देवाचा हेतू आता कळसास पोहंचत आहे
देवाचा हेतू आता कळसास पोहंचत आहे
पृथ्वीची निर्मिती करण्यात देवाचा हेतू असा होता की धार्मिक वातावरणामध्ये आनंदी लोकांनी ती वसवावी. जगण्यासाठी मानवांना देवाचे नियम पाळावे लागणार होते. परंतु पहिल्या मानवी जोडप्यानेच अवज्ञा केली, ते पापी झाले व त्यांनी स्वतःवर मृत्युदंड ओढवून घेतला. यामुळे त्याच्या सर्व वंशजावर पाप व मरण आले.—उत्पत्ती १:२७, २८; २:१६, १७; ३:१-१९; रोमकर ५:१२.
यहोवा देवाने अवज्ञा व पापाचे परिणाम पृथ्वीवरुन दूर करण्याचे ठरवले. कालांतराने त्याने पृथ्वीकडे लक्ष दिले तेव्हा मानवजातीमध्ये अब्राम नावाचा विश्वासू माणूस त्याला दिसला. अब्रामाचे नाव बदलून त्याने अब्राहाम असे ठेवले. देवाने अब्राहामाला वचन दिले की, त्याचे वंशज एक मोठे राष्ट्र होतील, व ज्यामुळे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील असे संतान देव त्या राष्ट्रातून उत्पन्न करील.—उत्पत्ती १२:१-३; १८:१८, १९; २२:१८; स्तोत्रसंहिता ८३:१८; इब्रीयांस ११:८-१६.
इ.स.पू. च्या १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात अब्राहामाचा नातू याकोब वा इस्राएल याच्या संततीचे १२ वंश होऊन ते मिसर देशामध्ये दास्यत्वात होते. या इस्राएली लोकांची यहोवाने मिसरातून सुटका केली व त्यांचे एक राष्ट्र बनवले. सिनाय पर्वतावर मोशेमार्फत त्याने त्यांना नियमशास्त्र दिले. ते त्यांना राष्ट्रीय घटनेप्रमाणेच होते. यहोवा त्यांचा राजा, न्यायाधीश व नियंता होता. इस्राएलाचे राष्ट्र देवाचा हेतू पूर्ण करण्यासाठी संघटित केलेले त्याचे निवडक लोक, त्याचे साक्षीदार झाले. सर्व राष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठी अक्षय राज्य स्थापन करणारा मसीहा त्यांच्यातूनच येणार होता.—निर्गम १९:५, ६; १ इतिहास १७:७-१४; १ राजे ४:२०, २५; यशया ३३:२२; ४३:१०-१२; रोमकर ९:४, ५.
१५ शतकानंतर किंवा जवळपास २,००० वर्षांपूर्वी मरीया नावाच्या यहुदी तरुणीपासून जन्माला यावा म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र स्वर्गातून पृथ्वीवर पाठवला. त्याचे नाव येशू ठेवले गेले. त्याचा पूर्वज दावीद याला देवाने वचन दिलेले राज्य त्याला वारसा हक्काने मिळणार होते. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाकडून येशूचा वयाच्या ३० व्या वर्षी बाप्तिस्मा झाला व तो देवाच्या राज्याची घोषणा करू लागला. रोग्यांना बरे करून, मत्तय १:१८-२४; ३:१३-१६; ४:१७-२३; ६:९, १०; अध्याय १३; २०:२८; लूक १:२६-३७; २:१४; ४:४३, ४४; ८:१; योहान ३:१६; प्रे. कृत्ये १०:३७-३९.
येणारे राज्य कसे आशीर्वादित करील याचे प्रदर्शन त्याने केले. अनंत जीवनाची इच्छा बाळगणाऱ्यांपासून कशाची अपेक्षा आहे ते त्याने दृष्टांतांनी सांगितले. नंतर येशूला खांबावर मृत्युदंड देण्यात आला; त्याचे सिद्ध मानवी जीवन मानवजातीची खंडणी झाले.—मसीही राज्य बऱ्याच काळानंतर, या व्यवस्थेच्या अंती स्थापन होईल असे येशूने सांगितले होते. त्यावेळी राजा या नात्याने तो अदृश्यरित्या स्वर्गात उपस्थित असेल व पृथ्वीकडे लक्ष देऊन आपली उपस्थिती जाहीर करील. जागतिक घडामोडी दर्शवतात की १९१४ पासून आपण त्या काळात आहोत. येशूने भाकित केल्याप्रमाणे राज्याची सुवार्ता साक्षीसाठी सर्व जगभर गाजविली जात आहे. परिणामी, सर्व राष्ट्रांमधून लोक देवराज्याच्या पक्षाला एकत्रित केले जात आहेत. ते या सध्याच्या व्यवस्थेच्या अंतातून वाचतील व मसीही राज्याखाली पृथ्वीवर अनंत जीवन मिळवतील.—मत्तय अध्याय २४ व २५; प्रकटीकरण ७:९-१७.
अनेक चर्चसंस्था देवाची इच्छा आचरत असल्याचा दावा करतात. पण खरी ख्रिस्ती मंडळी तुम्ही कशी ओळखाल? पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीविषयी शास्त्रलेखांचे परिक्षण करून व तो कित्ता आज कोण गिरवीत आहेत ते पाहून तुम्हाला ते समजेल.
● देवाचा हेतू सिद्धीस नेण्यामध्ये अब्राहाम व इस्राएलांनी कोणती भूमिका केली?
● येशूने आपल्या सेवेने व मृत्युने काय साध्य केले?
● सध्याच्या काळाचे चिन्ह म्हणून कोणत्या घटनांचे भाकित केले होते?