व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार शल्यशास्त्रीय/नैतिक आव्हान

यहोवाचे साक्षीदार शल्यशास्त्रीय/नैतिक आव्हान

पुरवणी

यहोवाचे साक्षीदार शल्यशास्त्रीय/नैतिक आव्हान

द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन (JAMA), नोव्हेंबर २७, १९८१, खंड २४६, क्र. २१, पृठे २४७१, २४७२ मधून अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या परवानगीने पुनर्मुद्रित. सर्वाधिकार १९८१, अमेरिकन मेडिकल असोसिएशन.

यहोवाच्या साक्षीदारांवर उपाय योजना करताना डॉक्टरांना एका विशेष आव्हानाला तोंड द्यावे लागते. या धर्माचे सदस्य प्रगाढ धार्मिक श्रद्धेमुळे स्वजातीय वा स्वतःचे पूर्ण रक्‍त, समूहित लाल पेशी, पांढऱ्‍या पेशी वा प्लेटलेट घेत नाहीत. शरीराबाहेरील रुधिराभिसरण सलग असल्यास अनेक जण (यंत्र सुरु करण्यास रक्‍तविरहीत वापरल्यास) हार्ट-लंग, डायलिसिस वा तत्सम उपकरणे वापरण्याची अनुमती देतात. त्याच्या परिणामांच्या जबाबदारीची काळजी करण्याची वैद्यकीय अधिकाऱ्‍यांना गरज नाही, कारण रक्‍ताला मान्यतापूर्वक नकार देण्याच्या जबाबदाऱ्‍यांतून मोकळे करण्यासाठी साक्षीदार योग्य ती कायदेशीर पावले टाकतात. ते त्या ऐवजी रक्‍तविरहीत द्रव स्वीकारतात. ते व इतर बारीकसारीक तपशीलाविषयी दक्षतेची तंत्रे वापरुन डॉक्टर, प्रौढ व बालक साक्षीदार रूग्णांवर सर्व प्रकारच्या मोठ्या शस्त्रक्रिया करीत आहेत. ‘संपूर्ण व्यक्‍ती’वर इलाज करण्याच्या तत्त्वाला अनुसरून अशा रूग्णांसाठी कार्यपद्धतीचे एक मानक निर्माण झाले आहे. (JAMA १९८१; २४६:२४७१-२४७२)

आरोग्याचा प्रमुख वाद असणाऱ्‍या एका वाढत्या आव्हानाला डॉक्टर तोंड देत आहेत. अमेरिकेत पाच लाखांवर यहोवाचे साक्षीदार असून ते रक्‍ताच्या संक्रमणाचा स्वीकार करीत नाहीत. साक्षीदार व त्यांच्या सोबत असणाऱ्‍यांची संख्या वाढत आहे. पूर्वी अनेक डॉक्टर व हॉस्पिटलचे अधिकारी रक्‍त संक्रमणाच्या नकाराला एक कायदेविषयक समस्या या दृष्टीने पाहात असत व त्यांना वैद्यकीय दृष्ट्या योग्य वाटत असेल त्याप्रमाणे पुढील उपचार करण्यासाठी कोर्टाची परवानगी मिळवत असत. तरी त्यांच्या या भूमिकेत एक लक्षात येण्याजोगा बदल होत असल्याचे आताच्या वैद्यकीय साहित्यावरून दिसून येते. हिमोग्लोबिनचे प्रमाण फार कमी असलेल्या रूग्णांवरील शस्त्रक्रियांच्या अधिक अनुभवांचा हा परिणाम असेल; तसेच मान्यता कळविण्याच्या कायदेशीर तत्त्वाच्या वाढलेल्या जाणीवेचे प्रतिबिंबही असेल.

आता प्रौढ व बालक साक्षीदारांवरील मोठ्या संख्येच्या वैकल्पिक शल्यशास्त्रीय व आधाती रूग्णांना रक्‍त संक्रमणाविना उपाय केले जात आहेत. नुकतेच यहोवाच्या साक्षीदारांचे प्रतिनिधी, देशातील काही सर्वात मोठ्या वैद्यकीय केंद्रावर शल्यशास्त्रीय व प्रशासकीय अधिकाऱ्‍यांना भेटले. या भेटीमुळे परस्पर सामंजस्यात सुधारणा केली गेली आणि रक्‍त वाया जाण्यापासून वाचवणे, आरोप याविषयीचे प्रश्‍न सोडवण्यास तसेच वैद्यकीय/कायद्या बद्दलचे विवाद टाळण्यास मदत झाली.

