किंवा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू यांचा समावेश असेल. बायबल तुम्हाला आजच्या समस्यांवर मात करण्यास लागणारी मदत देऊ शकते आणि आपल्या मनात डोकावणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देऊन आपले समाधान करू शकते. जसे की:

  • आपल्याला दुःख का सहन करावे लागते?

  • आपण जीवनाच्या चिंतांचा सामना कसा करू शकतो?

  • आपण आपले कौटुंबिक जीवन सुखी कसे बनवू शकतो?

  • मृत्यूनंतर माणसाचे अस्तित्व राहते का?

  • मृत्यू पावलेल्या आपल्या प्रियजनांना आपण पुन्हा भेटू का?

  • भविष्यासाठी देवाने दिलेली अभिवचने तो पूर्ण करेल याची आपण शाश्वती कशी बाळगू शकतो?

तुम्ही हे पुस्तक वाचायला घेतले आहे याचाच अर्थ तुम्ही, बायबल जे शिकवते ते जाणून घेऊ इच्छिता. हे पुस्तक निश्‍चितच तुम्हाला मदत करेल. पृष्ठाच्या खालील भागात प्रत्येक परिच्छेदावर प्रश्न दिले आहेत. यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलविषयी चर्चा करताना लाखो लोकांना अशी प्रश्नोत्तराने चर्चा करण्याची पद्धत आवडली आहे. तुम्हालाही ती आवडेल अशी आम्ही आशा बाळगतो. बायबल नेमके काय शिकवते हे शिकून घेण्याचा, आनंदविणारा व संतृप्त करणारा अनुभव तुम्ही घेत असताना देवाचा आशीर्वाद तुमच्यावर असो!