भाग दोन
चिंता—चारी बाजूंनी येणारी संकटं
“आमच्या लग्नाच्या २५ वर्षांनंतर आम्ही घटस्फोट घेतला. मुलं सत्य सोडून गेली आणि गंभीर आजारांमुळं माझी तब्येत खूप खालावली. या सर्व गोष्टींमुळं मी अगदीच निराश झाले होते. आता मला हे सगळं सहन होत नव्हतं. मी पूर्णपणे खचून गेले होते. मी सभांना आणि क्षेत्र सेवेत जाणं सोडल्यामुळं अक्रियाशील झाले.”—जून नावाची बहीण.
आज प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहेत. आणि यहोवाचे सेवकही यातून सुटलेले नाहीत. स्तोत्रकर्त्यानं असं म्हटलं: “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र [भरले]” आहे. (स्तोत्र ९४:१९) तसंच, येशूनं शेवटल्या काळाबद्दल असं म्हटलं की “संसाराच्या चिंता” असल्यामुळं विश्वासू सेवकांना यहोवाची सेवा करणं सोपं जाणार नाही. (लूक २१:३४) तुम्हालाही स्तोत्रकर्त्यासारखं वाटतं का? पैशांची चणचण, कुटुंबात समस्या किंवा मग आजारपण यांमुळं तुम्हीदेखील चिंतेत आहात का? यहोवा तुमची मदत कशी करतो?
यहोवा अमर्याद शक्ती देतो
आपण स्वतःच्या बळावर चिंतांचा सामना करू शकत नाही. प्रेषित पौलानं म्हटलं: “आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात.” आम्ही “गोंधळलेलो आहोत ... खाली पडलेलो” आहोत. पण “आम्ही अजून चिरडले गेलो नाही,” “निराश झालो नाही” आणि “आमचा नाश झालेला नाही,” असंही त्यानं म्हटलं. कोणत्या गोष्टीमुळं पौलाला टिकून राहण्यास मदत मिळाली? तो म्हणतो, देवाकडून मिळणाऱ्या अमर्याद शक्तीनं त्याला टिकून राहण्यास मदत केली.—२ करिंथकर ४:७-९.
या सामर्थ्यामुळं तुम्हाला कशी मदत मिळाली होती याचा थोडा विचार करा. तुम्हाला असं एखादं भाषण आठवतं का ज्यामुळं यहोवावर मनापासून प्रेम करण्याचं प्रोत्साहन तुम्हाला मिळालं होतं? तुम्ही इतरांना नंदनवनाबद्दल सांगितलं तेव्हा यहोवाच्या अभिवचनांवर तुमचा भरवसा आणखी भक्कम झाला नव्हता का? आपण ख्रिस्ती सभांना जातो आणि प्रचार कार्यात भाग घेतो तेव्हा जीवनातील चिंतांवर मात करण्यासाठी आपल्याला बळ मिळतं. तसंच आपल्याला मनःशांतीदेखील मिळते ज्यामुळं आपण यहोवाची सेवा आनंदानं करू शकतो.
यहोवा किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पाहा
कधीकधी तुम्हाला असं वाटू शकतं की सगळीकडूनच तुमची ओढाताण होत आहे. जसं की, यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो की आपण राज्याच्या कामांना जीवनात प्रथम स्थान द्यावं. तसंच, आध्यात्मिक कार्याचा आपला एक चांगला नित्यक्रम असावा. (मत्तय ६:३३; लूक १३:२४) पण कुटुंबातील सदस्यांकडून किंवा सोबत काम करणाऱ्यांकडून होणारा विरोध, आरोग्याच्या समस्या किंवा मग कौटुंबिक समस्या यांमुळं तुम्ही जीवनात पार थकून गेला असाल. किंवा, तुमचा सगळा वेळ व शक्ती नोकरीत खर्च होत असल्यामुळं तुम्हाला सभा व प्रचार कार्यासाठी वेळच उरत नसेल. सगळीकडून तुमची ओढाताण होत असल्यामुळं जीवनात हताश होणं स्वाभाविक आहे. या सर्व गोष्टींमुळं तुमच्या मनात कधी असा विचार आला का, की यहोवा माझ्याकडून खूप जास्त अपेक्षा करतो?
खरं पाहिलं तर यहोवा आपली परिस्थिती समजून घेतो आणि आपल्याला जमणार नाही अशा गोष्टींची कधीच अपेक्षा करत नाही. त्याला जाणीव आहे, की जीवनातील चिंतांमुळं आपल्यावर मानसिक आणि शारीरिक ताण येतो. आणि हा ताण कमी होण्यासाठी वेळ लागतो.—स्तोत्र १०३:१३, १४.
