व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

स्वेच्छादानाचा आर्थिक आधार

स्वेच्छादानाचा आर्थिक आधार

स्वेच्छादानाचा आर्थिक आधार

याआधी वर्णन केलेली सर्व कामे स्वयंसेवकांच्या मदतीने होतात हे आपण पाहिलेच आहे व त्याच्यामुळे खर्च कमी होतो. यहोवाचे साक्षीदार घरोघरची सेवा व साहित्य वितरण स्वेच्छेने करतात. ते स्वतःचा खर्च करतात. उपाध्य सेवकांच्या मदतीने मंडळ्यांची देखरेख करणाऱ्‍या वडीलांना त्यांच्या कामासाठी काहीही मोबदला मिळत नाही. तेच आपला खर्च भागवतात.

नियमन मंडळाचे सदस्य आणि पवित्र शास्त्रे व संबंधित साहित्याचे लिखाण व निर्मिती करण्यासाठी पूर्ण वेळ कार्य करणाऱ्‍या इतरांनाहि फक्‍त राहण्यासाठी खोली, भोजन व खर्चासाठी लहानसा भत्ता मिळतो. तसाच पूर्ण वेळेच्या फिरत्या देखरेख्यांनाहि मिळतो.

साहित्यासाठी मिळालेल्या अल्प दानामध्ये बहुधा सामग्री, उत्पादन व वितरणाचा मूलभूत खर्च भागतो. बाकी सर्व खर्च, यहोवाच्या साक्षीदारांनी स्वतः दानाने वा कायदेशीर मृत्युपत्राद्वारे केलेल्या आर्थिक मदतीने भागतो.

स्थानिक सभा असोत वा संमेलने असोत, यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व सभांमध्ये दान करू इच्छिणाऱ्‍यांसाठी दानपात्रांची सोय केलेली असते. दानपात्र फिरविले जात नाही. कोणत्याहि प्रकारची फी किंवा दशमांश आकारला जात नाही. शास्त्रवचनात सांगितल्याप्रमाणे प्रत्येकजण आपल्या अंतःकरणात ठरवल्याप्रमाणे देऊ शकतो.—२ करिंथकर ८:१२; ९:७.

● यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व कार्याला आर्थिक साह्‍य कसे मिळते?

[२८ पानांवरील चित्रं]

राज्य कार्यासाठी अनुदान

जॉन ए. विटनेस यांची शेवटची इच्छा व प्रतिज्ञा

मी, जॉन ए. विटनेस, राहणार