उपचार पद्धतीबद्दल साक्षीदारांची भूमिका

यहोवाचे साक्षीदार वैद्यकीय व शल्यशास्त्रीय उपचार स्वीकारतात. खरे म्हणजे, त्यांच्यामध्ये अनेक डॉक्टर व शल्यचिकित्सकही आहेत. तथापि, साक्षीदार हे अतिशय धार्मिक लोक असून त्यांना वाटते की, पुढील नमूद असणाऱ्‍या शास्त्रवचनीय उताऱ्‍यांकरवी रक्‍त संक्रमण करण्याची मनाई केलेली आहे. ते उतारे असेः “ज्यात त्याचे जीवन म्हणजे त्याचे रक्‍त आहे ते मांस तुम्ही खाऊ नका.” (उत्पत्ती ९:३-४); “[तुम्ही] त्याचे रक्‍त जमिनीवर ओतून मातीने झाकावे.” (लेवीय १७:१३-१४); आणि “जारकर्म, गुदमरून मेलेले जनावर व रक्‍त यांपासून दूर राहावे.” (प्रे. कृत्ये १५:१९-२१).

ही वचने वैद्यकीय परिभाषेत मांडलेली नसली तरी त्यांच्यामुळे संपूर्ण रक्‍त, समूहित लाल पेशी, प्लास्मा तसेच पांढऱ्‍या पेशी व प्लेटलेट यांचे संक्रमण देणे अशक्य असल्याचे साक्षीदार मानतात. परंतु साक्षीदारांचा धार्मिक समज, अल्ब्यूमिन, इम्यून ग्लोब्युलिन व हिमोफिलियाच्या औषधांना संपूर्ण मनाई करत नाही. यांचा स्वीकार आपण करू शकतो किंवा नाही ते प्रत्येक साक्षीदाराने व्यक्‍तीगतरित्या ठरवावे.

शरीरापासून अलग झालेले रक्‍त टाकून दिले पाहिजे अशी साक्षीदारांची श्रद्धा आहे. यासाठीच, ते आधी काढून ठेवलेल्या स्वतःच्याच रक्‍ताचे संक्रमणही स्वीकारीत नाहीत. ज्यामध्ये रक्‍त साठवून ठेवावे लागते अशा शस्त्रक्रियेच्या दरम्यान रक्‍त जमा करणे वा रक्‍त पातळ करण्याची तंत्रे त्यांना आक्षेपार्ह वाटतात. परंतु (यंत्र सुरु करण्यापुरते रक्‍तविरहीत वापरल्यास) डायलिसिस व हार्टलंगची उपकरणे तसेच शरीराबाहेरील रूधिराभिसरण अखंड असल्यास शस्त्रक्रियेच्या वेळात रक्‍त वाया जाण्यापासून वाचवण्यास अनेक साक्षीदार परवानगी देतात. व्यक्‍तीगतरित्या रूग्णाच्या सद्‌सद्‌विवेक बुद्धीचा निर्णय काय आहे याविषयी डॉक्टरांनी त्याच्याशी चर्चा करावी.

अवयवांच्या आरोपणांबद्दल पवित्र शास्त्र प्रत्यक्षपणे भाष्य करते असे साक्षीदारांना वाटत नाही. या कारणासाठी नेत्र, मूत्रपिंड किंवा इतर अवयवांच्या आरोपणाबद्दल साक्षीदाराने व्यक्‍तीगत निर्णय केला पाहिजे.

