प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन देण्यासाठी सभा
प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन देण्यासाठी सभा
शिक्षण घेण्यासाठी तसेच उभारणीकारक संगतीचा आस्वाद घेण्यासाठी सुरुवातीचे ख्रिस्तीजन बहुधा खाजगी घरांमध्ये एकत्र जमत असत. सध्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्या आठवड्यातून तीन वेळा जमतात. यातील कोणत्याहि सभेला येण्याचे तुम्हाला आमंत्रण आहे. त्यांच्या सभांमध्ये कर्मकांड नसून त्यामध्ये ईश्वरी शिक्षणावर भर असतो. मंडळीच्या सभा गीत व प्रार्थनेने सुरू होतात तसेच संपतात. उपस्थितीसाठी मूल्य आकारले जात नाही; ती सर्वांना खुली असते.—प्रे. कृत्ये ४:२३-३१; १४:२२; १५:३२, ३५; रोमकर १६:५; कलस्सैकर ४:१५.
तुम्ही प्रथम ज्या सभेला उपस्थित राहाल ती बहुधा पवित्र शास्त्राच्या शिकवणी, भविष्यवाणी किंवा ख्रिस्ती जीवनविषयक उपदेशासंबंधी ४५ मिनिटांची जाहीर भाषणाची सभा असेल. या भाषणानंतर मंडळीच्या अभ्यासासाठी विशेष योजलेल्या टेहळणी बुरुज मासिकातील एका लेखाच्या आधारे पवित्र शास्त्राचा अभ्यास असतो. हा अभ्यास असा होतोः टेहळणी बुरुज मधील एक परिच्छेद वाचला जातो, त्यावर संचालक प्रश्न विचारतो. श्रोते हात वर करून त्याचे उत्तर देण्याची तयारी दर्शवितात. बहुतेक वेळी प्रत्येक परिच्छेदावर अनेक अभिप्राय दिले जातात. ही सभा एक तास चालते.
सप्ताहात पुढे ४५ मिनिटांच्या इतर दोन सभा भरतात. यापैकीची एक ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा ही असते. पवित्र शास्त्रातील विषयांवर माहिती कशी मिळवावी व ती परिणामकारकरित्या कशी शिकवावी याचे प्रशिक्षण या सभेत दिले जाते. २१ मिनिटांच्या विशेष शिक्षणानंतर, आधी नेमणूका देण्यात आलेले विद्यार्थी लहानसे भाषण देतात. प्रत्येक भाषणानंतर शाळा देखरेखे विद्यार्थ्याला अधिक प्रगती कशी करता येईल ते दाखवणारा सल्ला देतात. या शाळेमध्ये वापरण्यासाठी अनेक पाठ्यपुस्तके बनवण्यात आलेली आहेत. नियमितपणे सभेला उपस्थित राहणाऱ्यांना, खिस्ती तत्वांना अनुसरुन जीवनातील व्यवहार करीत असल्यास, शाळेत नाव नोंदवता येते.
या सभेनंतर होणाऱ्या सभेला सेवा सभा अथवा कार्य मार्गदर्शक सभा असे म्हणतात. दारोदार सुवार्ता सांगणे तसेच सेवेच्या इतर वैशिष्ठ्यांसंबंधी माहिती देणाऱ्या तीन चार
भागांची ही सभा असते. भाषण, चर्चा, प्रात्यक्षिके व श्रोत्यांच्या काहीशा सहभागाने हे भाग सादर केले जातात. या सभेचा कार्यक्रम, वॉचटावर संस्था दर महिन्याला प्रकाशित करीत असलेल्या आमची राज्य सेवा या चार पानांच्या सूचना पत्रिकेवर आधारीत असतो.मंडळीच्या क्षेत्रात बहुधा खाजगी घरांमध्ये छोट्याश्या गटांनी होणारा अभ्यास ही आठवड्यातील तिसरी सभा होय. हा अभ्यास पवित्र शास्त्र तसेच संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या एखाद्या पुस्तकावर आधारीत असतो. गट छोटा असल्याने चर्चेमध्ये भाग घेण्याची संधी सर्वांना मिळते. तसेच उपस्थित लोकांना एकमेकांची जास्त चांगली ओळख करून घेण्याचीही सुंदर संधी मिळते.
बहुतेक मंडळ्या, यहोवाच्या साक्षीदारांनी बांधलेल्या राज्य सभागृहात त्यांच्या सभा भरवतात. स्वतः साक्षीदारांच्या स्वेच्छादानातून खर्च भागवला जातो. शिवाय बरेच वेळा स्वयंसेवक विनामूल्य सेवा करतात. दान करण्याची इच्छा असलेल्यांसाठी सर्व सभांच्या जागी दानपात्रे असतात.
मंडळीच्या सभांमुळे यहोवाच्या साक्षीदारांना इब्रीयांस पत्र १०:२४, २५ मध्ये दिलेला उपदेश पाळण्यास मदत होते. तेथे म्हटले आहेः “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे [आपल्याला] दिसते तसतसा तो अधिक करावा.”
● यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांमध्ये सुरुवातीच्या ख्रिस्ती सभांमधील कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात?
● साक्षीदार नियमितपणे भरवीत असलेल्या पाच सभांमध्ये काय सादर केले जाते याची रुपरेखा सांगा.
● सभागृहे कशी मिळविली जातात?
[१४ पानांवरील चित्रं]
अमेरिकेत एक वडील वॉचटावर अभ्यास घेत आहे
ईश्वरशासित उपाध्यपणाच्या शाळेतील एक दृश्य, फेअरो बेटे
खाजगी घरात होणारा गटाचा अभ्यास, यॅप
यु.एस.ए. मधील न्यू ब्रॉनफेल्स, टेक्सस येथील राज्य सभागृह, हे यहोवाच्या साक्षीदारांनी दोन दिवसात बांधून काढले
[१५ पानांवरील चित्रं]
विविध देशातील राज्य सभागृहे
जपान
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रीया
स्पेन