व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?

रक्‍ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते?

रक्‍त–जीवनासाठी अत्यावश्‍यक

रक्‍त, तुमचे जीवन कसे वाचवू शकते? रक्‍ताचा तुमच्या जीवनाशी संबंध असल्यामुळे या प्रश्‍नात तुम्हाला आस्था असेल यात शंका नाही. रक्‍त तुमच्या शरीरात प्राणवायु घेऊन जाते, कर्बद्विप्राणिल वायु काढून टाकते, तपमानातील बदलाशी जुळवून घेण्यास व रोगांशी मुकाबला करण्यात मदत करते.

रक्‍ताचा जीवनाशी संबंध आहे ही गोष्ट १६२८ मध्ये विल्यम हार्वे यांनी रूधिराभिसरण संस्थेचा आराखडा काढण्याच्या बऱ्‍याच आधी सिद्ध झालेली आहे. प्रमुख धर्मांची मूलभूत नीतीतत्त्वे एका जीवनदात्यावर केंद्रित आहेत. त्याने जीवन व रक्‍ताविषयीची स्वतःची मते सांगितली आहेत. त्या जीवनदात्याबद्दल एक यहूदी-ख्रिस्ती वकील म्हणालाः “जीवन, प्राण व सर्व काही तो स्वतः सर्वांना देतो. कारण आपण त्याच्यामुळे जगतो, वागतो व आहोत.” a

अशा जीवनदात्यावर श्रद्धा असलेल्या लोकांना विश्‍वास आहे की, त्याचे मार्गदर्शन आपल्या शाश्‍वत हिताचे आहे. “जो तुला तुझे हित साधायला शिकवतो, ज्या मार्गात तू चालावे त्यातच जो तुला चालवतो,” असे त्याचे वर्णन एक इब्री संदेष्ट्याने केलेले आहे.

यशया ४८:१७, १८ मधील ते आश्‍वासन, आपल्या सर्वांच्या फायद्याच्या, नीतीतत्त्वासाठी आदरणीय मानल्या गेलेल्या बायबल किंवा पवित्र शास्त्राचा एक भाग आहे. ते पुस्तक, माणसांनी रक्‍ताचा उपयोग करण्याविषयी काय म्हणते? रक्‍ताने जीवन कसे वाचवता येते हे ते दाखवते का? वास्तविक, रक्‍त केवळ जीवशास्त्रीय द्रवापेक्षा अधिक आहे असे पवित्र शास्त्र स्पष्टपणे दर्शविते. त्यामध्ये रक्‍ताचा उल्लेख ४०० पेक्षा अधिक वेळा असून त्यातील काही जीवन वाचविण्याच्या संदर्भात आहेत.

“हालचाल करणारा प्रत्येक जिवंत जीव तुमचे अन्‍न होईल. . . . तरी ज्यात त्याचे जीवन म्हणजे त्याचे रक्‍त आहे ते मांस तुम्ही खाऊ नका,” असे एका पूर्वीच्या आरंभाच्या संदर्भात सृष्टीकर्त्याने म्हटले. त्याने पुढे म्हटलेः “मी खचित तुमच्या जिवांच्या रक्‍ताची झडती घेईन.” आणि मग त्याने खून करणे दोषास्पद ठरवले. (उत्पत्ती ९:३-६, पंडिता रमाबाई भाषांतर) यहूदी, मुसलमान व ख्रिस्ती लोकांनी आदरणीय मानलेल्या नोहा या पूर्वजाला देवाने ते सांगितले होते. अशा रितीने, सृष्टीकर्त्याच्या नजरेत रक्‍त जीवनाचे प्रतीक आहे असे सर्व मानवजातीला सांगण्यात आले. हा केवळ आहारविषयक नियम नव्हता. त्यात एक नैतिक तत्त्व गोवले गेले असल्याचे स्पष्ट आहे. मानवी रक्‍ताला मोठा अर्थ आहे व त्याचा दुरुपयोग केला जाता कामा नये. सृष्टीकर्त्याने त्यानंतर दिलेल्या तपशीलावरून त्याने रक्‍ताशी जोडलेला नैतिक प्रश्‍न आपल्याला सहज दिसून येतो.