मोठ्या शस्त्रक्रिया शक्य आहेत

रक्‍ताच्या उत्पादनांविषयी साक्षीदारांनी घेतलेल्या भूमिकेमुळे “डॉक्टरांचे हात बांधले जातात,” असे वाटल्याने शल्य चिकित्सक साक्षीदारांवर उपाय करण्याचे नाकारत असले तरी आता अनेक डॉक्टरांनी या परिस्थितीला, त्यांच्या कौशल्याला आव्हान देणारी आणखी एक समस्या या दृष्टीकोणातून पाहण्याचे ठरवले आहे. कोलॉइड वा क्रिटलॉइड पर्यायी द्रव वा इलेक्ट्रोकॉटरी, रक्‍तदाब कमी करणारी भूल किंवा अवताप (हायपोथर्मिआ) यांना साक्षीदार आक्षेप घेत नसल्याने त्यांचा उपयोग यशस्वीरित्या करण्यात आला आहे. हीटास्टर्चचे आजचे व भावी उपयोग, शिरेतून दिली जाणारी आयर्न डेक्स्‌ट्रॅनची मोठ्या प्रमाणावरील इंजेक्शने, व “सोनिक स्कॅल्पल” या गोष्टी आशादायक असून धार्मिक दृष्टीने आक्षेपार्ह नाहीत. तसेच नुकताच बनवण्यात आलेला फ्लोरिन वायूने प्रक्रिया केलेला रक्‍ताचा पर्यायी द्रव (फ्लूओसॉल-डीए) सुरक्षित व परिणामकारक ठरल्यास त्याचा उपयोग साक्षीदारांच्या श्रद्धेशी खटकणार नाही.

हृदय व रक्‍तवाहिन्यांवरील शस्त्रक्रिया “स्वीकारण्याइतक्या कमी धोक्यात” करता येतात असा निर्वाळा, रक्‍ताचे संक्रमण न करता साक्षीदारांवर केलेल्या असल्या ५४२ शस्त्रक्रियांच्या अहवालात ऑटो व कूले यांनी १९७७ मध्ये दिला. आम्ही केलेल्या विनंतीवरून कूले यांनी नुकतेच १,०२६ शस्त्रक्रियांचे परिक्षण कले. त्यातील २२% लहान मुलांवर केलेल्या होत्या व हे ठरविण्यात आले की, “यहोवाच्या साक्षीदारांच्या गटातील रूग्णांमधील शस्त्रक्रियेच्या जोखीमा इतरांपेक्षा म्हणण्याइतक्या जास्त नाही.” तसेच मायकेल इ. डीबेके, एम. डी यांनी कळवले की, “[साक्षीदार ज्यामध्ये गोवलेले आहेत अशा] बहुतेक परिस्थितीत रक्‍त संक्रमणाविना केलेल्या शस्त्रक्रियांमधील जोखीमा, आम्ही रक्‍त संक्रमण केलेल्या रोग्यांमधील जोखीमांपेक्षा जास्त नाही.” (वैयक्‍तीक दळणवळण, मार्च १९८१). वैद्यकीय साहित्यातही युरोलॉजीच्या१० व ऑर्थोपेडिक मोठ्या यशस्वी शस्त्रक्रिया११ नमूद केलेल्या आहेत. “[साक्षीदार] २० लहान मुलांवर” पोस्टिरियर स्पायनल फ्यूजन “यशस्वीपणे साध्य करण्यात” आल्याचे जी. डीन मॅक्‌इवन एम. डी. व जे. रीचर्ड बॉवेन लिहितात. (अप्रकाशित माहिती, ऑगस्ट १९८१) ते पुढे म्हणतातः “रक्‍त संक्रमण नाकारण्याचा रूग्णाच्या हक्काचा आदर करूनही रोगी सुरक्षित राहील अशा रितीने शस्त्रक्रिया करण्याचे तत्त्व स्थापन करण्याची शल्यचिकित्सकांना गरज आहे.”

“मोठ्या प्रमाणावर आघाती रक्‍तक्षय” झालेल्या रोग्यांमध्ये, ज्यात काही युवकही होते, यश मिळाल्याचे हर्बस्‌मन्‌१२ कळवतात. “रक्‍ताची गरज भासते तेव्हा साक्षीदार काहीसे अडचणीत येतात; असे असले तरी रक्‍ताच्या बदल्यात देण्यासाठी आमच्याजवळ पर्याय आहेत, हे सुद्धा अगदी स्पष्ट आहे,” असे ते कबूल करतात. अनेक शल्यचिकित्सकांना “कायदेविषयक परिणामांच्या भीती”मुळे साक्षीदारांना रूग्ण म्हणून स्वीकारण्यात बंधन आल्यासारखे वाटते, याची नोंद घेऊन ही चिंता सबळ नसल्याचे ते दाखवून देतात.

