पाठ ४
टीनाला पावसामुळं आलं रडू
खिडकीत बसून ती लागली म्हणू,
“खेळायचंय मला, आता कशी खेळू?
जा ना रे पावसा, नको ना रे पडू.”
मग अचानक असं झालं
ढगानं सूर्याला ढकलूनच दिलं
उन्हामुळं पावसाला फुटला घाम
धूम ठोकून तो पळाला लांब.
नाचत नाचत बाहेर आली टीना फुलावरून तिची नजर हटेना काल होती कळी, आज फूल कशी झाली? कुणी बरं ही जम्मत केली?
मग तिला पावसाची आठवण झाली देवानंच तर त्याला पाठवलं खाली पाऊस अन् टीनाची झाली आता गट्टी घेतली नाही मग त्यानंही सुट्टी.
उपक्रम
वाचा:
त्याला ओळखायला सांगा:
खिडकी चिमणी टीना
झाड फुलं
इतर चित्रं दाखवायला सांगा:
बॉल विमान
विचारा:
यहोवा पाऊस का पाडतो?