व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी संघटित केलेल्या मंडळ्या

देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी संघटित केलेल्या मंडळ्या

देवाच्या राज्याचा प्रचार करण्यासाठी संघटित केलेल्या मंडळ्या

येशू ख्रिस्ताने पृथ्वीवर असताना गावोगाव व शहरोशहरी जाऊन देवाच्या राज्याचा प्रचार केला. त्याने आपल्या शिष्यांनाही प्रशिक्षण देऊन तेच काम करण्यासाठी पाठवले. स्वर्गारोहण करण्यापूर्वी सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य बनवण्याची आज्ञा त्याने आपल्या शिष्यांना दिली. आरंभापासूनच सुरुवातीची ख्रिस्ती मंडळी सुवार्तेच्या प्रचारासाठी संघटित केली होती. जिकडे जातील तिकडे शिष्य राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करताना आढळत.—मत्तय ४:१७, २३; १०:१-१६; २८:१९, २०; लूक ४:४३, ४४; ८:१; १०:१-९; प्रे. कृत्ये १:८; ४:३१; ५:४२; ८:१२; १९:८; २८:२३, ३०, ३१; रोमकर १०:९, १०, १४.

या व्यवस्थेच्या अंताबद्दल भविष्यवाणी करताना येशूने म्हटलेः “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.” हा प्रचार करणे हे ख्रिस्ती मंडळीचे पहिले कर्तव्य आहे.—मत्तय २४:१४; मार्क १३:१०.

जगभर, आपल्या स्थानिक क्षेत्रात देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार पद्धतशीररित्या पसरविण्यासाठी यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्या संघटित केलेल्या आहेत. हे काम शिस्तबद्ध रितीने व्हावे म्हणून प्रत्येक देशामध्ये तेथील वॉचटावर संस्थेचे कार्यालय प्रत्येक मंडळीला साक्षीसाठी क्षेत्र नेमून देते. मंडळी, ते क्षेत्र लहान भागांमध्ये वाटते. मग, लोकांना भेटण्याची जबाबदारी पत्करणाऱ्‍यांना ते भाग नेमून दिले जातात.—१ करिंथकर १४:३३, ४०.

साक्षीदार बहुधा घरोघरी जाऊन लोकांशी संपर्क साधतात. आपले पवित्र शास्त्र वापरून लोकांच्या दारी राज्याचा संदेश थोडक्यात सांगण्यासाठी साक्षीदारांना आपल्या मंडळीच्या सभांमध्ये प्रशिक्षण मिळालेले असते. देवाच्या वचनांचे अधिक ज्ञान करून घेण्याची इच्छा बाळगणाऱ्‍या घरमालकास देण्यासाठी साक्षीदार पवित्र शास्त्रविषयक साहित्य जवळ बाळगतात.

आपल्या क्षेत्रातील सर्वांना हा महत्वाचा राज्याचा संदेश ऐकण्याची संधी देण्यासाठी कोणत्या घरात लोक भेटले नाहीत वा काही कारणासाठी कोठे नीट साक्ष देणे शक्य झाले नाही त्याची तपशीलवार नोंद साक्षीदार घरोघरी जाताना ठेवतात. तेथे नंतर दुसऱ्‍यांदा भेट देण्यात येईल. जेथे या विषयात रस दाखविला जातो त्याची नोंद ठेवली जाते व अधिक शास्त्रविषयक माहिती देण्यासाठी साक्षीदार तेथे परत जातात. जर त्या व्यक्‍तीला इच्छा असली तर नियमित पवित्र शास्त्राचा अभ्यासहि दिला जातो. हे सर्व मोफत केले जाते.

यहोवाचे साक्षीदार रस्त्यावरील पादचाऱ्‍यांना मासिकेही देऊ करतात. अशा रितीने जे घरी भेटू शकत नाहीत अशा अनेकांशी ते संपर्क साधू शकतात. जो ऐकेल अशा प्रत्येकापर्यंत पोहंचण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात.—प्रे. कृत्ये १७:१७; प्रकटीकरण १४:६, ७; २२:१७.

बहुतांशी लोक आस्था दाखवीत नसतानाहि साक्षीदार पुनःपुन्हा भेटी का देतात? कारण लोकांची परिस्थिती अनेकदा बदलते व नंतरच्या भेटीमध्ये ते अनुकूल प्रतिसाद देतात; वा आस्था दाखवणारी घरातील दुसरी व्यक्‍ती भेटते असे आढळून आले आहे.

येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेः “तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतीमत्व मिळविण्यास झटा.” आपण प्रथम राज्य मिळविण्यास झटण्यामध्ये राज्याच्या सुवार्तेच्या प्रचाराचे विशेष महत्व आहे. यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या आयुष्यात त्याला एक महत्वाचे ध्येय मानले आहे.—मत्तय ६:३३; २ तीमथ्य ४:२.

● येशू व सुरुवातीच्या ख्रिस्तीजनांनी केलेले कोणते काम आपल्या दिवसातही केले जाण्याबद्दल भविष्यवाणी केलेली होती?

● यहोवाच्या साक्षीदारांचे प्रचारकार्य कसे संघटित करण्यात आले आहे?

● बहुतांशी लोक आस्था दाखवीत नसतानाही साक्षीदार त्यांना भेटी का देतात?

[१६, १७ पानांवरील चित्रं]

विविध देशात यहोवाचे साक्षीदार देवाच्या राज्याचा प्रचार करताना

थायलंड

मेक्सिको

नेदरलँड

कोरिया

कुराकाओ

घाना

ब्रिटन

ऑस्ट्रेलिया