त्याने प्राचीन काळच्या इस्राएल लोकांना नियमशास्त्र दिले तेव्हा त्याने रक्‍ताचा उल्लेख पुन्हा केला. त्या शास्त्रातील सूज्ञता व नैतिक तत्त्वांचा आदर अनेक लोक करतात. परंतु त्यातील रक्‍ताविषयीच्या गंभीर नियमांबद्दल फारच थोड्या लोकांना जाणीव आहे. उदाहरणार्थ, “इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्‍या परदेशीय लोकांपैकी कोणी कोणत्याही प्रकारचे रक्‍त सेवन केले तर रक्‍त सेवन करणाऱ्‍या मनुष्याला मी विन्मुख होऊन त्याचा स्वजनातून उच्छेद करीन. शरीराचे जीवन तर रक्‍तात असते.” (लेवीय १७:१०, ११) यानंतर, शिकाऱ्‍याने मेलेल्या प्राण्याचे काय करावे ते देवाने समजावून सांगितलेः “त्याने त्याचे रक्‍त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. . . . कोणत्याही प्राण्याचे रक्‍त सेवन करून नये कारण सर्व प्राण्यांचे जीवन हेच त्यांचे रक्‍त होय. ते जे कोणी सेवन करील त्याचा उच्छेद व्हावा.”—लेवीय १७:१३, १४.

यहुदी नियमशास्त्राने सुस्वास्थ्याला हातभार लावला होता हे आता शास्त्रज्ञांना माहीत झाले आहे. उदाहरणार्थ, विष्ठा ही छावणीच्या बाहेर टाकावी व झाकावी तसेच ज्यात रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा विशेष धोका होता असे मांस लोकांनी खाऊ नये असे दंडक त्यात होते. (लेवीय ११:४-८, १३; १७:१५; अनुवाद २३:१२, १३) रक्‍ताबाबतच्या नियमाला आरोग्यविषयक पैलू असला तरी त्यात आणखी बरेच काही गोवलेले होते. रक्‍ताला एक प्रतीकात्मक अर्थ होता. सृष्टीकर्त्याने दिलेल्या जीवनाचे ते द्योतक होते. रक्‍ताला विशेष दर्जाचे मानून, ते लोक, आपले जीवन त्या सृष्टीकर्त्यावर अवलंबून असल्याचे दर्शवीत होते. होय, त्यांनी रक्‍त न खाण्याचे प्रमुख कारण, ते आरोग्याला अपायकारक होते म्हणून नव्हे तर त्याला देवाच्या दृष्टीने विशेष अर्थ होता.

जीवनाला आधार देण्यासाठी रक्‍त खाण्यावरील देवाची बंदी नियमशास्त्राने पुनःपुन्हा सांगितली होती. “ते (रक्‍त) सेवन करू नये, पाण्याप्रमाणे ते जमिनीवर ओतून द्यावे. . . . जे यथार्थ ते तू केल्याने तुझे व तुझ्या पश्‍चात तुझ्या संततीचे कल्याण व्हावे म्हणून ते सेवन करू नये.”—अनुवाद १२:२३-२५; १५:२३; लेवीय ७:२६, २७; यहेज्केल ३३:२५. b

आजकालच्या काही लोकांच्या विचाराच्या विरूद्ध, एखादी निकडीची परिस्थिती निर्माण झाली म्हणून रक्‍ताबाबत देवाच्या नियमाकडे दुर्लक्ष करायचे नव्हते. एका लढाईतील पेचप्रसंगी इस्राएलाच्या सैनिकांनी प्राणी मारले व ते “रक्‍तासहित मांस खाऊ लागले.” त्या वेळेच्या आणीबाणीकडे पाहता त्यांनी आपले जीवन रक्‍ताने टिकवणे हे परवानगी देणारे होते का? नाही. त्या परिस्थितीतही त्यांचा मार्ग ही एक गंभीर चूक असल्याचे त्यांच्या पुढाऱ्‍याने त्यांच्या निदर्शनास आणून दिले. (१ शमुवेल १४:३१-३५) या कारणास्तव, जीवन अमूल्य असले तरी, आणीबाणीच्या परिस्थितीत त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करता येईल असे जीवनदात्याने कधीही म्हटलेले नाही.

