यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
यहोवाचे साक्षीदार जगभरात आहेत. ते वेगवेगळ्या वंशातले व सांस्कृतिक पार्श्वभूमीतले असले तरी त्यांच्यात ऐक्य आहे. कोणत्या कारणामुळे त्यांच्यात ऐक्य आहे?
देवाची इच्छा काय आहे?
संपूर्ण जगभरातील लोकांना आपली इच्छा कळावी, असं देवाला वाटतं. त्याची इच्छा काय आहे आणि आज याबद्दलचं शिक्षण कोणते लोक देत आहेत?
LESSON १
यहोवाचे साक्षीदार कशा प्रकारचे लोक आहेत?
तुम्ही किती यहोवाच्या साक्षीदारांना ओळखता? तुम्हाला त्यांच्याबद्दल नक्की काय माहीत आहे?
LESSON ३
बायबलचे सत्य पुन्हा उजेडात कसे आले?
बायबलच्या शिकवणींची अचूक समज आपल्याजवळ आहे, याची आपण खातरी कशी बाळगू शकतो?
LESSON ४
आम्ही न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे भाषांतर का काढले?
बायबलचं हे भाषांतर अनोखं आहे असं का म्हणता येईल?
LESSON ५
आमच्या ख्रिस्ती सभांमध्ये तुम्हाला काय अनुभवायला मिळेल?
शास्त्रवचनांचा अभ्यास करण्यासाठी व एकमेकांना उत्तेजन देण्यासाठी आम्ही एकत्र येतो. यहोवाच्या साक्षीदारांच्या या सभांना हजर राहण्यासाठी आम्ही तुम्हालाही आमंत्रन देतो.
LESSON ६
ख्रिस्ती बंधुभगिनींसोबत सहवास केल्यामुळे आम्हाला कोणता फायदा होतो?
बंधुभगिनींसोबत एकत्र येण्याचं आणि सहवास राखण्याचं उत्तेजन बायबलमध्ये देण्यात आलं आहे. या सहवासाचा तुम्हाला कोणता फायदा होऊ शकतो त्याविषयी अधिक जाणून घ्या.
LESSON ७
आमच्या सभा कशा चालवल्या जातात?
आमच्या सभांमध्ये नेमकं काय चालतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तिथं मिळणारं बायबलचं दर्जेदार शिक्षण पाहून तुम्ही थक्क व्हाल.
LESSON ८
आम्ही आमच्या सभांसाठी नीटनेटका पेहराव का करतो?
आपल्या पेहरावाने देवाला काही फरक पडतो का? केशभूषेच्या व वेशभूषेच्या बाबतीत बायबलची कोणती तत्त्वं आपल्याला मदत करू शकतात ते माहित करून घ्या.
LESSON ९
सभांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
सभांची पूर्वतयारी केली तरच तुम्हाला त्या सभांतून फायदा मिळवता येईल.
LESSON १०
कौटुंबिक उपासना म्हणजे काय?
या व्यवस्थेमुळे तुम्हाला देवाच्या जवळ जाण्यास व नातेसंबंध आणखी मजबूत करण्यास कशी मदत होऊ शकते ते माहित करून घ्या.
LESSON ११
आम्ही संमेलनांना का जातो?
दर वर्षी आम्ही तीन खास प्रसंगांसाठी एकत्र जमतो. या संमेलनांतून तुम्ही फायदा कसा मिळवू शकता?
LESSON १२
आमच्या साक्षकार्याचे आयोजन कशा प्रकारे केले जाते?
पृथ्वीवर असताना येशूने जे उदाहरण आपल्यासमोर मांडलं त्याचं आम्ही अनुकरण करतो. आज साक्ष देण्याच्या कोणकोणत्या पद्धती आहेत?
LESSON १३
पायनियर म्हणजे काय?
काही साक्षीदार दर महिन्याला ३०, ५० किंवा त्याहून अधिक तास प्रचार कार्यात खर्च करतात. कोणत्या कारणांमुळे ते असं करण्यास प्रवृत्त होतात?
LESSON १४
पायनियरांसाठी कोण-कोणत्या प्रशाला आहेत?
देवाच्या राज्याची पूर्णवेळ सेवा करणाऱ्या पायनियरांसाठी कोणत्या काही खास प्रशालांचं आयोजन करण्यात येत?
LESSON १५
ख्रिस्ती मंडळीला वडीलांची कशी मदत होते?
