व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ही सुवार्ता तुम्ही ऐकावी असे त्यांना वाटते

ही सुवार्ता तुम्ही ऐकावी असे त्यांना वाटते

ही सुवार्ता तुम्ही ऐकावी असे त्यांना वाटते

येशू पृथ्वीवर असताना त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले: “आपल्या येण्याचे [“उपस्थितीचे,” NW] व ह्‍या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हास सांगा?” उत्तरादाखल येशूने सांगितले, की आंतरराष्ट्रीय पातळीवर युद्धे, दुष्काळ, रोगराई, भूमिकंप, अनीतीत वाढ, अनेकांना फसवणारे खोटे धार्मिक शिक्षक, येशूच्या खऱ्‍या शिष्यांचा द्वेष आणि छळ, अनेक लोकांची धार्मिकतेबद्दल आवड कमी होणे, या सर्व गोष्टी घडतील. या गोष्टी घडू लागल्यावर ख्रिस्त अदृश्‍यरीत्या उपस्थित झाल्याचे व स्वर्गीय राज्य अत्यंत निकट आल्याचे सूचित होणार होते. ही एक महत्त्वाची वार्ता, एक सुवार्ता असणार होती! यास्तव येशूने त्या चिन्हाचा भाग म्हणून आणखी पुढे असे म्हटले: “सर्व राष्ट्रांस साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल, तेव्हा शेवट होईल.”—मत्तय २४:३-१४.

अलीकडील जागतिक घटनांमुळे दुःख होत असले तरी जी गोष्ट त्या सूचित करतात ती मात्र आनंदाची आहे, अर्थात ख्रिस्ताची उपस्थिती. वर सांगितलेल्या घटना, ज्या वर्षाची मोठ्या प्रमाणावर घोषणा करण्यात आली होती त्या १९१४ वर्षापासून स्पष्ट दिसू लागल्या! या घटनांनी, विदेश्‍यांच्या काळाची समाप्ती सूचित केली तसेच मानवी राज्य संपुष्टात येण्यापासून ते ख्रिस्ताची हजार वर्षीय राजवट सुरू होण्याच्या मध्यंतरीच्या काळाला सूचित केले.

या मध्यंतरीच्या काळाबद्दल स्तोत्र ११० व्या अध्यायातील १ आणि २ वचनात तसेच प्रकटीकरण १२:७-१२ या वचनांत सांगितले आहे. त्यात असे म्हटले आहे, की राजा बनण्याचा समय येईपर्यंत ख्रिस्त देवाच्या उजव्या बाजूला बसेल. आणि मग स्वर्गामध्ये लढाई होईल ज्यामुळे सैतानाला पृथ्वीवर टाकण्यात येईल. यामुळे पृथ्वीवर अनर्थ ओढवेल व ख्रिस्त त्याच्या शत्रूंच्यामध्ये राज्य करील. दुष्टाईचा समूळ नाश, एका ‘मोठ्या संकटात’ होईल; या मोठ्या संकटाचा अंत हर्मगिद्दोनाच्या लढाईत होईल व त्यानंतर ख्रिस्ताची हजार वर्षीय शांतीची राजवट सुरू होईल.—मत्तय २४:२१, ३३, ३४; प्रकटीकरण १६:१४-१६.

परंतु, बायबल म्हणते, “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आई-बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी, सुभक्‍तीचे केवळ बाह्‍य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासून दूर राहा.”—२ तीमथ्य ३:१-५.

काहीजण म्हणतील, की या गोष्टी तर मानवी इतिहासात आधीपासूनच घडत आल्या आहेत. हे जरी खरे असले तरी, वस्तुस्थिती मात्र अशी आहे, की या घटना इतक्या मोठ्या प्रमाणावर पूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. इतिहासकारांच्या व विवेचनकारांच्या म्हणण्यानुसार, पृथ्वीवर १९१४ पासून पुढे अनुभवलेल्या काळासारखा दुसरा काळ नव्हता. (पृष्ठ ७ पाहा.) पूर्वी कधीही नव्हते इतक्या विस्तृत प्रमाणावर अनर्थ वाढले आहेत. शिवाय, ख्रिस्ताने शेवटल्या दिवसांच्या दिलेल्या चिन्हांतील इतर पैलूंबाबत पुढील वास्तविकतांचा विचार करणे आवश्‍यक आहे: ख्रिस्ताच्या उपस्थितीची व त्याच्या राज्याची जगव्याप्त घोषणा, ही इतिहासातील अभूतपूर्व गोष्ट ठरली आहे. प्रचारकार्यात भाग घेतल्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांचा जितका छळ करण्यात आला त्याची तुलना करता येत नाही. नात्सी छळ छावण्यांमध्ये शेकडो साक्षीदारांना देहदंड देण्यात आला. अजूनही काही ठिकाणी यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्यावर बंदी आहे; आणि इतर ठिकाणी त्यांना अटक केली जाते, तुरुंगात डांबले जाते, छळले जाते व ठारही मारले जाते. हे सर्व, येशूने दिलेल्या चिन्हाचा एक भाग आहे.

