व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ४ ची प्रस्तावना

भाग ४ ची प्रस्तावना

या भागात आपण योसेफ, ईयोब, मोशे आणि इस्राएली लोकांबद्दल शिकणार आहोत. या सर्वांना सैतानाच्या हातून भरपूर त्रास सहन करावा लागला. काहींसोबत अन्याय झाला. तर काहींना तुरुंगात टाकण्यात आलं. तसंच, काहींना गुलाम म्हणून विकण्यात आलं. इतकंच नाही, तर काहींना मृत्यूचाही सामना करावा लागला. पण, यादरम्यान यहोवाने वेगवेगळ्या मार्गांनी त्यांचा सांभाळ केला. तुम्हाला मुलं असतील तर त्यांना हे समजायला मदत करा, की यहोवाच्या या सेवकांनी वाईट परिस्थितीचा सामना करूनही आपला विश्‍वास कसा मजबूत ठेवला.

यहोवाने मिसरमध्ये (इजिप्तमध्ये) दहा पीडा आणून हे दाखवून दिलं, की तो तिथल्या सर्व खोट्या देवांपेक्षा जास्त शक्‍तिशाली आहे. यहोवाने आधीच्या काळात आपल्या लोकांचं कशा प्रकारे रक्षण केलं आणि आताही तो हे कसं करत आहे, यावर जोर द्या.

या विभागात

पाठ १४

एक असा गुलाम ज्याने देवाचं ऐकलं

योसेफने जे बरोबर तेच केलं, पण तरीसुद्धा त्याला खूप त्रास सहन करावा लागला. असं का?

पाठ १५

यहोवा योसेफला विसरला नाही

योसेफ त्याच्या कुटुंबापासून खूप लांब राहत असला तरी देवाने त्याची साथ कधीच सोडली नाही.

पाठ १६

ईयोब कोण होता?

कठीण असतानाही ईयोबने यहोवाचं ऐकलं.

पाठ १७

मोशे यहोवाची उपासना करण्याचं निवडतो

मोशेच्या आईने चातुर्याने मोशे बाळ असताना त्याला वाचवलं.

पाठ १८

एक जळणारं झुडूप

आग लागलेलं झुडूप जळत का नाही?

पाठ १९

पहिल्या तीन पीडा

फारो फार गर्विष्ठ होता आणि त्यामुळे त्याने आपल्या लोकांवर समस्या ओढावून घेतली. त्याला तर फक्‍त एक सोपं काम करायचं होतं.

पाठ २०

पुढच्या सहा पीडा

या पीडा पहिल्या तीन पीडांपेक्षा वेगळ्या कशा होत्या?

पाठ २१

दहावी पीडा

ही पीडा इतकी भयानक होती की घमेंडी फारोने शेवटी इस्राएली लोकांना जाऊ दिलं.

पाठ २२

लाल समुद्राजवळ चमत्कार

फारो दहा पिडांपासून तर वाचला पण तो देवाच्या या चमत्कारापासून वाचू शकला का?