व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

त्यांचा काय विश्‍वास आहे?

त्यांचा काय विश्‍वास आहे?

त्यांचा काय विश्‍वास आहे?

यहोवाच्या साक्षीदारांचा, स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता सर्वसमर्थ देव यहोवा याच्यावर विश्‍वास आहे. आपल्या सभोवतालच्या विश्‍वामध्ये अगदी गुंतागुंतीने रचलेल्या गोष्टींचे अस्तित्वच याची तर्कशुद्धपणे ग्वाही देते, की या सर्व गोष्टी बनवणारा एक सर्वश्रेष्ठ बुद्धिमान व शक्‍तिमान निर्माणकर्ता आहे. ज्याप्रमाणे पुरूष आणि स्त्रियांच्या कार्यांवरून त्यांचे गुण आपल्याला दिसतात तसेच यहोवा देवाच्या निर्मितीवरून आपल्याला त्याचे गुण पाहायला मिळतात. “सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्‍य गोष्टी . . . निर्मिलेल्या पदार्थांवरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहेत,” असे बायबल सांगते. शिवाय, “आकाश देवाचा महिमा वर्णिते.”—रोमकर १:२०; स्तोत्र १९:१-४.

मातीची भांडी, टीव्ही, संगणक यांसारख्या वस्तू उद्देशाविना बनवल्या जात नाहीत. पृथ्वी आणि तिच्यावरील वनस्पती तसेच प्राणी जीवनाची सृष्टी तर या वस्तूंपेक्षा कितीतरी पटीने अद्‌भुत आहेत. एक हजार कोटी पेशी असलेल्या आपल्या मानवी शरीराची घडण आणि आपण ज्यामुळे विचार करू शकतो तो आपला मेंदू देखील आपल्या आकलनापलीकडे, चमत्कारिक आहे! मानवाने निर्मिलेल्या वस्तूंमागे त्यांचा जर काही उद्देश आहे तर ही भयप्रेरक सृष्टी निर्माण करण्यामागे यहोवा देवाचा देखील निश्‍चितच एक उद्देश असेल, नाही का? होय, हे सर्व बनवण्यामागे यहोवाचा एक उद्देश आहे. नीतिसूत्रे १६:४ म्हणते: “परमेश्‍वराने [“यहोवाने”, NW] सर्व काही विशेष उद्देशाने निर्माण केले आहे.”

पृथ्वी निर्माण करण्यामागे यहोवाचा एक उद्देश होता. याविषयी त्याने पहिल्या मानवी दांपत्याला असे म्हटले: “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका. . . . समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा.” (उत्पत्ति १:२८) हे दांपत्य अवज्ञाकारी बनल्यामुळे, पृथ्वीची आणि तिच्यावरील वनस्पतीची व प्राण्यांची काळजी घेऊ शकतील अशा धार्मिक कुटुंबाने ही पृथ्वी व्यापून टाकण्यात ते अपयशी ठरले. परंतु त्यांनी आज्ञा मोडली म्हणून यहोवाचा उद्देश अयशस्वी ठरत नाही. हजारो वर्षांनंतर असे लिहिण्यात आले: “पृथ्वीचा घडणारा . . . त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” पृथ्वीचा नाश व्हायचा नव्हता तर ती “सदा कायम” राहणार आहे. (यशया ४५:१८; उपदेशक १:४) पृथ्वीविषयी असलेला यहोवाचा उद्देश लवकरच पूर्ण केला जाईल: “माझा संकल्प सिद्धिस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करीन.”—यशया ४६:१०.

यास्तव, यहोवाचे साक्षीदार असा विश्‍वास बाळगतात, की पृथ्वी सर्वकाळ टिकेल आणि यहोवाच्या उद्देशानुसार सुंदर बनवलेल्या या पृथ्वीवर राहण्यासाठी ज्यांना पात्र ठरवले जाईल असे जिवंत आणि मृतांतून जिवंत केलेले लोक सदासर्वकाळ राहतील. सर्व मानवजातीला आदाम आणि हव्वेकडून वारसाने पाप मिळाल्यामुळे सर्वजण पापी आहेत. (रोमकर ५:१२) बायबल आपल्याला सांगते: “पापाचे वेतन मरण आहे.” “आपणास मरावयाचे आहे हे जिवंताला निदान कळत असते; पण मृतांस तर काहीच कळत नाही.” “जो जीव पाप करतो तो मरेल.” (रोमकर ६:२३; उपदेशक ९:५; यहेज्केल १८:४, २०, पं.र.भा.) मग पृथ्वीवरील आशीर्वादांचा उपभोग घेण्याकरता हे पुन्हा जिवंत कसे होतील? येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाद्वारेच केवळ हे शक्य आहे; कारण येशू असे म्हणाला होता: “पुनरूत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्‍वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.” “[“स्मृती,” NW] कबरेतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि . . . बाहेर येतील.”—योहान ५:२८, २९; ११:२५; मत्तय २०:२८.