प्रकटीकरण ११:१८ मध्ये भाकीत केल्यानुसार, यहोवाच्या विश्‍वासू साक्षीदारांविरुद्ध “राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली” आहेत व यावरून हेच सूचित होते, की या राष्ट्रांविरुद्ध यहोवाचा ‘क्रोध’ व्यक्‍त केला जाईल. तेच वचन पुढे म्हणते, की देव, “पृथ्वीची नासाडी करणाऱ्‍यांचा नाश” करील. जीवन टिकवून ठेवण्याची पृथ्वीची क्षमता, मानवी इतिहासामध्ये पूर्वी कधीही धोक्यात आली नव्हती. परंतु आता तर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे! अनेक शास्त्रज्ञांनी असा इशारा दिला आहे, की जर मानव पृथ्वीची अशीच नासाडी करत राहिला तर एक दिवस ती निर्जन होईल. परंतु यहोवाने “तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली” असल्यामुळे मनुष्य तिची पूर्णपणे नासाडी करण्याआधीच, तो नासाडी करणाऱ्‍यांचा नाश करील.—यशया ४५:१८.

देवाच्या राज्य शासनादरम्यान पृथ्वीवर आशीर्वाद

बायबलवर विश्‍वास बाळगणाऱ्‍या अनेकांना असे वाटते की तारण प्राप्त झालेले सर्व जण स्वर्गात जातील; त्यामुळे, देवाच्या राज्यात लोक प्रजा या नात्याने पृथ्वीवर राहतील हा विचार त्यांना जरा विचित्रच वाटेल. बायबलमध्ये म्हटले आहे, की केवळ मर्यादित लोकच स्वर्गात जातील, परंतु पृथ्वीवर चिरकाल राहणाऱ्‍या मोठ्या लोकसमुदायाची संख्या अगणित असेल. (स्तोत्र ३७:११, २९; प्रकटीकरण ७:९; १४:१-५) ख्रिस्ताच्या नेतृत्वाखाली हे देवाचे राज्य संपूर्ण पृथ्वीवर राज्य करील असे बायबलमधील दानीएल नावाच्या पुस्तकातील भविष्यवाणीत म्हटले आहे.

दानीएलाच्या पुस्तकात, यहोवाच्या डोंगरासमान सार्वभौमत्वातून निघालेला एक पाषाण ख्रिस्ताच्या राज्याला चित्रित करतो. हा पाषाण, पृथ्वीवरील शक्‍तिमान राष्ट्रांना चित्रित करणाऱ्‍या पुतळ्यावर आदळतो व त्याचा नाश करतो आणि मग ‘पुतळ्यावर आदळलेल्या त्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन तो सर्व पृथ्वी व्यापतो.’ ती भविष्यवाणी पुढे म्हणते: “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही; त्याचे प्रभुत्व दुसऱ्‍याच्या हाती कधी जाणार नाही; तर ते सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:३४, ३५, ४४.

यहोवाचे साक्षीदार तुम्हाला याच राज्याबद्दल आणि या सुंदर पृथ्वीवर अनंतकालिक जीवनाच्या शास्त्रवचनांतील आशेबद्दल सांगू इच्छितात. सध्या जिवंत असलेले कोट्यवधी लोक आणि कबरेतील अब्जावधी लोक या सर्वांना या पृथ्वीवर सदासर्वकाळ जगण्याची संधी प्राप्त होईल. मग येशू ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या राजवटीत, पृथ्वीची निर्मिती करून तिजवर पहिल्या मानवी दांपत्याला ठेवण्यामागचा यहोवाचा मूळ उद्देश पूर्ण होईल. पृथ्वीवरील बागेसमान ही परिस्थिती केव्हाही कंटाळवाणी वाटणार नाही. आदामाला एदेन बागेत जसे काम नेमून दिले होते तसेच सर्व मानवजातीवर पृथ्वीची, वनस्पतींची आणि प्राण्यांची निगा राखण्याचा आव्हानात्मक प्रकल्प सोपवला जाईल. ते “आपल्या हातांचे काम दीर्घकाल उपभोगतील.”—यशया ६५:२२, पं.र.भा; उत्पत्ति २:१५.

“तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो” या येशूने आपल्याला शिकवलेल्या प्रार्थनेचे उत्तर मिळाल्यानंतरच्या परिस्थितीचे वर्णन करणारी अनेक शास्त्रवचने आहेत. (मत्तय ६:१०) त्यातील एकच उदाहरण आपण पाहू या: “मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पाहा! देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे, त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील; ते त्याचे लोक होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील, ह्‍यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट ही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला: पाहा! मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्‍वसनीय व सत्य आहेत.”—प्रकटीकरण २१:३-५.

[१५ पानांवरील संक्षिप्त आशय]

“कठीण दिवस येतील,”

परंतु “तेव्हा शेवट होईल”

[१८ पानांवरील चित्र]

नेदरलंड

[१८ पानांवरील चित्र]

नायजेरिया