व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळी

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळी

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळी

इ.स. ३३ च्या पेन्टेकॉस्टला येशूच्या १२० शिष्यांवर पवित्र आत्मा ओतला गेला आणि अनेक भाषांमध्ये ते देवाच्या महत्कृत्यांबद्दल बोलू लागले. अशी ख्रिस्ती मंडळीची स्थापना झाली. त्याच दिवशी जवळपास ३,००० नव्या शिष्यांना बाप्तिस्मा दिला गेला.—प्रे. कृत्ये अध्याय २.

प्रेषित व इतर, देवाचे वचन धैर्याने बोलत राहिल्याने वेगवेगळ्या परिसरातील मंडळ्यांची संख्या वाढली. प्रेषितांच्या कृत्यांविषयीच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे लवकरच प्रचार कार्याचा विस्तार भूमध्य समुद्रालगतच्या प्रदेशात, बाबेल व उत्तर आफ्रिका खंडापासून थेट रोम व बहुधा स्पनेपर्यंत झाला.—रोमकर १५:१८-२९; कलस्सैकर १:२३; १ पेत्र ५:१३.

जेथे जेथे लोक शिष्य झाले तेथे त्यांनी मंडळ्या बनवल्या. त्या मंडळ्यांमध्ये योग्य शिकवण व आचरणाचा स्तर टिकविण्यासाठी योग्यता असलेल्या प्रौढ पुरुषांच्या नेमणूका झाल्या. पण त्यांचा पाळक वर्ग बनला नाही. ते देवाच्या राज्याचे उपाध्याय व सहकारी होते.—प्रे. कृत्ये १४:२३; २०:२८; १ करिंथकर ३:५; ५:१३; कलस्सैकर ४:११; १ तीमथ्य ३:१-१५; इब्रीयांस १३:१७; १ पेत्र ५:१-४.

प्रेषित व इतर निकटचे सहकारी मिळून नियमन मंडळ झाले. त्यांनी प्रचाराच्या कार्यात पुढाकार घेतला. यरूशलेममधील मंडळीतील समस्या ते सोडवीत. शमरोन व अंत्युखियातील नवीन विश्‍वासधारक लोकांना बळकट करण्यासाठी त्यांनी योग्यता असलेल्या बंधूंना पाठवले. सुंतेविषयीचा वाद त्यांनी हाताळला व सर्व मंडळ्यांनी आचरावा यासाठी त्यांनी आपला निर्णय सर्वत्र पाठवला. तरीही हे लोक इतरांचे धनी नव्हते तर संपूर्ण मंडळीचे सेवक व सहकारी होते.—प्रे. कृत्ये ४:३३; ६:१-७; ८:१४-२५; ११:२२-२४; १५:१-३२; १६:४, ५; १ करिंथकर ३:५-९; ४:१, २; २ करिंथकर १:२४.

सुरुवातीचे शिष्य ख्रिस्ती म्हणून ओळखले गेले. याला ईश्‍वरी मान्यता होती. शिवाय त्यांच्या शिकवणीमुळेहि ते वेगळे असे ओळखले जात असत. त्या शिकवणींना प्रेषितांची शिकवण किंवा सुवचनांचा नमुना असेही म्हणत. ही शास्त्रीय शिकवण सत्य म्हणूनही ओळखली गेली.—योहान १७:१७; प्रे. कृत्ये २:४२; ११:२६; रोमकर ६:१७; १ तीमथ्य ४:६; ६:१, ३; २ तीमथ्य १:१३; २ पेत्र २:२; २ योहान १, ४,.

प्रीतीमध्ये एकता पावलेला त्यांचा एक जागतिक समाज होता. इतर देशांमधील आपल्या समविश्‍वासू लोकांमध्ये ते रस घेत. प्रवासात असताना हे समविश्‍वासू जन त्यांना आपल्या घरात आनंदाने उतरवून घेत. जगापासून वेगळे पवित्र लोक असल्याने ते नैतिक आचरणाचा स्तर उच्च राखत असत. यहोवाच्या दिवसाच्या सान्‍निध्याच्या वेळेची ते सतत जाणीव ठेवत व आपल्या विश्‍वासाविषयी जाहीर घोषणा करीत.—योहान १३:३४, ३५; १५:१७-१९; प्रे. कृत्ये ५:४२; ११:२८, २९; रोमकर १०:९, १०, १३-१५; तीत २:११-१४; इब्रीयांस १०:२३; १३:१५; १ पेत्र १:१४-१६; २:९-१२; ५:९; २ पेत्र ३:११-१४; ३ योहान ५-८.

परंतु आधीच भाकित केल्याप्रमाणे दुसऱ्‍या व तिसऱ्‍या शतकामध्ये प्रचंड धर्मत्यागाचा आरंभ झाला. परिणामी, शिकवण, आचरण, संघटना व जगाशी संबंध याविषयी शुद्धता न राखणाऱ्‍या मोठ्या चर्च संस्था उदयास आल्या.—मत्तय १३:२४-३०, ३७-४३; २ थेस्सलनीकाकर अध्याय २.

पण येशूने भाकित केले होते की या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीला खऱ्‍या उपासनेची पुनर्स्थापना होईल. येशूच्या भविष्यवाणीनंतर जवळपास १,९०० वर्षांनी, आपल्या काळामध्ये यहोवाचे साक्षीदार त्यांच्या जागतिक कार्यामध्ये ही पुनर्स्थापना दिसून येत असल्याचे मानतात. याचे कारण पुढील पानांवर विवेचीत करण्यात आले आहे.

● ख्रिस्ती मंडळीची स्थापना व वाढ कशी झाली?

● त्या मंडळीमध्ये देखरेख कशी केली जात असे?

● पहिल्या शतकातील ख्रिस्तीजन कोणत्या गोष्टींमुळे स्पष्टपणे भिन्‍न असल्याचे ओळखून येत?

[७ पानांवरील नकाशा]

(For fully formatted text, see publication)

काळा समुद्र

कॅस्पियन समुद्र

भुमध्य समुद्र

तांबडा समुद्र

पर्शियाची खाडी

पहिल्या शतकात सुवार्ता या क्षेत्रात पोहंचली गेली

इटली

रोम

ग्रीस

माल्टा

क्रेत

बिथिनिया

गलतिया

आशिया

कप्पदुकिया

सिलिसिया

या क्षेत्रातील काही जणांनी विश्‍वास ग्रहण केला

लिबुवा

मिसर

इथोपिया

अरेबिया

मेदिया

पार्थिया

बाबेलोन

मेसोपोटेमिया

एलाम

कुप्र

अराम

इलरीकम्‌

इस्त्राएल

यरुशलेम

[७ पानांवरील चित्रं]

आरंभीच्या ख्रिश्‍चनांनी देवाच्या वचनाचा प्रचार धैर्याने केला खिस्तीजन जेथे कोठे प्रवास करीत तेथे समविश्‍वासू जन त्यांचे आपल्या घरी स्वागत करीत