रक्‍त व खरे ख्रिस्ती

रक्‍ताने जीवन वाचविण्याच्या प्रश्‍नावर ख्रिस्ती धर्माची भूमिका काय आहे?

येशू एक सचोटीचा माणूस होता, त्यामुळेच तो अतिशय आदरणीय मानला जातो. रक्‍त सेवन करणे चूक असल्याचे सृष्टीकर्त्याने सांगितलेले असून हा नियम बंधनकारक असल्याचे त्याला माहीत होते. या कारणास्तव, रक्‍त घेण्यासाठी त्याच्यावर कितीही दबाव आला तरीही येशू या नियमाचे समर्थन करील असा विश्‍वास ठेवण्यास सबळ कारण आहे. येशूने “पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही.” (१ पेत्र २:२२) अशा रितीने, जीवन व रक्‍ताचा आदर करण्याच्या नमुन्यासकट त्याने आपल्या अनुयायांना एक कित्ता घालून दिला. (तुमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्‍या या अत्यंत महत्त्वाच्या बाबतीत येशूचे स्वतःचे रक्‍त कसे गोवलेले आहे, ते आपण पुढे पाहू.)

येशूच्या मृत्युच्या अनेक वर्षांनी, ख्रिस्ती बनणाऱ्‍या माणसाने इस्राएलांचे सर्व नियम पाळलेच पाहिजेत किंवा नाही याबद्दल प्रश्‍न उभा राहिला असताना जे घडले त्याकडे लक्ष द्या. प्रेषितांचा समावेश असलेल्या शासकीय नियमन मंडळाच्या कार्यकारी समितीमध्ये त्याची चर्चा झाली. येशूचा सावत्र भाऊ याकोब याने रक्‍ताबद्दल नोहा व इस्राएल राष्ट्राला दिलेल्या देवाच्या नियमांचा अंतर्भाव असलेल्या ग्रंथांचा उल्लेख केला. ते ख्रिस्ती लोकांवर बंधनकारक असणार का?—प्रे. कृत्ये १५:१-२१.

त्या कार्यकारी समितीने त्यांचा निर्णय सर्व मंडळ्यांना पाठवलाः ख्रिस्ती लोकांनी मोशेला दिलेले नियमशास्त्र पाळण्याची गरज नाही, पण “मूर्तीला अर्पिलेल्या वस्तु व रक्‍त व गुदमरून मेलेली जनावरे [रक्‍त न काढलेले मांस] व जारकर्म” ही वर्ज्य करणे त्यांना “अगत्याचे” आहे. (प्रे. कृत्ये १५:२२-२९) ते प्रेषित केवळ धार्मिक विधि वा आहारविषयक नियम देत नव्हते. त्या निवाड्यात मूलभूत नैतिक आदर्श घालून देण्यात आला. आणि सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांनी तो पाळला. त्यापुढे एका दशकानंतरही “मूर्तीला अर्पिलेल्या वस्तु व रक्‍त . . . व जारकर्म यापासून त्यांनी” आपल्याला राखले पाहिजे असे त्यांनी मान्य केले होते.—प्रे. कृत्ये २१:२५.

लाखो लोक चर्चला जातात हे तुम्हाला माहीतच आहे. मूर्तीची उपासना न करणे तसेच निःसंकोचपणे अनैतिकतेत सहभागी न होणे या गोष्टी ख्रिस्ती नैतिकतेत गोवलेल्या आहेत याच्याशी त्यातील अनेक बहुधा सहमत होतील. परंतु, प्रेषितांनी, रक्‍तापासून अलिप्त राहणे हे सुद्धा, या चुका टाळण्याच्या उच्च नैतिक पातळीवरच मानले हे आपण लक्षात घेण्याजोगे आहे. या निवाड्याच्या शेवटी म्हटले होतेः “ह्‍यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल. क्षेमकुशल असो.”—प्रे. कृत्ये १५:२९.

