व्हिडिओ पाहण्यासाठी

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?

यहोवाच्या साक्षीदारांचा काय विश्‍वास आहे?

“आपले विचार काय आहेत ते आपणापासून ऐकून घ्यावे हे आम्हाला योग्य वाटते; कारण ह्‍या पंथाविषयी म्हटले तर लोक त्याविरुद्ध सर्वत्र बोलतात, हे आम्हाला ठाऊक आहे.” (प्रे. कृत्ये २८:२२) पहिल्या शतकातील रोमी वसाहतीतील प्रमुखांनी एक सुंदर उदाहरण मांडले. बाहेरील टीकाकारांपेक्षा खऱ्‍या उगमाकडील माहिती जाणून घेणे त्यांना पसंद पडले.

अशाच प्रकारे आज यहोवाच्या साक्षीदारांविरूद्ध बरेच काही बोलले जाते, त्यामुळेच कोणा पूर्वग्रह कलुषित उगमाकडून त्यांच्याविषयीची सत्यता जाणून घेण्याचे अपेक्षिणे ही चुकीची दिशा ठरेल. तद्वत, आमच्या काही प्रमुख विश्‍वासांचे स्पष्टीकरण तुम्हाला येथे देण्यात आम्हाला आनंद वाटतो.

बायबल, येशू ख्रिस्त व देव

“सर्व शास्त्रवचने इश्‍वरप्रेरित असून ती . . . उपयोगी आहेत” असे आम्ही मानतो. (२ तीमथ्य ३:१६) आम्ही खरे ख्रिस्ती नाही असा काहींचा दावा आहे तो खोटा आहे. प्रेषित पेत्राने येशू ख्रिस्ताविषयी जी साक्ष दिली तिच्याशी आम्ही पूर्ण सहमतात आहोत की, “जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही.”—प्रे. कृत्ये ४:१२.

तथापि, येशूने स्वतः म्हटले की तो “देवाचा पुत्र” आहे आणि असेहि म्हटले की “पित्याने मला पाठविले.” या कारणास्तव यहोवाचे साक्षीदार हे मानतात की देव हा येशू ख्रिस्तापेक्षा थोर आहे. (योहान १४:२८; ८:२९) तद्वत, त्रैक्य तत्व जसे म्हणते की पुत्र हा पित्यासमान आहे ते आम्ही मानीत नाही. उलटपक्षी, पुत्राची देवाकडून निर्मिती झाली होती व तो पित्याच्या खालोखाल आहे हे आम्ही मानतो.—कलस्सैकर १:१५; १ करिंथकर ११:३.

देवाचे नाव मराठीत यहोवा हे आहे. बायबल म्हणते: “ज्या तुझे नाव यहोवा असे आहे तो तूच मात्र अवघ्या पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांनी जाणावे.” (स्तोत्रसंहिता ८३:१८, पंडिता रमाबाई आवृत्ति; शिवाय नियमित बायबलमध्ये या वचनाखालील तळटीप पहा.) या घोषणेला अनुलक्षून येशूने देवाच्या नावावर अधिक भर दिला व त्याने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना करायला शिकविले: “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जावो.” तसेच त्याने स्वतः देवाला ही प्रार्थना केली: “जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले.”—मत्तय ६:९; योहान १७:६.

येशूप्रमाणेच आपण देखील देवाचे नाव व त्याचा उद्देश इतर लोकांना प्रदर्शित करावा असे यहोवाच्या साक्षीदारांना वाटते. याकारणामुळेच आम्ही, येशूच्या अनुकरणार्थ आपणाला यहोवाचे साक्षीदार असे नाव घेतले आहे. येशू स्वतः देवाचा “विश्‍वासू साक्षी” आहे. (प्रकटीकरण १:५; ३:१४) देवाच्या प्रातिनिधिक लोकांविषयी यशया ४३:१० अगदी योग्यतेत म्हणते: “यहोवाचे असे म्हणणे आहे . . . ‘तुम्ही माझे साक्षी आहा, तू माझा निवडलेला सेवक आहेस.’”