वडील हे आध्यात्मिक रीत्या प्रौढ असतात व ते मंडळीत पुढाकार घेतात. ते कोणती मदत पुरवतात?
LESSON १६
मंडळीत सेवा सेवकांची काय भूमिका आहे?
सेवा सेवक मंडळी सुरळीतपणे कार्य करण्यासाठी मद्दत करतात. जे सभांना हजर राहतात त्यांना कामामध्ये कसा फायदा होतो ते शिका.
LESSON १७
प्रवासी पर्यवेक्षक आपल्याला कशी मदत करतात?
कोणत्या उद्देशानं प्रवासी पर्यवेक्षक मंडळ्यांना भेटी देतात? तुम्ही त्यांच्या भेटीचा फायदा कसा घेऊ शकता?
LESSON १८
संकटात असलेल्या आमच्या बांधवांना आम्ही कशी मदत करतो?
जेव्हा एखादी विपत्ती येते तेव्हा यहोवाचे साक्षीदार लगेच आपल्या बांधवांना आर्थिक आणि आध्यात्मिक मदत करतात? ते कोणकोणत्या मार्गांनी मदत करतात?
LESSON १९
विश्वासू व बुद्धिमान दास कोण आहे?
येशूने अभिवचन दिलं होतं की आध्यात्मिक अन्न पुरवण्यासाठी तो विश्वासू दासांची नेमणूक करेल. हे कसं होणार होतं?
LESSON २०
आज नियमन मंडळ कशा प्रकारे कार्य करते?
पहिल्या शतकात यरुशलेमेतले प्रेषित व वडीलवर्ग यांचा एक लहान गट नियमन मंडळ या नात्यानं कार्य करत होता. हा गट सर्व अभिषिक्त ख्रिस्ती मंडळ्यांच्या वतीनं महत्त्वाचे निर्णय घ्यायचा. आज आपल्या काळातही त्याच नमुन्याचं पालन केलं जातं आहे का?
LESSON २१
बेथेल म्हणजे काय?
प्रचार कार्याशी संबंधीत महत्त्वाचा उद्देश असलेली जागा म्हणजे बेथेल आहे. तिथं सेवा करणाऱ्यांबद्दल आधिक जाणून घ्या.
LESSON २२
शाखा कार्यालयात कोणते काम केले जाते?
आम्ही तुम्हाला आमचे शाखा कार्यालय पाहण्याचं आमंत्रण देतो. तुम्ही आमच्या कोणत्याही शाखा कार्यालयाला भेट देऊ शकता!
LESSON २३
आमच्या साहित्याचे लिखाण व भाषांतर कसे केले जाते?
यहोवाचे साक्षीदार ७५० हून अधिक भाषांमध्ये साहित्य प्रकाशित करतो. ते एवढी मेहनत का घेतात, त्याविषयी जाणून घ्या.
LESSON २४
आमच्या जगव्याप्त कार्याचा खर्च कसा भागवला जातो?
खर्च भागवण्याच्या बाबतीत, आमची संघटना इतर धार्मिक संघटनांपेक्षा वेगळी कशी आहे?
LESSON २५
राज्य सभागृहे—ती का व कशी बांधली जातात?
आमच्या उपासना स्थळांना आम्ही राज्य सभागृह का म्हणतो? या साध्याशा इमारतींचा आमच्या मंडळ्यांना कसा फायदा होतो, याविषयी आणखी जाणून घ्या.
LESSON २६
आपण आपले राज्य सभागृह सुस्थितीत कसे ठेवू शकतो?
स्वच्छ व सुस्थितीत ठेवलेलं सभागृह आपल्या देवाची महिमा करतं. स्थानिक सभागृहाची काळजी घेण्यासाठी काय योजना करण्यात आल्या आहेत?
LESSON २७
राज्य सभागृहातील ग्रंथालयाचा आपल्याला फायदा कसा होऊ शकतो?
तुम्हाला बायबलविषयीचं ज्ञान वाढवण्याची इच्छा आहे का? तर मग, आमच्या राज्य सभागृहातल्या ग्रंथालयाला भेट द्या!
LESSON २८
आमच्या वेबसाईटवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
तुम्ही आमच्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकता. त्याचबरोबर बायबलवर आधारित प्रश्नांची उत्तरं मिळवा.
तुम्ही यहोवाच्या इच्छेनुसार कार्य कराल का?
यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे. तुम्हीही यहोवावर प्रेम करता हे तुमच्या दैनंदिन जीवनातून तुम्ही कसं दाखवू शकता?