व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ३१

यहोशवा आणि गिबोनी लोक

यहोशवा आणि गिबोनी लोक

यरीहोबद्दलची बातमी कनानमध्ये सगळीकडे पसरली. तिथल्या राजांनी इस्राएली लोकांसोबत लढण्यासाठी एकत्र येण्याचं ठरवलं. पण गिबोनी लोकांनी काही वेगळं करण्याचं ठरवलं. ते फाटके कपडे घालून यहोशवाकडे गेले आणि त्याला म्हणाले: ‘आम्ही खूप दूरच्या देशातून आलो आहोत. आम्ही यहोवाविषयी ऐकलं आहे. आम्हाला हेदेखील माहीत आहे, की त्याने तुमच्यासाठी मिसर आणि मवाब देशात काय-काय केलं आहे. म्हणून आता आम्हाला वचन द्या, की तुम्ही आमच्यावर हल्ला करणार नाही. आम्ही तुमचे सेवक होऊ.’

यहोशवाने त्यांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवला आणि त्यांच्यावर हल्ला करणार नाही, असं वचनदेखील दिलं. पण तीन दिवसांनंतर यहोशवाला कळलं, की ते लोक खोटं बोलले होते. ते काही दूरच्या देशातून नाही, तर कनानमधूनच आले होते. यहोशवाने गिबोनी लोकांना विचारलं: ‘तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात?’ गिबोनी लोकांनी उत्तर दिलं: ‘आम्ही घाबरलो होतो! आम्हाला माहीत आहे की यहोवा तुमचा देव, तुमच्यासाठी लढत आहे. कृपा करून आम्हाला मारू नका.’ यहोशवाने गिबोनी लोकांना दिलेलं वचन पाळलं आणि त्यांच्यावर हल्ला केला नाही.

काही काळातच पाच कनानी राजांनी आणि त्यांच्या सैन्याने, गिबोनी लोकांना धमकी देऊन घाबरवलं. त्यामुळे गिबोनी लोकांना वाचवण्यासाठी यहोशवा आणि त्याच्या सैनिकांनी रात्रभर प्रवास केला. दुसऱ्‍या दिवशी सकाळीच लढाई सुरू झाली. कनानी लोक घाबरून इकडे-तिकडे पळू लागले. पण ते जिथे कुठे पळाले, तिथे यहोवाने त्यांच्यावर मोठमोठ्या गारा पाडल्या. त्यानंतर यहोशवाने यहोवाला विनंती केली, की सूर्य स्थिर राहू दे आणि त्याला मावळू देऊ नको. पण या आधी तर सूर्य कधीही स्थिर राहिला नव्हता. मग, यहोशवाने यहोवाला अशी विनंती का बरं केली? कारण, यहोशवाचा यहोवावर भरवसा होता. आणि त्यादिवशी सूर्य खरंच मावळला नाही! इस्राएली लोकांनी, कनानी राजांवर आणि त्यांच्या सैनिकांवर विजय मिळवेपर्यंत, सूर्य आकाशात तसाच स्थिर राहिला.

“त्यामुळे तुमचं बोलणं ‘हो’ तर हो, ‘नाही’ तर नाही इतकंच असावं, कारण यापेक्षा जे अधिक ते त्या दुष्टाकडून आहे.”—मत्तय ५:३७