व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

समारोप

समारोप

यहोवाच्या लोकांबरोबर असताना तुम्हाला आलेल्या सुखद अनुभवांबद्दल तुम्ही बोलता का? मंडळीतील एखादी सभा जिच्यामुळं तुम्हाला उत्तेजन मिळालं होतं, एखादं अधिवेशन ज्यामुळं तुम्ही अगदी भारावून गेला होता, क्षेत्र सेवेत तुम्हाला आलेला छान अनुभव किंवा मग एखाद्या भावाबरोबर अथवा बहिणीबरोबर तुम्ही मारलेल्या गप्पा, यांसारखे आनंदाचे क्षण तुम्ही विसरला नसाल. तुम्ही यहोवाला विसरला नाहीत आणि तोही तुम्हाला विसरलेला नाही. तुम्ही विश्‍वासूपणे केलेली त्याची सेवा त्याला अजूनही आठवते. म्हणून तो तुम्हाला त्याच्याकडं परत येण्याची गळ घालतोय.

यहोवा म्हणतो: “मी स्वतःच त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवेन. मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे मी करेन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवेन. त्या अंधाऱ्‍या व ढगाळ दिवशी त्या जेथेजेथे विखुरल्या असतील तेथून तेथून मी त्यांना परत आणेन.”—यहेज्केल ३४:११, १२, ईझी-टू-रीड व्हर्शन.