कायदेविषयक चिंता व लहान मुले

डॉक्टर व इस्पितळांना जबाबदारीतून मुक्‍त करण्यासाठी१३ अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या फॉर्मवर साक्षीदार तत्परतेने स्वाक्षरी करतात. तसेच बहुतेक साक्षीदार, वैद्यकीय व कायदेतज्ञ अधिकाऱ्‍यांच्या सल्ला मसलतीने बनवलेले, तारीख घातलेले व साक्षीदारांच्या सह्‍या असलेले मेडिकल अलर्ट कार्ड बाळगतात. हे दस्तऐवज रूग्णावर (वा त्याच्या परिस्थितीवर) बंधनकारक आहेत व डॉक्टरांना संरक्षण देतात. असे, हक्क सोडल्याचे हस्ताक्षरित पत्र असल्यास, अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा दावा “विनाधार दिसून येईल” असे मत न्यायमूर्ती वॅरेन बर्गर यांनी मांडले. तसेच याविषयी, “जबरीची वैद्यकीय उपाय योजना व धार्मिक स्वातंत्र्य” याच्या अभ्यासामध्ये मत प्रदर्शन करताना पॅरिस१४ यांनी लिहिलेः “त्या साहित्याची पाहणी करणाऱ्‍या एका टिकाकाराने म्हटलेः ‘इच्छा नसलेल्या रूग्णावर बळजबरीने संक्रमण करण्यात कसूर केल्यामुळे डॉक्टरांवर गुन्ह्‌याची जबाबदारी येईल अशा विधानाला कोणताही पुरावा मला सापडू शकला नाही.’ ही जोखीम वास्तव शक्यतेपेक्षा सुपीक कायदेविषयक डोक्यातून उत्पन्‍न झालेली आहे असे दिसते.”

लहान मुलांचा संभाळ ही अनेकदा, बालकांच्या हेळसांडीविषयीच्या कायद्यांखाली पालकांविरूद्ध कायदेशीर कृतीमध्ये पर्यवसान होणारी, सर्वात मोठी चिंतेची बाब ठरते. तथापि, साक्षीदार रूग्णाशी परिचित असणाऱ्‍या व साक्षीदार पालक आपल्या मुलांसाठी चांगली वैद्यकीय सेवा मिळवतात असे मानणारे अनेक डॉक्टर व वकील अशा कार्यवाहीबद्दल शंका व्यक्‍त करतात. पालक या नात्याने आपल्या जबाबदारीतून अंग चोरण्याची वा एखाद्या न्यायाधीश किंवा तिसऱ्‍याच पक्षावर ती ढकलण्याची इच्छा नसल्याने, त्यांच्या कुटुंबाच्या धार्मिक तत्त्वांचा विचार व्हावा असा आग्रह ते धरतात. डॉ. ए. डी. केली, कॅनेडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सचिव यांनी असे लिहिले की,१५ “लहान मुलांचे पालक व बेशुद्ध रूग्णाचे निकटचे नातलग यांना रूग्णाच्या इच्छेचा अर्थ लावण्याचा अधिकार आहे. . . . मुलाला त्याच्या पालकाच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी पहाटे २ वाजता भरवलेल्या विवाद्य न्यायालयाच्या कामकाजाबद्दल मला मुळीच कौतुक वाटत नाही.”

शस्त्रक्रिया, अणूस्सर्ग (रेडिएशन) वा रसायन-उपचार-पद्धती (केमोथियरपी) यांच्या जोखीमा/फायद्याच्या शक्यतेला तोंड देताना, पालकांना आपल्या मुलांचा प्रतिपाळ करण्यामध्ये नियंत्रणाचा हक्क असतो ही गोष्ट स्वयंसिद्ध आहे. संक्रमणाच्या१६ धोक्याबद्दलच्या प्रश्‍नापलिकडे जाणाऱ्‍या नैतिक कारणांसाठी धार्मिक मनाई नसलेल्या उपचार पद्धती वापरल्या जाव्या अशी मागणी साक्षीदार पालक करतात. एखाद्या कुटुंबाच्या मूलभूत श्रंद्धांचा भंग करणाऱ्‍या कोणा आक्रमक कार्यपद्धतीच्या, शक्य असलेल्या, कायमच्या मानसिक हानीकडे दुर्लक्ष न करता, “संपूर्ण माणसा”वर उपाय करण्याच्या वैद्यकीय तत्त्वाशी याचा मेळ बसतो. आता अनेकदा, साक्षीदारांना अगदी बालरूग्णांनाही, औषधोपचार देण्यास इच्छा नसणाऱ्‍या संस्थांकडून, साक्षीदारांविषयी अनुभव असलेली, देशातील मोठी केंद्रे, रूग्णांची बदली स्वीकारतात.