हे कसे होईल? पृथ्वीवर असताना येशूने ज्या “राज्याच्या सुवार्तेचा” प्रचार करण्यास सुरवात केली होती त्यात याचे वर्णन आहे. (मत्तय ४: १७-२३) परंतु यहोवाचे साक्षीदार आज सुवार्तेचा प्रचार अगदी खास मार्गाने करत आहेत.

[१३ पानांवरील तक्‍ता]

यहोवाच्या साक्षीदारांचा विश्‍वास

विश्‍वास शास्त्रवचनीय कारण

बायबल देवाचे वचन आहे २ तीम. ३:१६, १७;

व ते सत्य आहे २ पेत्र १:२०, २१; योहा. १७:१७

बायबल संप्रदायापेक्षा अधिक विश्‍वसनीय मत्त. १५:३; कलस्सै. २:८

आहे

देवाचे नाव यहोवा आहे स्तो. ८३:१८, पं.र.भा.; यश. २६:४; ४२:८, पं.र.भा.;

निर्ग. ६:३, पं.र.भा.

ख्रिस्त देवाचा पुत्र आहे आणि मत्त. ३:१७; योहा. ८:४२; १४:२८;

देवापेक्षा कनिष्ठ आहे योहा. २०:१७; १ करिंथ. ११:३; १५:२८

ख्रिस्त देवाच्या निर्मितीत ज्येष्ठ कलस्सै. १:१५; प्रकटी. ३:१४

ख्रिस्त क्रुसावर नव्हे तर खांबावर गलती. ३:१३; प्रे. कृत्ये ५:३०

मरण पावला

ख्रिस्ताचे मानवी जीवन आज्ञाधारक मत्त. २०:२८; १ तीम. २:५, ६;

मानवांसाठी खंडणी बलिदान म्हणून १ पेत्र २:२४

देण्यात आले

ख्रिस्ताचे एक बलिदान पुरेसे होते रोम. ६:१०; इब्री ९:२५-२८

ख्रिस्ताला मृतांमधून एक अमर आत्मिक १ पेत्र ३:१८; रोम. ६:९;

व्यक्‍ती असे उठविण्यात आले प्रकटी. १:१७, १८

ख्रिस्ताची उपस्थिती आत्मिक आहे योहा. १४:१९; मत्त. २४:३;

२ करिंथ. ५:१६; स्तो. ११०:१, २

आपण ‘शेवटल्या दिवसांत’ जगत मत्त. २४:३-१४; २ तीम. ३:१-५;

आहोत लूक १७:२६-३०

ख्रिस्ताचे राज्य पृथ्वीवर धार्मिकतेत यश. ९:६, ७; ११:१-५;

आणि शांतीत शासन करील दानी. ७:१३, १४; मत्त. ६:१०

राज्य पृथ्वीवर उत्तम परिस्थिती स्तो. ७२:१-४; प्रकटी. ७:९, १०, १३-१७; २१:३, ४

आणील

पृथ्वीचा कधीही नाश केला जाणार उप. १:४; यश. ४५:१८;

नाही किंवा ती निर्जन होणार नाही स्तो. ७८:६९

देव हर्मगिदोनात सध्याच्या दुष्ट प्रकटी. १६:१४, १६; सफ. ३:८;

व्यवस्थीकरणाचा नाश करील दानी. २:४४; यश. ३४:२; ५५:१०, ११

दुष्टांचा सर्वकाळासाठी नाश केला मत्त. २५:४१-४६; २ थेस्सलनी. १:६-९

जाईल

देवाची स्वीकृती ज्यांना प्राप्त होते योहा. ३:१६; १०:२७, २८; १७:३;

असे लोक सार्वकालिक जीवन प्राप्त मार्क १०:२९, ३०

करतील

जीवनाकडे जाणारा एकच मार्ग आहे मत्त. ७:१३, १४; इफिस. ४:४, ५

आदामाचे पाप मानवी मरणाला रोम. ५:१२; ६:२३

कारणीभूत आहे

मरणानंतर शरीरातील काहीही उप. ९:१०; स्तो. ६:५; १४६:४;

