व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुमच्या समाजासाठी असलेले सुवार्तेचे व्यावहारिक मूल्य

तुमच्या समाजासाठी असलेले सुवार्तेचे व्यावहारिक मूल्य

तुमच्या समाजासाठी असलेले सुवार्तेचे व्यावहारिक मूल्य

आजच्या जगात आपण अनेकदा अशाप्रकारचे बोलणे ऐकतो: “ख्रिस्ती धर्माची तत्त्वे व्यावहारिक नाहीत. आजच्या गुंतीगुंतीच्या समाजात त्याप्रमाणे वागणे मुळीच शक्य नाही.” तथापि, मोहनदास गांधी व भारताचे माजी ब्रिटिश व्हाईसरॉय, लॉर्ड अर्विन यांच्या संभाषणात यापासून फार वेगळे मत व्यक्‍त करण्यात आल्याचा अहवाल आहे. ग्रेट ब्रिटन आणि भारत या दोन राष्ट्रांमधील समस्या कशाप्रकारे सोडवता येतील असे लॉर्ड अर्विन यांनी गांधींना विचारल्याचे म्हटले जाते. तेव्हा गांधींनी बायबल उचलले व त्यातून मत्तयाचा पाचवा अध्याय उघडून म्हटले: “डोंगरावरील प्रवचनांत ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणीबद्दल तुमच्या व माझ्या देशाचे एकमत होईल तेव्हा आपण फक्‍त आपल्याच देशांचे नव्हे तर सर्व जगाचे प्रश्‍न सोडवलेले असतील.”

या प्रवचनात, आध्यात्मिकता शोधण्याबद्दल आणि सौम्य, शांतीमय, दयाळू व धार्मिकतेचे चाहते होण्याविषयी सांगितले आहे. या प्रवचनात, फक्‍त खून करण्याचाच निषेध केलेला नाही तर इतरांबरोबर वागताना राग व्यक्‍त करण्याचा तसेच फक्‍त व्यभिचाराचाच नव्हे तर कामासक्‍त विचारांचा देखील निषेध करण्यात आला आहे. बेजबाबदारपणे घटस्फोट घेण्याच्या कृत्यांचा देखील या प्रवचनात निषेध करण्यात आला आहे. अशाप्रकारच्या घटस्फोटामुळे कुटुंबांची ताटातूट होते, विनाकारण मुलांना बळी पडावे लागते. या प्रवचनात असे म्हटले आहे, की ‘तुम्हाला नापसंत करणाऱ्‍यांवरसुद्धा प्रेम करा, गरजवंतांना मदत करा, दयेविना इतरांचा न्याय करू नका, इतरांनी तुमच्यासोबत ज्याप्रकारे वागले पाहिजे त्याप्रकारे तुम्ही आधी त्यांच्याशी वागा.’ या सल्ल्यानुसार आपण वागलो तर आपल्याला बहुत लाभ मिळतील. समाजातील जितके लोक या सल्ल्याचे पालन करतील तितकाच उत्तम समाज बनेल!

यहोवाच्या साक्षीदारांचे वागणे प्रभावकारी आहे. बायबल त्यांना विवाहाचा आदर करण्यास शिकवते. त्यांच्या मुलांना योग्य सिद्धान्ताचे प्रशिक्षण दिले जाते. कुटुंबाच्या महत्त्वावर जोर दिला जातो. ऐक्य असलेली कुटुंबे तुमच्या समाजाला तसेच तुमच्या राष्ट्राला अमूल्य देणगी अशी आहेत. इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यात, कौटुंबिक बंधने कमजोर झाल्यामुळे व अनैतिकता वाढल्यामुळे जागतिक सत्ता कोलमडल्या. यहोवाचे साक्षीदार जितक्या अधिक लोकांना व कुटुंबांना ख्रिस्ती तत्त्वांनुसार जगण्यास प्रभावीत करतील तितक्याच कमी प्रमाणात अपराध, अनैतिकता व हिंसा तुमच्या समाजात असेल.

समाजांना व राष्ट्रांना सतावणाऱ्‍या समस्यांमधली सर्वात मोठी समस्या म्हणजे जातीय कलुषितपणा. उलटपक्षी, प्रेषित पेत्राने म्हटले: “देव पक्षपाती नाही, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” तसेच पौलाने लिहिले: “यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरूष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्वजण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहा.” (प्रेषितांची कृत्ये १०:३४, ३५; गलतीकर ३:२८) यहोवाच्या साक्षीदारांना हे मान्य आहे. म्हणूनच, त्यांच्या जागतिक मुख्यालयात, शाखा दप्तरांत आणि मंडळ्यांमध्ये सर्व वंशाचे व वर्णांचे लोक एकत्र राहतात व काम करतात.

आफ्रिकेत, काही विशिष्ट जमाती आहेत ज्या एकत्र आल्या की त्यांच्यामध्ये चकमकी ह्‍या होतातच. परंतु यहोवाच्या साक्षीदारांच्या तेथील संमेलनांमध्ये अनेक वंशांतील लोक पूर्ण एकोप्यात व उबदार बंधुत्वात एकत्र उठतात-बसतात व उपासना करतात. हे पाहिल्यावर सरकारी अधिकाऱ्‍यांना आश्‍चर्य वाटते. खऱ्‍या ख्रिस्ती धर्माच्या ऐक्य घडवून आणणाऱ्‍या उदाहरणावर न्यूयॉर्कमधील ऑगस्ट २, १९५८ तारखेच्या ॲमस्टरडम न्यूजने भाष्य केले. हे भाष्य, आधी उल्लेख केलेल्या न्यूयॉर्क शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय संमेलनातील साक्षीदारांना पाहून करण्यात आले होते. या संमेलनाला अडीच लाखापेक्षा अधिक साक्षीदार उपस्थित होते.

“जीवनातील सर्व स्तरांतून व जगातील सर्व भागांतून आलेले निग्रो, गोरे आणि पौर्वात्य देशातील लोक अगदी आनंदाने व मुक्‍तपणे एकमेकांबरोबर मिसळत होते. . . . . १२० राष्ट्रांतील हे उपासक साक्षीदार एकत्र राहून शांतीने उपासना करत आहेत; आणि असे करणे किती सोपे आहे, हे ते अमेरिकी लोकांना दाखवून देत आहेत. . . . . हे संमेलन, सर्व प्रकारचे लोक एकत्र राहून कसे काम करू शकतात याचे एक ज्वलंत उदाहरण आहे.”

पुष्कळ लोकांचे असे म्हणणे असेल, की ख्रिस्ती धर्माची तत्त्वे आजच्या आधुनिक जगासाठी व्यावहारिक नाहीत. परंतु, ख्रिस्ती तत्त्वांच्या व्यतिरिक्‍त आणखी कोणती गोष्ट व्यावहारिक ठरली आहे का किंवा ठरू शकते का? तुमच्या समाजातील लोकांनी ख्रिस्ती तत्त्वांचा अवलंब केल्यास त्यांना त्याचे खरे मूल्य समजून येईल; या तत्त्वांच्या आधारावरच, संपूर्ण पृथ्वीवरील “सर्व राष्ट्रे, वंश, [व] लोक” यांना मानवजातीवर राज्य करणाऱ्‍या देवाच्या राज्यात एकत्र केले जाईल.—प्रकटीकरण ७:९, १०.

[२३ पानांवरील संक्षिप्त आशय]

सर्व वंशाचे, वर्णाचे लोक एकत्र काम करतात

[२४ पानांवरील संक्षिप्त आशय]

ख्रिस्ती धर्म व्यावहारिक आहे. आणखी कशानेही फरक पडला आहे का?