प्रेषितांचा हा निवाडा पूर्वीपासून बंधनकारक मानला गेला. ख्रिस्ती लोकांना “निर्बुद्ध प्राण्यांचे रक्‍त खाण्याचीही परवानगी नाही.” ही गोष्ट दुसऱ्‍या शतकामध्ये, छळामुळे मरताना एका तरुण मुलीने सिद्ध केली असे युसेबियस सांगतो. ती मरणाचा हक्क बजावीत नव्हती. तिला जगण्याची इच्छा होती, परंतु ती आपले तत्त्व सोडण्यास तयार नव्हती. वैयक्‍तीक लाभापेक्षा तत्त्वाला अधिक महत्त्व देणाऱ्‍यांबद्दल तुम्हाला आदर वाटत नाही का?

जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने अनुमान काढलेः “रक्‍त खाण्यावरील बंदीविषयी नोहाला दिलेला नियम त्याच्या सर्व वंशजांवर बंधनकारक होता असे दिसते. . . . प्राचीन ख्रिस्ती लोकांना प्रेषितांच्या मनाई हुकुमाचे स्वरुप व मर्यादा योग्य रितीने समजली नसेल असे मानता येणार नाही. त्यांच्या व्यवहारावरुन त्या हुकुमाचा अर्थ आपण लावल्यास तो अमर्याद व कायमचा असावा असा उद्देश होता अशाच निर्णयाप्रत आपण येतो; कारण अनेक शतकांपर्यंत कोणाही ख्रिस्ती माणसाने रक्‍त खाल्ले नाही.”

रक्‍ताचा औषध म्हणून वापर करण्याबद्दल काय?

नोहा, मोशे अथवा प्रेषितांच्या काळी नक्कीच माहीत नसलेल्या, संक्रमणासारख्या, रक्‍ताच्या वैद्यकीय वापराचा अंतर्भाव पवित्र शास्त्रामधील मनाईमध्ये होतो का?

रक्‍त वापरणाऱ्‍या आधुनिक उपचार पद्धती त्या काळी अस्तित्वात नसल्या तरी रक्‍ताचा वैद्यकीय वापर काही आधुनिक नव्हे. २,००० वर्षांपर्यंत मिसर व इतर देशांमध्ये मानवी “रक्‍त हे महारोगावरील खात्रीशीर औषध होते असे मानले जात होते.” अश्‍शुरचे राज्य तंत्रज्ञानात आघाडीवर असताना एसर-हद्दोन राजाच्या मुलावर केलेले उपाय एका वैद्याने सांगितलेः “[राजपुत्र] आता खूपच बरे आहेत. महाराज, आमचे स्वामी आता आनंदी होतील. २२ व्या दिवसापासून सुरवात करून मी (राजपुत्र यांना) रक्‍त पिण्यास देतो. ते आणखी ३ दिवस ते पितील. शिवाय आणखी ३ दिवस अंतर्गत उपयोगासाठी मी (त्यांना रक्‍त) देईन.” एसर-हद्दोनचे इस्राएल लोकांशी दळणवळण होते. परंतु इस्राएल लोकांना देवाचे नियम असल्याने ते औषध म्हणून कधीही रक्‍त पीत नव्हते.