अस्तित्वात राहात नाही योहा. ११: ११-१४

मृत्यूनंतर यातना नाही ईयो. १४:१३; प्रकटी. २०:१३, १४

मृतांसाठी पुनरुत्थानाची आशा आहे १ करिंथ. १५:२०-२२; योहा. ५:२८, २९; ११:२५, २६

आदामामुळे आलेले मरण नाहीसे होईल १ करिंथ. १५:२६, ५४; प्रकटी. २१:४;

यश. २५:८

केवळ १,४४,००० जणांचा लहान कळप लूक १२:३२; प्रकटी. १४:१,;

स्वर्गात जाऊन ख्रिस्ताबरोबर राज्य करतो १ करिंथ. १५:४०-५३; प्रकटी. ५:९, १०

१,४४,००० जण देवाचे आत्मिक पुत्र १ पेत्र १:२३; योहा. ३:३;

म्हणून नव्याने जन्मलेले आहेत प्रकटी. ७:३, ४

नवीन करार आध्यात्मिक इस्त्राएलांसोबत यिर्म. ३१:३१; इब्री ८:१०-१३

करण्यात आला

ख्रिस्ताची मंडळी ही स्वतः ख्रिस्तावरच इफिस. २:२०; यश. २८:१६;

बांधलेली आहे मत्त. २१:४२

प्रार्थना फक्‍त यहोवालाच ख्रिस्ताद्वारे योहा. १४:६, १३, १४;

केल्या पाहिजेत १ तीम. २:५

उपासनेत मूर्तींचा उपयोग केला निर्ग. २०:४, ५; लेवी. २६:१;

जाऊ नये १ करिंथ. १०:१४; स्तो. ११५:४-८

भूतविद्येपासून दूर राहिले पाहिजे अनु. १८:१०-१२; गलती. ५:१९-२१; लेवी. १९:३१

सैतान जगाचा अदृश्‍य अधिपती आहे १ योहा. ५:१९; २ करिंथ. ४:४; योहा. १२:३१

ख्रिश्‍चनांचा संमिश्र विश्‍वास चळवळीत २ करिंथ. ६:१४-१७; ११:१३-१५;

कोणताच भाग असू नये गलती. ५:९; अनु. ७:१-५

ख्रिश्‍चनाने स्वतःला जगापासून याको. ४:४; १ योहा. २:१५;

वेगळे ठेवावे योहा. १५:१९; १७:१६

देवाच्या नियमांच्या विरोधात नसणाऱ्‍या मत्त. २२:२०, २१; १ पेत्र २:१२; ४:१५

मानवी नियमांचे पालन करा

तोंडावाटे किंवा नसांतून शरीरात रक्‍त उत्प. ९:३, ४; लेवी. १७:१४;

घेतल्याने देवाच्या नियमांचा भंग होतो प्रे. कृत्ये १५:२८, २९

बायबलमधील नैतिक नियमांचे पालन १ करिंथ. ६:९, १०; इब्री १३:४;

करणे आवश्‍यक आहे १ तीम. ३:२; नीती. ५:१-२३

शब्बाथाचे पालन केवळ यहुद्यांकरताच अनु. ५:१५; निर्ग. ३१:१३; रोम. १०:४;

होते व मोशेच्या नियमशास्त्रासोबत त्याचा गलती. ४:९, १०; कलस्सै. २:१६, १७

अंत झाला

पाळक वर्ग व खास पदव्या अनुचित मत्त. २३:८-१२; २०:२५-२७;

आहेत ईयो. ३२:२१, २२, NW

मनुष्याची उत्क्रांती झाली नाही तर यश. ४५:१२; उत्प. १:२७;

निर्मिती करण्यात आली मत्त. १९:४

देवाची सेवा करताना ख्रिस्ताने घालून १ पेत्र. २:२१; इब्री १०:७;

दिलेल्या उदाहरणाचे अनुकरण केले पाहिजे योहा. ४:३४; ६:३८

पाण्यात पूर्णपणे बुडवून घेतलेला मार्क १:९, १०; योहा. ३:२३;

बाप्तिस्मा समर्पणाचे प्रतीक आहे प्रे. कृत्ये १९:४, ५

ख्रिश्‍चन आनंदाने शास्त्रवचनीय रोम. १०:१०; इब्री १३:१५;

सत्याची साक्ष जाहीररीत्या देतात यश. ४३:१०-१२

[१२ पानांवरील चित्र]

पृथ्वी . . . यहोवाने निर्माण केलेली . . . मानवाने काळजी घेतलेली . . . अनंतकाळच्या लोकवस्तीसाठी बनवलेली