देवाचे राज्य

येशूने आपल्या अनुयायांना अशी प्रार्थना शिकविली: “तुझे राज्य येवो.” त्याने राज्याचा विषय आपल्या शिक्षणात श्रेष्ठ दर्जावर ठेवला. (मत्तय ६:१०; लूक ४:४३) हे राज्य स्वर्गातील खरे सरकार आहे व ते या पृथ्वीवर आधिपत्य करील आणि येशू ख्रिस्त त्याचा नियुक्‍त असा अदृश्‍य राजा आहे असे यहोवाचे साक्षीदार मानतात. “त्याच्या [येशूच्या] खांद्यावर सत्ता राहील,” असे बायबल म्हणते. “त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार.”—यशया ९:६, ७.

तरीपण, येशू ख्रिस्त हा देवाच्या सरकारचा एकमेव राजा नसणार. त्याच्या सोबत स्वर्गात आणखी सहअधिपति असणार. “जर आपण धीराने सोसतो तर,” प्रेषित पौल म्हणाला, “त्याच्या बरोबर राज्यही करू.” (२ तीमथ्य २:१२) बायबल दर्शविते की, ख्रिस्ताबरोबर स्वर्गात राज्य करण्यासाठी ज्या लोकांचे पुनरूत्थान होणार ते “पृथ्वीवरून विकत घेतलेले [असे] एक लक्ष चव्वेचाळीस हजार” इतके मर्यादित लोक असणार.—प्रकटीकरण १४:१, ३.

कोणत्याही सरकारला अर्थात प्रजा ही असतेच. त्यामुळे यहोवाचे साक्षीदार असे मानतात की या स्वर्गीय अधिपतींशिवाय इतर करोडो जणांना सार्वकालिक जीवन मिळेल. देवाच्या राज्याच्या या योग्य प्रजाजनांद्वारे, ओघाओघाने सुंदर नंदनवनात रूपांतरित झालेली पृथ्वी भरून जाईल. हे सर्व ख्रिस्त व त्याच्या सहअधिपतींच्या सत्तेखाली अधीन राहतील. या प्रकारे यहोवाच्या साक्षीदारांचा हा भक्कम विश्‍वास आहे की या पृथ्वीचा कधीही नाश होणार नाही तर तिजसंबंधाने हे पवित्र शास्त्रवचनीय अभिवचन पूर्ण होईल: “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील, तेथे ते सर्वदा वास करतील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९; १०४:५.

पण हे देवाचे राज्य कसे येणार? सर्व लोक स्वेच्छेने देवाच्या सरकारच्या अधीन होण्याद्वारे का? उलटपक्षी, बायबल अगदी खरेपणाने दाखविते की राज्याच्या येण्यासाठी देवाला पृथ्वीच्या घडामोडीत थेटपणे हस्तक्षेप करावा लागेल: “स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधी भंग होणार नाही. . . . तर ते या सर्व राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल.”—दानीएल २:४४.

मग हे देवाचे राज्य केव्हा येणार? बायबल भविष्यवादांची जी आज पूर्णता होत आहे त्याच्या अनुषंगाने यहोवाच्या साक्षीदारांचा असा विश्‍वास आहे की ते राज्य लवकरच येणार. या दुष्ट व्यवस्थीकरणाच्या ‘शेवटल्या दिवसास’ अनुलक्षून असणाऱ्‍या काही भविष्यवादित घटनांचा विचार करण्याचे आम्ही आपणास आमंत्रण देत आहोत. ते मत्तय २४:३–१४; लूक २१:७–१३, २५–३१ आणि २ तीमथ्य ३:१–५ मध्ये लिखित आहे.

आम्ही ‘यहोवा आमचा देव याजवर पूर्ण जिवाने, पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने व पूर्ण शक्‍तीने प्रीती करीत आहोत’ त्यामुळे राष्ट्र, वंश आणि सामाजिक स्थिती यांच्याबाबतीत आम्ही अविभाजित आहोत. (मार्क १२:३०, ३१) सर्व राष्ट्रात आढळणाऱ्‍या आमच्या ख्रिस्ती बांधवांमध्ये असणाऱ्‍या प्रेमाच्याबाबतीत आम्ही सर्वत्र अगदी प्रसिद्ध आहोत. (योहान १३:३५; १ योहान ३:१०–१२) यामुळेच राष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या बाबतीत आम्ही तटस्थ भूमिका राखून आहोत. आम्ही येशूच्या आरंभाच्या शिष्यांप्रमाणे स्वतःला वागवतो ज्यांच्याविषयी त्याने म्हटले होते की, “जसा मी या जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.” (योहान १७:१६) स्वतःला जगापासून अलिप्त ठेवणे याचा अर्थ आज सर्वत्र आढळणारी अनैतिक वागणूक, खोटे बोलणे, चोरी करणे, व्यभिचार, जारकर्म, पुरुषगामीपणा, रक्‍ताचा गैरवापर, मूर्तिपूजा आणि बायबलने धिक्कारलेल्या यासारख्या गोष्टी करण्याचे टाळणे असे आम्ही मानतो.—१ करिंथकर ६:९–११; इफिसकर ५:३–५; प्रे. कृत्ये १५:२८, २९.

