पाठ १६
मंडळीत सेवा सेवकांची काय भूमिका आहे?
बायबल मंडळीच्या जबाबदाऱ्या हाताळणाऱ्या ख्रिस्ती पुरुषांच्या दोन गटांविषयी सांगते. ते म्हणजे “अध्यक्ष [“पर्यवेक्षक,” NW] व सेवक.” (फिलिप्पैकर १:१) सहसा प्रत्येक मंडळीत बरेच वडील व सेवा सेवक असतात. सेवा सेवक आपल्यासाठी कोणती कार्ये करतात?
ते वडील वर्गाला मदत करतात. सेवा सेवक आध्यात्मिक मनोवृत्तीचे, भरवशालायक व प्रामाणिक रीत्या कार्य करणारे विश्वासू पुरुष असतात. यांच्यापैकी काही जण तरुण, तर काही जण वयाने मोठे असतात. ते मंडळीशी व राज्य सभागृहाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या हाताळतात. यामुळे वडील आपल्या शिकवण्याच्या व मंडळीतील लोकांना आध्यात्मिक रीत्या मदत करण्याच्या जबाबदारीकडे जास्त लक्ष देऊ शकतात.
ते मंडळीला व्यावहारिक मदत करतात. राज्य सभागृहात येणाऱ्या लोकांचे स्वागत करण्यासाठी काही सेवा सेवकांना नेमण्यात येते. इतर काही सेवा सेवकांचा उपयोग साऊंड सिस्टम हाताळण्यासाठी, साहित्याचे वाटप करण्यासाठी, मंडळीच्या पैशाचा हिशोब ठेवण्यासाठी आणि प्रचारकांना क्षेत्र नेमून देण्यासाठी केला जातो. ते राज्य सभागृह सुस्थितीत ठेवण्यासही मदत करतात. काही वेळा वडील त्यांना वृद्ध बांधवांना मदत करण्यासही सांगतात. सेवा सेवकांना ज्या जबाबदाऱ्या दिल्या जातात त्या ते स्वखुशीने पूर्ण करतात आणि ते दाखवत असलेल्या चांगल्या मनोवृत्तीमुळे मंडळीतील सर्व लोक त्यांचा आदर करतात.—१ तीमथ्य ३:१३.
ख्रिस्ती पुरुष या नात्याने ते एक चांगले उदाहरण मांडतात. एका व्यक्तीच्या आध्यात्मिक गुणांमुळेच त्याला सेवा सेवक म्हणून नेमण्यात येते. मंडळीतील सभांमध्ये निरनिराळे भाग हाताळण्याद्वारे ते आपला विश्वास दृढ करतात. प्रचार कार्यात पुढाकार घेण्याद्वारे ते आपल्याला आवेशाने कार्य करण्यास प्रोत्साहन देतात. ते वडिलांना सहकार्य करत असल्यामुळे मंडळीत आनंद व एकता टिकून राहते. (इफिसकर ४:१६) काही काळानंतर हे सेवा सेवक वडील या नात्याने सेवा करण्यास पात्र ठरू शकतात.
-
सेवा सेवकांमध्ये कोणते गुण असतात?
-
मंडळीतील कामकाज सुरळीत चालण्यासाठी सेवा सेवक कसा हातभार लावतात?