रोमी काळात औषध म्हणून रक्‍त वापरले गेले का? प्लिनी हा सृष्टपदार्थ वेत्ता (नैसर्गिक नियमांवर विश्‍वास ठेवणारा; व प्रेषितांच्या समकालीन) तसेच आर्टियस हा दुसऱ्‍या शतकातील वैद्य अशी माहिती देतात की, मानवी रक्‍त हा मिर्गीवरील एक उपाय होता. त्यानंतर टर्टुलियनने लिहिलेः “आखाड्यातील प्रदर्शनात दुष्ट गुन्हेगारांचे ताजे रक्‍त अधाशीपणे घेतात व आपली मिर्गी बरी करण्यासाठी नेतात अशांकडे ध्यान द्या.” ज्यांच्या “जेवणात प्राण्यांचे रक्‍तही नाही . . . ख्रिस्ती लोकांच्या खटल्याच्या वेळी तुम्ही त्यांना रक्‍ताने भरलेले पदार्थ देता. परंतु तुम्हाला निश्‍चित माहीत आहे की, त्यांच्यासाठी ते बेकायदेशीरही आहे.” अशा ख्रिस्ती जनांशी वरील प्रकारच्या लोकांचा परस्पर विरोध टर्टुलियन दाखवीत होता. तेव्हा, सुरवातीचे ख्रिस्ती, रक्‍त खाण्यापेक्षा मृत्युचा धोका पत्करत असत.

“औषध व जादुविद्या यातील एक घटक म्हणून नेहमीच्या स्वरुपातील रक्‍ताची लोकप्रियता कधीच संपली नाही.” असे फ्लेश ॲण्ड ब्लड हे पुस्तक सांगते. ते पुढे म्हणतेः “उदाहरणार्थ, १४८३ मध्ये फ्रान्सचा राजा ११ वा लुई मृत्युपंथाला लागला होता. ‘दिवसागणिक त्याची प्रकृती खालावू लागली आणि अपरिचित स्वरुपाची असली तरी त्या औषधींचा त्याला काहीही फायदा झाला नाही; कारण मानवी रक्‍तामुळे आपण बरे होऊ अशी त्याला जबरदस्त आशा होती व त्यामुळे तो काही बालकांपासून रक्‍त घेऊन ते पीत असे.’”

आता, रक्‍ताचे संक्रमण करण्याविषयी काय म्हणता येईल? याचे प्रयोग १६ व्या शतकाच्या आरंभी सुरु झाले. कोपनहेगन विश्‍वविद्यालयाच्या शरीरशास्त्राचे प्राध्यापक टॉमस बार्थोलिन (१६१६-८०) यांनी त्याला आक्षेप घेतला होताः “रोगावर पोटात घ्यावयाच्या उपायांसाठी मानवी रक्‍ताचा उपयोग बळेच करतात ते त्याचा गैरवापर करतात व घोर पाप करतात असे दिसते. नरमांसभक्षक दोषास्पद गणले जातात, मग, आपला घसा मानवी रक्‍ताने डागाळणाऱ्‍यांचा आपण तिटकारा का करत नाही? कापलेल्या शिरेतून परके रक्‍त काढून तोंडावाटे अथवा संक्रमणाच्या साधनांद्वारे घेणे हे त्यासारखेच आहे. रक्‍त खाण्याची मनाई असलेल्या त्या दैवी नियमांना असे काम करणारे घाबरुन असतात.”

या कारणास्तव, रक्‍त तोंडावाटे घेण्याइतकाच शिरांमार्फत घेण्याला पवित्र शास्त्राचा नियम लागू होत असल्याचे मागील शतकातील विचारवंत लोकांना समजले होते. “रक्‍त घेण्याचा प्रकार कोणताही असला तरी त्यांचा हेतू एकच आहे, तो म्हणजे या रक्‍ताने आजारी माणसाचे पोषण व्हावे व तो बरा व्हावा.” असे अनुमान बार्थोलिन यांनी काढले.

सर्व परिस्थितीवर टाकलेल्या या दृष्टीक्षेपाने, यहोवाचे साक्षीदार घेत असलेली अनुल्लंघनीय धार्मिक भूमिका समजण्यास, तुम्हाला मदत होईल. ते जीवनाला बहुमोल मानतात व चांगला वैद्यकीय इलाज मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु, देवाने दिलेली भेट या नात्याने जीवनाचा आदर करणारे, रक्‍त घेऊन जीवनाला आधार देण्याचा प्रयत्न करत नाहीत  या देवाच्या अटळ नियमाचा भंग न करण्याचा त्यांचा निर्धार आहे.

