तुम्ही यहोवाच्या इच्छेनुसार कार्य कराल का?
तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांविषयी, त्यांच्या कार्यांविषयी आणि त्यांच्या प्रगतिशील संघटनेविषयी जाणून घेण्यासाठी या माहितीपत्रकाचे परीक्षण केले त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. या माहितीपत्रकाचे परीक्षण केल्यानंतर यहोवाच्या इच्छेनुसार कार्य करणारे, यहोवाचे साक्षीदारच आहेत या निष्कर्षावर तुम्ही पोहचला असाल अशी आशा आम्ही करतो. आम्ही तुम्हाला देवाबद्दलचे ज्ञान घेत राहण्याचे, तुम्ही जे शिकत आहात ते आपल्या मित्रपरिवाराला सांगण्याचे आणि नियमितपणे आमच्या ख्रिस्ती सभांमध्ये येत राहण्याचे उत्तेजन देतो.—इब्री लोकांस १०:२३-२५.
तुम्ही जितके अधिक यहोवाबद्दल शिकाल तितकी अधिक तुम्हाला याची जाणीव होईल की यहोवा तुमच्यावर मनस्वी प्रेम करतो. आणि त्यामुळे तुम्हीसुद्धा त्याच्यावर प्रेम करण्यास प्रवृत्त व्हाल. (१ योहान ४:८-१०, १९) पण, तुमचे यहोवावर प्रेम आहे हे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातून कसे दाखवू शकता? देवाच्या नैतिक स्तरांचे पालन करणे आपल्याच फायद्याचे आहे असे का म्हणता येईल? आणि कोणती गोष्ट तुम्हाला आमच्यासोबत देवाच्या इच्छेनुसार कार्य करण्यास मदत करू शकते? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यास तुमचा बायबल शिक्षक तुम्हाला नक्कीच मदत करू शकतो, जेणेकरून सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला “देवाच्या प्रीतीमध्ये” टिकून राहणे शक्य होईल.—यहूदा २१.
यानंतर “देवाच्या प्रेमात टिकून राहा” असे शीर्षक असलेल्या प्रकाशनाचा अभ्यास करण्याद्वारे तुम्ही सत्यात प्रगती करत राहावी असे प्रोत्साहन आम्ही तुम्हाला देतो . . .