त्यांची जगव्याप्त संघटना आणि कार्य
त्यांची जगव्याप्त संघटना आणि कार्य
साक्षकार्य होत असलेल्या २३५ पेक्षाही अधिक राष्ट्रांमध्ये या कार्याविषयीचे निर्देशन देण्यासाठी अनेक दुवे आहेत. सर्व निर्देशन न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन येथील जागतिक कार्यालयातील नियमन मंडळाकडून येते. संपूर्ण जगभरातील विविध प्रदेशांतील शाखा दफ्तरांच्या प्रतिनिधींशी विचार-विनिमय करण्यासाठी नियमन मंडळ दर वर्षी आपल्या प्रतिनिधींना पाठवते. शाखा दप्तरांमध्ये, तीन ते सात सदस्यांची मिळून बनलेली एक शाखा समिती असते जी त्यांच्या अधिकार क्षेत्राखाली असलेल्या राष्ट्रांतील कार्याची देखरेख करते. काही शाखांमध्ये, छापण्याच्या सोयी आहेत; तेथे वेगाने छपाई करणारी काही छपाईयंत्रे देखील आहेत. प्रत्येक शाखेच्या देखरेखीखाली असलेली राष्ट्रे किंवा क्षेत्र यांची जिल्ह्यांमध्ये विभागणी केली जाते; आणि जिल्ह्यांचे विभाजन विभागात केले जाते. प्रत्येक विभागात जवळजवळ २० मंडळ्या असतात. प्रांतीय पर्यवेक्षक त्यांच्या जिल्ह्यातील सर्व विभागांना आळीपाळीने भेटी देतात. प्रत्येक विभागासाठी दर वर्षी दोन संमेलने होतात. एक विभागीय पर्यवेक्षक देखील असतात. हे विभागीय पर्यवेक्षक त्यांच्या विभागात असलेल्या प्रत्येक मंडळीला, बहुतेककरून वर्षातून दोन वेळा भेट देतात. मंडळीला नेमून दिलेल्या क्षेत्रात प्रचार कार्याची योजना करण्यास व कार्य करण्यास मदत करण्याचा विभागीय पर्यवेक्षकांच्या भेटीचा हेतू असतो.
स्थानिक मंडळी आणि मंडळीचे राज्य सभागृह हे, तुमच्या समाजात सुवार्ता सांगण्याचे केंद्र आहे. प्रत्येक मंडळीला नियुक्त केलेल्या क्षेत्राची, लहान लहान क्षेत्रांत विभागणी करून त्यांचे नकाशे बनवले जातात. एकेका साक्षीदाराला, या लहान लहान क्षेत्रांतील लोकांना त्यांच्या घरी जाऊन भेट देण्याकरता नेमले जाते. काही मंडळ्यांमध्ये बोटावर मोजण्याइतके साक्षीदार आहेत; तर काही मंडळ्यांमध्ये २०० च्या आसपास साक्षीदार आहेत. अशाप्रकारच्या प्रत्येक मंडळीमध्ये वडील असतात ज्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतात. यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेमध्ये सुवार्तेची घोषणा करणारा प्रत्येक उद्घोषक महत्त्वपूर्ण आहे. साक्षीदारांतील प्रत्येक जण, मग तो जागतिक मुख्यालयात, शाखा दफ्तरांत किंवा मंडळीत सेवा करणारा असो, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगण्याच्या कार्यात व्यक्तिगतपणे भाग घेतो.
या कार्याचा अहवाल, शेवटी, जागतिक मुख्यालयाला पाठवला जातो आणि तेथे मग वार्षिक पुस्तक संग्रहित करून प्रकाशित केले जाते. तसेच, दर वर्षी टेहळणी बुरूजच्या जानेवारी १ च्या अंकात एक तक्ता प्रकाशित केला
जातो. ही दोन्ही प्रकाशने, यहोवाची आणि येशू ख्रिस्ताद्वारे येणाऱ्या राज्याची साक्ष देण्यासाठी दर वर्षी साध्य केलेल्या गोष्टींचा सविस्तर अहवाल सादर करतात. अलिकडील वर्षांमध्ये, दर वर्षी १,५०,००,००० साक्षीदार आणि आस्थेवाईक लोक येशूच्या मृत्यूच्या स्मारकविधीला उपस्थित राहिले होते. यहोवाचे साक्षीदार दर वर्षाला सुवार्तेची घोषणा करण्यात १,१०,००,००,००० तास खर्च करतात आणि दर वर्षी २,५०,००० नवीन लोकांचा बाप्तिस्मा होतो. साहित्यांच्या कोट्यवधी प्रतींचे वितरण केले जाते.