असे असताही, रक्‍त जीवन वाचवते असा दावा अनेक वर्षे करण्यात आला आहे. एखाद्याचे बरेच रक्‍त गेले आहे परंतु त्याला संक्रमण दिले व त्यानंतर तो झपाट्याने बरा झाला अशी अनेक उदाहरणे डॉक्टर सांगू शकतील. या कारणामुळे, ‘वैद्यकीयदृष्ट्या हे किती शहाणपणाचे वा चूक आहे?’ असा प्रश्‍न तुम्हाला पडणे शक्य आहे. रक्‍त देण्याच्या औषधोपचाराला आधार म्हणून वैद्यकीय पुरावा दिला जातो. यासाठी, सर्व माहिती लक्षात घेऊन, स्वतःच्या फायद्याकरिता, रक्‍ताबद्दल निवड करण्यासाठी वस्तुस्थिती नीट समजावून घेणे तुमचे कर्तव्य आहे.

[तळटीपा]

a प्रे. कृत्ये १७:२५, २८ येथील पौलाचे उद्‌गार.

b या सारखे निर्बंध कालांतराने कुराणात लिहिण्यात आले.

[४ पानांवरील चौकट]

“दक्षतेने व पद्धतशीरपणे मांडण्यात आलेले ते निर्बंध [प्रे. कृत्ये १५ व्या अध्यायातील] अत्यावश्‍यक ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे प्रेषितांच्या मनात ती तात्पुरती व्यवस्था किंवा तेवढ्यापुरता उपाय नव्हता याचा भक्कम पुरावा मिळतो.”—प्राध्यापक एडोआर्ड रियुस, स्ट्रासबर्ग विश्‍वविद्यालय.

[५ पानांवरील चौकट/चित्र]

प्रेषितांच्या हुकुमाच्या ध्वन्यर्थाकडे मार्टीन ल्यूथरने निर्देश केलाः “या परिषदेला अनुसरणारे चर्च आपल्याला हवे असेल, . . . तर यापुढे कोणाही राजा, सरदार, शहरवासी वा शेतकऱ्‍याने रक्‍तात शिजविलेली बदके, नर व मादी हरणे तसेच डुकराचे मांस खाऊ नये अशी शिकवण आपण दिली पाहिजे व तसा आग्रह धरला पाहिजे. . . . तसेच शहरवासी व शेतकऱ्‍यांनी लाल सॉसेज व रक्‍ताच्या सॉसेजपासून दूर राहावे.”

[चित्राचे श्रेय]

Woodcut by Lucas Cranach

[६ पानांवरील चौकट/चित्र]

“देव व माणसे गोष्टींना अगदी वेगवेगळ्या दृष्टीकोणातून पाहतात. आपल्या नजरेला जे महत्त्वाचे वाटते ते अगाध बुद्धीच्या मते अनेकदा क्षुल्लक असते; व आपल्याला जे किरकोळ वाटते ते अनेकदा देवाला अतिशय महत्त्वाचे वाटते. हे असे सुरवातीपासून आहे.”—“ॲन इन्क्वायरी इन्टू द लॉफूलनेस ऑफ इटींग ब्लड.” अलेक्झांडर पीरी, १७८७.

[३ पानांवरील चित्र]

Medicine and the Artist by Carl Zigrosser/Dover Publications

[४ पानांवरील चित्रं]

एका ऐतिहासिक परिषदेमध्ये, रक्‍ताविषयी देवाचा नियम अजूनही बंधनकारक आहे याला ख्रिस्ती नियमन मंडळाने पुष्टी दिली

[७ पानांवरील चित्रं]

परिणाम काही घडले तरी, रक्‍ताबद्दल देवाच्या नियमाचा भंग करण्यास सुरवातीच्या ख्रिस्ती लोकांनी नकार दिला

[चित्राचे श्रेय]

Painting by Gérôme, 1883, courtesy of Walters Art Gallery, Baltimore