पूर्ण वेळेचे उपाध्याय प्रचार कार्यात पुढाकार घेतात
पूर्ण वेळेचे उपाध्याय प्रचार कार्यात पुढाकार घेतात
तुम्हाला सर्वप्रथम भेट देणारा कदाचित यहोवाचा साक्षीदार बहुधा पूर्ण वेळेचा पायनियर सेवक वा मिशनरी असावा. यहोवाच्या साक्षीदारांमध्ये पगारी सेवक नसल्याने, हे लोक पूर्ण वेळेची सेवा कशी करू शकतात याविषयी तुम्हाला कुतुहूल वाटले असेल.
समर्पित व बाप्तिस्मा घेतलेले यहोवाचे सर्व साक्षीदार उपाध्याय असतात. परंतु त्यातील बहुतेकांना कौटुंबिक वा इतर बंधनांमुळे आठवड्यात मोजक्या तासांपेक्षा अधिक वेळ या उपाध्यपणात देता येत नाही. असे असले तरी, जगातल्या हजारो साक्षीदारांनी आपल्या राहणीमानाची पातळी खाली आणली आहे. असे केल्याने अर्ध-वेळ काम करून ते आपल्या थोड्याशा गरजा भागवू शकतात व मग उपाध्यपणात वर्षातून १,००० किंवा अधिक तास देऊ शकतात.
पूर्ण वेळेच्या पायनियर सेवकांपाशी स्वतःसाठी खर्च करण्यास फार पैसा नसतो हे खरे. पण, त्यांच्या दृष्टीने, देवाचे राज्य मिळविण्यासाठी झटण्याचा हा एक मार्ग आहे, आणि त्यांना अनेक फायदेहि मिळतात. देवाच्या वचनाविषयी लोकांशी महिन्याकाठी जवळपास ९० तास बोलणे हाच एक उत्तम अनुभव आहे. पूर्णवेळेचा सेवक, उपाध्यपणातील आपले कौशल्य वाढवितो व आस्थेचा योग्यरित्या पाठपुरावा करण्यास त्याच्यापाशी वेळही असतो. यामुळे अतिशय उत्तेजनादायक परिणाम मिळतात. त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण होतात व त्यांच्याजवळ जे आहे त्याची त्यांना कदर आहे.—मत्तय ६:३३.
१९४३ च्या फेब्रुवारीत वॉचटावर संस्थेने वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियड नावाचे विद्यालय स्थापन केले. अनुभवी पूर्ण वेळेच्या पायनियर सेवकांना परदेशांमध्ये मिशनरी म्हणून काम करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचा उद्देश त्यात होता. या पाच महिन्यांच्या शिक्षणक्रमात परदेशातील क्षेत्रात सेवेच्या तयारीच्या दृष्टीने पवित्र शास्त्राचा कसोशीचा अभ्यास, तसेच पवित्र शास्त्रातील इतिहास, यहोवाची संस्था व इतर संबंधित विषयांचा अभ्यास असतो.
मिशनरी म्हणून नियुक्त झालेल्या जागेपर्यंत जाण्याचा प्रवासखर्च संस्था देते. तसेच मिशनरी निवास स्थानामध्ये भोजन व राहण्याची
अगदी साधी सोयही करते. संस्था प्रत्येक मिशनऱ्याला खाजगी खर्चासाठी लहानसा भत्ताही देते. आळीपाळीने खरेदी, स्वयंपाक व साफसफाई करून मिशनरी आपल्या निवास स्थानाची व्यवस्था ठेवतात. एवढ्या वाजवी कामाने, घरोघर प्रचार करण्यास व आस्था दाखवणाऱ्या लोकांचा पवित्र शास्त्र अभ्यास घेण्यास दर महिन्याला निदान १४० तास देणे मिशनऱ्यांना शक्य होते.अनेक मिशनरी, त्यांचे कुटुंब व घरापासून हजारो मैल दूर नेमले जातात. त्यांना वेगळ्या राहणीमानाची, संस्कृतीची, जेवणाची, हवामानाची व दुसरी भाषा बोलण्याची सवय करावी लागते. त्यांना लोकांविषयी प्रेम असल्याने व देवाच्या राज्याबद्दल शिकण्यास लोकांना मदत करण्याची तीव्र इच्छा असल्याने ते हे काम करीत आहेत.
१९४३ पासून १९८५ पर्यंत वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडमध्ये ८० वर्ग चालले व तेथून ६,००० हून अधिक मिशनरी बाहेर पाठवले गेले. संस्थेच्या देखरेखीखाली त्यांनी संपूर्ण आफ्रिका, मध्य व दक्षिण अमेरिका, पौर्वात्य देश व दक्षिण प्रशांत सागरातील बेटांमध्ये पवित्र शास्त्राच्या अभ्यासाचा प्रसार करण्यात पुढाकार घेतला आहे. तसेच युरोपमध्येहि त्यांनी बरेच काही साध्य केले आहे.
पायनियर वा मिशनरी म्हणून पूर्ण वेळेचे अथवा थोडा वेळ उपाध्यपण करीत असले तरी यहोवाचे साक्षीदार आर्थिक लाभाविना सेवा करतात. अनंत जीवनाकडे नेणारे ज्ञान मिळवण्यात इतरांना मदत करण्यासाठी ते स्वतःचा वेळ, पैसा व जीवन खर्च करतात.—योहान १७:३.
● आपला सर्व वेळ उपाध्यपणामध्ये घालवणे यहोवाच्या काही साक्षीदारांना कसे शक्य आहे व ते असे का करतात?
● मिशनरी कामाकरिता उपाध्यायांना प्रशिक्षण कसे दिले जाते?
● मिशनऱ्यांना त्यांच्या परदेशातील कार्यामध्ये कशी मदत मिळते?
[२२ पानांवरील चित्रं]
डावीकडेः गिलियड स्कूलमधील वर्ग, ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु.एस.ए.
उजवीकडेः पापुआ न्यू गिनिआ येथे मिशनरी देवाचे वचन शिकवीत असताना
[२३ पानांवरील चित्रं]
वेगवेगळ्या देशांमध्ये पायनियर सेवक व मिशनरी देवाच्या वचनाचा प्रचार करताना
ब्राझिल
डॉमिनिकन रिपब्लिक
स्पेन
सिएरा लिओन, आफ्रिका