पुन्हा भेटण्यासाठी
धडा ७
प्रयत्न करत राहा
तत्त्व: ‘लोकांना शिकवण्यात आणि आनंदाचा संदेश सांगण्यात त्यांनी खंड पडू दिला नाही.’—प्रे. कार्यं ५:४२.
पौलने काय केलं?
१. व्हिडिओ पाहा किंवा प्रेषितांची कार्यं १९:८-१० वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्नांवर विचार करा:
पौलकडून आपण काय शिकतो?
२. चांगल्या पुनर्भेटी करण्यासाठी आणि बायबल अभ्यास सुरू करण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे आणि मेहनत घेतली पाहिजे.
पौलने केलं तसं करा
३. समोरच्या व्यक्तीला जी वेळ सोयीची असेल त्या वेळी जा. स्वतःला विचारा: ‘त्याच्याकडे बोलायला कधी वेळ असेल? आणि त्याला कुठे भेटायला आवडेल?’ त्याच्या वेळेप्रमाणे भेटणं तुमच्यासाठी सोयीचं नसलं तरी त्याला जाऊन भेटा.
४. पुन्हा भेटायची वेळ ठरवा. संभाषण संपल्यावर प्रत्येक वेळी पुन्हा कधी भेटायचं याची वेळ ठरवा. आणि ठरवलेल्या वेळी नक्की भेटा.
५. आशा सोडू नका. एखादी व्यक्ती क्वचित घरी भेटत असेल किंवा नेहमी कामात असेल, तर तिला आवडच नाही असा लगेच विचार करू नका. (१ करिंथ. १३:४, ७) याउलट, तिला पुन्हा भेटायचा प्रयत्न करत राहा. पण त्यासोबतच तुम्ही आपल्या वेळेचा चांगला उपयोग करत आहात याकडेही लक्ष द्या.—१ करिंथ. ९:२६.