तुम्हाला आमचे निमंत्रण
तुम्हाला आमचे निमंत्रण
या माहितीपत्रकातून तुमच्याशी बोलण्यास आम्हाला आनंद वाटला. यहोवाच्या साक्षीदारांविषयी अधिक माहिती करून घेण्यास तुम्हाला आनंद झाला असेल अशी आम्ही आशा करतो. आम्ही तुम्हाला आमच्या स्थानिक राज्य सभागृहात येण्याचे आमंत्रण देऊ इच्छितो. या निमंत्रणाचा कृपया स्वीकार करा. आमच्या सभा कशा चालवल्या जातात ते पाहा. ख्रिस्ताच्या राजवटीत पृथ्वीवरील परादीसची सुवार्ता इतरांना सांगण्याचा आम्ही कसा प्रयत्न करतो ते पाहा.
देवाने अभिवचन दिले आहे. “ज्यामध्ये नीतिमत्व वास करिते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहो.” (२ पेत्र ३:१३) अनेक शतके सरली आहेत. प्रतिक्षेचा काळ संपत आला आहे. हे जगातील परिस्थितीवरून आपल्याला दिसून येते.
प्रेषित पौलाने म्हटले, ‘प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन द्या, आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांस बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसतसा तो अधिक करावा.’ (इब्री लोकांस १०:२४, २५) आमच्यासोबत सहवास ठेवण्याद्वारे पौलाच्या या सल्ल्याचे पालन करण्यासाठी आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत.