परिशिष्ट
प्रभूचे सांज भोजन—देवाचा आदर करणारा सण
ख्रिस्ताच्या मृत्यूचा स्मारकविधी साजरा करण्याची आज्ञा ख्रिश्चनांना देण्यात आली आहे. या सणाला “प्रभुभोजन” असेही म्हटले जाते. (१ करिंथकर ११:२०) हे प्रभुभोजन इतके महत्त्वपूर्ण का आहे? ते केव्हा आणि कसे साजरे केले पाहिजे?
सा.यु. ३३ सालच्या यहुदी वल्हांडणाच्या रात्री येशू ख्रिस्ताने या सणाची स्थापना केली. वल्हांडणाचा सण वर्षातून फक्त एकदाच, निसान महिन्याच्या १४ व्या दिवशी साजरा केला जात असे. ही तारीख काढण्यासाठी यहुदी, वसंतऋतुतील संपातदिनासाठी थांबून राहत. संपातदिनी दिवस आणि रात्र यांचा समान अवधी असतो; म्हणजे अदमासे १२ तासांचा दिवस आणि १२ तासांची रात्र. वसंत संपातदिनाच्या जवळ असलेले पहिल्या अमावस्येपासून निसान महिन्याची सुरुवात व्हायची. यानंतर १४ दिवसांनी सूर्यास्तानंतर वल्हांडण यायचा.
येशूने आपल्या प्रेषितांबरोबर वल्हांडण सण साजरा केला, यहुदी इस्कर्योतला बाहेर पाठवले आणि मग प्रभूच्या सांज भोजनाची स्थापना केली. यहुदी वल्हांडणाच्या ठिकाणी या भोजनाची सुरुवात झाली असल्यामुळे हा सण वर्षातून एकदाच साजरा केला पाहिजे.
मत्तयाचे शुभवर्तमान असा अहवाल देते: “येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यांस देऊन म्हटले, ‘घ्या, खा, हे माझे शरीर आहे;’ आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुति करून तो त्यांस दिला व म्हटले, ‘तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे मत्तय २६:२६-२८.
माझे [नव्या] कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.’”—काही जण असा विश्वास करतात, की येशूने भाकरीचे आणि द्राक्षारसाचे रुपांतर त्याचे खरोखरचे मांस आणि रक्त यांत केले. परंतु येशूने जेव्हा भाकरी दिली तेव्हा तर त्याचे शरीर पूर्णतः शाबूत होते. येशूचे प्रेषित त्याचे खरोखरचे मांस आणि रक्त पीत होते का? नाही. कारण नाहीतर ते नरभक्षण झाले असते आणि हे देवाच्या नियमाच्या विरुद्ध आहे. (उत्पत्ति ९:३, ४; लेवीय १७:१०) लूक २२:२० नुसार येशू म्हणाला: “हा प्याला माझ्या रक्तांत नवा करार आहे ते रक्त तुम्हांसाठी ओतिले जात आहे.” तो प्याला खरोखरच “नवा करार” बनला का? ते शक्य नाही, कारण करार म्हणजे मतैक्य; ते स्पर्श करता येण्यासारखी वस्तू नव्हे.
त्यामुळे, भाकरी आणि द्राक्षारस ही दोन्ही केवळ प्रतीके आहेत. भाकरी ख्रिस्ताच्या पूरिपूर्ण शरीराचे प्रतीक आहे. येशूने वल्हांडणाच्या भोजनानंतर उरलेल्या भाकरीचा उपयोग केला. ती भाकरी खमीराविना बनवण्यात आली होती. (निर्गम १२:८) बायबलमध्ये खमीराचा उपयोग, पाप किंवा भ्रष्टता सूचित करण्यासाठी देण्यात आला आहे. यास्तव, भाकरी येशूने बलिदान केलेल्या परिपूर्ण शरीराला सूचित करते. ते पापापासून मुक्त होते.—मत्तय १६:११, १२; १ करिंथकर ५:६, ७; १ पेत्र २:२२; १ योहान २:१, २.
लाल द्राक्षारस येशूच्या रक्ताला सूचित करतो. या रक्तामुळे नवीन कराराला कायदेशीर रूप मिळते. “पापांची क्षमा होण्यासाठी” आपले रक्त ओतण्यात आले आहे, असे येशूने म्हटले. अशाप्रकारे मानव देवाच्या नजरेत शुद्ध होऊ शकतात व यहोवा देवासोबत नवीन करारात प्रवेश करू शकतात. (इब्री लोकांस ९:१४; १०:१६, १७) या करारामुळे १,४४,००० विश्वासू ख्रिश्चनांना स्वर्गात जाणे शक्य होते. तेथे ते सर्व मानवजातीला आशीर्वादित करण्यासाठी राजे व याजक म्हणून सेवा करतील.—उत्पत्ति २२:१८; यिर्मया ३१:३१-३३; १ पेत्र २:९; प्रकटीकरण ५:९, १०; १४:१-३.
या स्मारकविधीतील बोधचिन्हांचे सेवन कोणी केले पाहिजे? अर्थातच, केवळ नव्या करारात असलेल्यांनीच; म्हणजे, स्वर्गात जाण्याची ज्यांना आशा आहे फक्त त्यांनीच भाकरी व द्राक्षारस यांचे सेवन केले पाहिजे. देवाचा पवित्र आत्मा अशा लोकांची खात्री पटवतो, की स्वर्गीय राजे होण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. (रोमकर ८:१६) ते येशूबरोबरच्या राज्य करारात देखील भागीदार आहेत.—लूक २२:२९.
पृथ्वीवरील परादीसमध्ये सदासर्वकाळ जगण्याची आशा असलेल्यांबद्दल काय? ते येशूच्या आज्ञेचे पालन करून प्रभूच्या सांज भोजनाला आदरपूर्वक उपस्थित राहतात परंतु बोधचिन्हांचे सेवन करत नाहीत. वर्षातून एकदा निसान १४ रोजी सूर्यास्तानंतर यहोवाचे साक्षीदार प्रभूचे सांज भोजन साजरे करतात. स्वर्गीय आशा असल्याचा दावा करणाऱ्यांची संख्या संपूर्ण जगभरात केवळ काही हजार इतकीच असली तरी, सर्व ख्रिश्चनांना हा सण मौल्यवान वाटतो. हा असा एक प्रसंग आहे जेव्हा सर्वांना, यहोवा देवाने व येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या सर्वश्रेष्ठ प्रेमावर मनन करता येते.—