भवितव्यासाठी आशा

यहोवाचे साक्षीदार मानतात की सध्याच्या जगातील आमचे जीवन एवढेच सर्वकाही नाही. आमचा असा विश्‍वास आहे की यहोवा देवाने ख्रिस्ताला या पृथ्वीवर पाठवून त्याला खंडणीदाखल आपले रक्‍त ओतू दिले की ज्याद्वारे आता मानवाला देवाबरोबरील नीतीमान भूमिका ग्रहण करता येते आणि नव्या व्यवस्थीकरणामध्ये सार्वकालिक जीवनाची प्राप्ती होण्याची आशा धरता येते. येशूच्या एका प्रेषिताने हे म्हटले होते: “आपल्याला आता त्याच्या रक्‍ताने नीतीमान ठरविण्यात आले आहे.” (रोमकर ५:९; मत्तय २०:२८) असे हे भावी जीवन या खंडणी यज्ञार्पणामुळे शक्य होत आहे म्हणून यहोवाचे साक्षीदार देवास व त्याच्या पुत्रास कृतज्ञ आहेत.

देवाच्या राज्यामध्ये पुनरूत्थानाद्वारे जे भावी जीवन लाभणार त्याविषयी यहोवाच्या साक्षीदारांना पूर्ण आत्मविश्‍वास वाटतो. बायबल म्हणते त्याप्रमाणे आमचा देखील हा विश्‍वास आहे की, कोणी मनुष्य मरतो तेव्हा त्याचे अस्तित्व खरेच नष्ट होते व “त्याच वेळी त्याच्या योजनांचा शेवट होतो.” (स्तोत्रसंहिता १४६:३, ४; यहेज्केल १८:४ उपदेशक ९:५) होय, मृतांचे भावी जीवन हे देवाने पुनरूत्थानात त्यांची आठवण करण्यावर अवलंबून आहे.—योहान ५:२८, २९.

तथापि, यहोवाच्या साक्षीदारांना हे देखील आत्मविश्‍वासाने वाटते की, देवाचे राज्य सध्याच्या सर्व सरकारांचा अंत करील तेव्हा जलप्रलयात बचावलेल्या नोहा व त्याच्या कुटुंबाप्रमाणे, सध्या जिवंत असणारे कित्येक जण वाचतील व ते शुद्ध केलेल्या पृथ्वीवर जीवनाचा चिरकाल आनंद लुटण्यासाठी जगतील. (मत्तय २४:३६–३९; २ पेत्र ३:५–७, १३) हा बचाव, आम्ही मानतो की, यहोवाच्या गरजा पूर्ण करण्यावर अवलंबून आहे, ज्याविषयी बायबल म्हणते: “जग . . . नाहीसे होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो.”—१ योहान २:१७; स्तोत्रसंहिता ३७:११; प्रकटीकरण ७:९, १३–१५; २१:१–५.

या छोट्या पत्रिकेत यहोवाच्या साक्षीदारांच्या सर्व विश्‍वासांची हाताळणी करणे अशक्य आहे; पण त्याविषयीची अधिक माहिती तुम्ही प्राप्त करून घ्यावी असे निमंत्रण आम्ही आपणास देतो.

अन्यथा सूचित केले नसल्यास येथे वापरलेले बायबल भाषांतर द होली बायबल मराठी—आर. व्ही. हे आहे.

[४ पानांवरील संक्षिप्त आशय]

आम्ही येशूच्या अनुकरणार्थ आपणाला यहोवाचे साक्षीदार असे नाव घेतले आहे