व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

फिरते देखरेखे सत्यातील सहकारी

फिरते देखरेखे सत्यातील सहकारी

फिरते देखरेखे सत्यातील सहकारी

पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळीमध्ये मंडळ्यांची उभारणी करण्यासाठी त्यांना भेटी देणारे फिरते देखरेखे असत. मंडळ्यामधील लोकांनी देवाला शोभेलसे वागावे यात मदत करता यावी म्हणून या फिरत्या देखरेख्यांनी वैयक्‍तिक स्वार्थावर डोळा न ठेवता, स्वतःस देऊ केले.—प्रे. कृत्ये ११:२३, २४; १४:२१, २२; १५:३२; २०:२, ३१-३५; फिलिप्पैकर २:२०-२२, २९; १ थेस्सलनीकाकर २:५-१२.

आजच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यांनाही फिरत्या देखरेख्यांचे फायदे मिळतात. या पुरुषांना यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रचारकार्यात व देखरेखे म्हणून अनेक वर्षांचा अनुभव असतो. पूर्ण वेळ सेवेसाठी स्वतःस सादर करण्यासाठी त्यांनी कामधंदा व कौटुंबिक जबाबदाऱ्‍यांपासून मोकळीक मिळवली आहे. लग्न झालेल्यांमध्ये बहुधा बायकाहि आपल्या पतीसह पूर्ण वेळच्या सेवेमध्ये सहभागी झाल्या आहेत.

एका विभागीय देखरेख्याची १८ ते २५ मंडळ्यांच्या विभागाकडे लक्ष देण्यास नियुक्‍ती होते. ते दर वर्षी प्रत्येक मंडळीला दोनदा भेटी देतात व दोन वा तीन वर्षांनी त्यांची दुसऱ्‍या विभागावर नियुक्‍ती होते. अशा रितीने वेगवेगळ्या विभागीय देखरेख्यांच्या भिन्‍न अनुभवांचा तसेच गुणांचा मंडळ्यांना लाभ होतो.

विभागीय देखरेखे मंडळीची आध्यात्मिक स्थिती व कार्य तपासतात. ते अनेक भाषणे देतात व मंडळीची सेवा करण्यात स्थानिक वडील व उपाध्य सेवकांना अधिक प्रगति कशी करता येईल याविषयी विचार करण्यासाठी ते त्यांना भेटतात. त्यांच्या भेटीच्या आठवड्यामध्ये ते व लग्न झाले असल्यास त्यांची पत्नीहि, स्थानिक साक्षीदारांना घरोघरच्या कार्यात सुधारणा करण्यास मदत करण्यासाठी त्यांच्या बरोबर जातात. नवीनच आस्था दाखवणाऱ्‍यांना विश्‍वासामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही विनंति करू शकता.

प्रांतिय देखरेख्याची आध्यात्मिक पात्रता व अनुभवाची पार्श्‍वभूमि अशीच असते. ते एका विभागाकडून दुसऱ्‍या विभागाकडे जातात व दर आठवड्याला विभागीय संमेलनासंबंधी सेवा करतात. ते भेट देत असलेल्या विभागाच्या एका मंडळीतील साक्षीदारांसह ते व त्यांची पत्नी क्षेत्रकार्यही करतात. ते विभागीय संमेलनाच्या शेवटच्या तयारीची देखरेख करतात व संमेलनामध्ये जाहीर भाषणासहित अनेक भाषणे देतात.

मंडळी वा विभागाची भेट आटोपली की हे फिरते देखरेखे सहा महिन्यात सर्व मंडळ्या वा विभागांना भेटी देणे पूर्ण होईपर्यंत, पुढील मंडळी वा विभागाला जातात आणि मग, पुन्हा पहिल्या मंडळी वा विभागापासून सुरुवात करतात. सर्व ठिकाणी ते एकच कार्यक्रम पाळतात.

अनेक देशांमध्ये फिरते देखरेखे मोटारीने वा सार्वजनिक वाहनांनी प्रवास करतात. इतर देशांमध्ये ते सायकल वापरतात वा चालत जातात. संस्था फिरत्या देखरेख्यांना वाहनखर्च देते तसेच त्यांच्या वैयक्‍तिक गरजांसाठी त्यांना व त्यांच्या पत्नीला लहानसा भत्ता देते. बहुधा फिरते देखरेखे व त्यांच्या पत्नीला प्रत्येक मंडळी उतरण्याची जागा व भोजन देते.

अशा सेवेला स्वार्थत्यागी भावनेची गरज असते. मंडळीवर खर्चाचा मोठा भार न टाकता त्यांची सेवा करण्याचा फिरते देखरेखे व त्यांच्या पत्नींचा ठाम निश्‍चय असतो.—१ थेस्सलनीकाकर २:९.

● पहिल्या शतकातील ख्रिस्ती मंडळ्यांमध्ये फिरत्या देखरेख्यांचा कोणता उद्देश होता?

● आज या सेवेसाठी फिरते देखरेखे कसे पात्र व प्राप्त झाले आहेत?

● विभागीय व प्रांतिय देखरेख्यांची सेवा व त्यांचे जीवन वर्णन करा.

[२० पानांवरील चित्रं]

प्रांतिय देखरेखे विभागीय संमेलनाला उद्देशून भाषण देत आहेत

[२१ पानांवरील चित्रं]

विभागीय देखरेखे घरोघरच्या प्रचार कार्यात सूचना देतात, मंडळीच्या वडीलांबरोबर बोलतात, नव्या आस्थेवाईकांच्या पवित्र शास्त्र अभ्यासाला भेट देतात व मंडळीत भाषणे देतात