यहोवा एलीया संदेष्ट्याशी कसं वागला यावर विचार करा. एकदा एलीया इतका निराश झाला व इतका घाबरला की तो आपली नेमणूक सोडून जंगलात पळून गेला आणि तिथं झोपी गेला. हे पाहून यहोवा त्याच्यावर रागावला का, किंवा त्यानं त्याला परत जाण्यास सांगितलं का? मुळीच नाही. याउलट यहोवानं दोनदा एका देवदूताला त्याला प्रेमानं झोपेतून उठवून काहीतरी खायला देण्यास पाठवलं. एवढं करूनही एलीया निराशेतून बाहेर आला का? नाही. अहवालात म्हटलं आहे, की ही घटना घडून ४० दिवस झाले तरी एलीया अजूनही निराश व घाबरलेल्या स्थितीत होता. मग यहोवानं त्याला आणखी कशा प्रकारे मदत पुरवली? सर्वात आधी यहोवानं त्याला हे दाखवलं की तो त्याचं संरक्षण करू शकतो. नंतर, यहोवानं एलियाला “शांत, मंद” आवाजात सांत्वन दिलं. आणि शेवटी यहोवानं त्याला सांगितलं की खरी उपासना करणारा १ राजे १९:१-१९) या अहवालातून आपण काय शिकतो? एलीया निराश झाला आणि घाबरला तेव्हा यहोवा त्याच्याशी खूप धीरानं आणि प्रेमानं वागला व त्यानं त्याची परिस्थिती समजून घेतली. यहोवा बदललेला नाही. आज तो तुमचीदेखील परिस्थिती समजून घेतो व तुमच्याशी धीरानं वागतो.
तो एकटाच नाही तर त्याच्यासोबत यहोवाचे हजारो सेवकदेखील आहेत. यामुळं एलियाला त्याच्या निराशेवर मात करायला मदत मिळाली आणि लवकरच तो पुन्हा यहोवाची सेवा आवेशानं करू लागला. (तुम्ही यहोवाच्या सेवेत काय करू शकता यावर विचार करताना स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका. तुम्ही कदाचित आधी जास्त सेवा करत असाल, पण आता काही कारणामुळं तुम्हाला तितकं करणं जमत नसेल. हे समजण्यासाठी एका उदाहरणावर विचार करा: एका धावपटूनं बऱ्याच महिन्यांपासून किंवा वर्षांपासून सराव केला नाही. तर आता त्याला लगेच आधीसारखं धावणं शक्य होईल का? नाही. त्याला पुन्हा हळूहळू सराव करायला सुरुवात करावी लागेल. त्याला छोटीछोटी ध्येयं ठेवावी लागतील आणि यामुळं त्याची ताकद वाढेल. आपणही एका धावपटूसारखेच आहोत. आपल्या सर्वांपुढं एक ध्येय आहे आणि ते मिळवण्यासाठी आपण धावत आहोत. (१ करिंथकर ९:२४-२७) तुम्हाला जमेल असं एखादं छोटं आध्यात्मिक ध्येय तुम्ही ठेवू शकता का, जसं की सभेला जाण्याचं? हे ध्येय पूर्ण करण्यासाठी शक्ती मिळावी म्हणून यहोवाला प्रार्थना करा. तुम्ही आध्यात्मिक प्रगती करण्याचा प्रयत्न करत असताना यहोवा “किती चांगला आहे याचा अनुभव” तुम्हाला येईल. (स्तोत्र ३४:८) हे नेहमी लक्षात असू द्या की यहोवाच्या सेवेत तुम्ही जे काही करता, मग ते कितीही कमी असलं तरी यहोवा नेहमी त्याची कदर करतो.—लूक २१:१-४.
“याचीच मला गरज होती”
लेखाच्या सुरुवातीला उल्लेख करण्यात आलेल्या जून नावाच्या बहिणीला यहोवानं कशी मदत केली? ती सांगते: “मी सतत यहोवाला प्रार्थना करून मदत मागायचे. त्यादरम्यान माझ्या सुनेनं मला सांगितलं की मी ज्या शहरात राहते तिथं यहोवाच्या साक्षीदारांचं संमेलन होणार आहे. मी जाण्याचं ठरवलं. आपल्या बंधुभगिनींना भेटून मला जो आनंद झाला तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. त्या संमेलनातून मला खूप उत्तेजन मिळालं. याचीच मला गरज होती. आज मी पुन्हा यहोवाची सेवा आनंदानं करत आहे. मी जीवनात खूप समाधानी आहे. मला या गोष्टीची जाणीव झाली की बंधुभगिनींच्या मदतीशिवाय मी जीवनातील चिंतांचा सामना करू शकत नाही. मी यहोवाचे खूपखूप आभार मानते की त्यानं मला वेळीच परत आणलं.”