व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ३ ची प्रस्तावना

भाग ३ ची प्रस्तावना

जलप्रलयानंतर काही वर्षांच्या काळात, खूप कमी लोकांनी यहोवाची विश्‍वासूपणे सेवा केली. त्यांच्याबद्दल आपल्याला बायबलमध्ये वाचायला मिळतं. त्यांच्यातला एक होता अब्राहाम. त्याला यहोवाचा मित्र म्हटलं आहे. पण त्याला यहोवाचा मित्र का म्हटलं आहे? तुम्हाला मुलं असतील तर त्यांना हे समजायला मदत करा, की यहोवा प्रत्येकावर प्रेम करतो आणि आपल्यापैकी प्रत्येकाला मदत करण्याची त्याची इच्छा आहे. अब्राहाम, लोट आणि याकोब अशा इतर विश्‍वासू जनांप्रमाणे आपणही यहोवाला न घाबरता मदत मागू शकतो. दिलेलं प्रत्येक अभिवचन यहोवा पूर्ण करेल, याची आपण खात्री बाळगू शकतो.

या विभागात

पाठ ७

बाबेलचा बुरूज

लोक एक शहर आणि स्वर्गापर्यंत पोचेल असा उंच बुरूज बांधण्याचं ठरवतात. मग अचानक देव त्यांना वेगवेगळ्या भाषा का बोलायला लावतो?

पाठ ८

अब्राहाम आणि साराने यहोवाचं ऐकलं

अब्राहाम आणि सारा ऊर शहरातलं आपलं घर सोडून कनानमध्ये भटक्यांसारखं जीवन का जगू लागले?

पाठ ९

शेवटी त्यांना एक मुलगा झाला!

अब्राहामला दिलेलं वचन देव कसं पूर्ण करणार होता? अब्राहामच्या कोणता मुलगा, इसहाक की इश्‍माएल, हे वचन पूर्ण करणार होता?

पाठ १०

लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा

देवाने सदोम आणि गमोरा शहरांवर आगीचा आणि गंधकाचा पाऊस पाडला. या शहरांचा नाश का करण्यात आला? आपण लोटच्या बायकोला आठवणीत का ठेवलं पाहिजे?

पाठ ११

विश्‍वासाची परीक्षा

देवाने अब्राहामला सांगितलं: ‘तुझ्या एकुलत्या-एका मुलाला घेऊन मोरिया इथल्या डोंगरावर जा आणि त्याला बलिदान म्हणून अर्पण कर.’ अब्राहाम या परीक्षेचा कसा सामना करणार होता?

पाठ १२

याकोबला वारसा मिळाला

इसहाक आणि रिबका यांना जुळी मुलं होतात. एसाव मोठा असल्यामुळे वारसा मिळवण्याचा खास हक्क त्याला होता. त्याने ते वाटीभर डाळीसाठी का देऊन टाकले?

पाठ १३

याकोब आणि एसावचं भांडण मिटलं

याकोबला देवदूताकडून आशीर्वाद कसा मिळाला? त्याने एसावसोबत आपलं नातं चांगलं कसं केलं?