डॉक्टरांना आव्हान

आपल्या हाताशी असलेली सर्व तंत्रे वापरून जीवन व स्वास्थ्याचे जतन करण्यास वाहून घेतलेल्या डॉक्टरला यहोवाच्या साक्षीदारांची देखभाल म्हणजे एक पेचप्रसंग वाटू शकेल हे समजण्यासारखे आहे. साक्षीदारांवरील मोठ्या शस्त्रक्रियांबद्दलच्या लेखमालेची संपादकीय प्रस्तावना लिहिताना हार्वे१७ यांनी कबूल केलेः “माझ्या कामात लुडबुड करू शकणाऱ्‍या त्या श्रद्धा मला तापदायक वाटतात.” परंतु ते पुढे म्हणालेः “शस्त्रक्रिया हे व्यक्‍तीच्या आपल्या तंत्रावर अवलंबून असलेले हस्तकौशल्य आहे ही गोष्ट बहुधा आपण फारच लवकर विसरतो. तंत्र सुधारता येते.”

फ्लॉरिडामधील डेल काऊंटीतील आघाती रूग्णांवर उपचार करणाऱ्‍या सर्वात गर्दीच्या हॉस्पिटलांच्या, साक्षीदारांना औषधोपचार नाकारण्याच्या सरसकट धोरणाच्या बातमीकडे प्राध्यापक बोलूकी१८ यांनी ध्यान दिले. “या गटाच्या रूग्णातील शल्यचिकित्सेच्या बहुतेक कार्यपद्धतींमध्ये नेहमीपेक्षा कमी धोका असतो” हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी पुढे म्हटलेः “आधुनिक वैद्यक शास्त्राचे एक उपकरण त्यांच्यापासून हिरावले असल्याचे त्या शल्यचिकित्सकांना वाटत असले तरी . . . अशा रूग्णांवर शस्त्रक्रिया करून ते बरेच काही शिकतील याची मला खात्री आहे.”

साक्षीदार रूग्णाला एक समस्या न समजता, त्या परिस्थितीला अधिकाधिक डॉक्टर, वैद्यकीय आव्हान म्हणून स्वीकारत आहेत. त्या आव्हानाला तोंड देताना, या गटाच्या रूग्णांसाठी त्यांनी निर्माण केलेले कार्याचे मानक, देशभरातील अनेक वैद्यकीय केंद्रात स्वीकारले गेले आहे. त्यासोबत हे डॉक्टर रूग्णांच्या सर्वांगीण भल्यासाठी सेवा सादर करीत आहेत. गार्डनर व एट अल१९ यांनी म्हटल्याप्रमाणे, “रूग्णाची शारीरिक व्याधी बरी झाली पण त्याच्या दृष्टीकोणातून, देवाशी संबंधित आध्यात्मिक जीवन संकटात पडले व त्यामुळे जीवन निरर्थक वा मृत्युहून देखील वाईट झाले तर कोणाचा फायदा होईल?”

आपल्या अढळ विश्‍वासामुळे वैद्यकीय दृष्ट्या काही प्रमाणात धोका वाढल्यासारखा वाटतो व त्यामुळे मिळणाऱ्‍या सेवेमध्ये समस्या येण्याचा संभव आहे ही गोष्ट साक्षीदार जाणतात. या कारणास्तव, त्यांना मिळणाऱ्‍या सेवेबद्दल ते बहुधा विशेष कदर दाखवतात. प्रगाढ श्रद्धा हा अत्यावश्‍यक घटक व जगण्याची जाज्वल्य इच्छा असण्याव्यतिरिक्‍त ते डॉक्टर व वैद्यकीय अधिकाऱ्‍यांशी आनंदाने सहकार्य करतात. अशा रितीने, रूग्ण व डॉक्टर दोघांची या असामान्य आव्हानाला तोंड देण्यास एकी होते.

संदर्भ