व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १०

आवाजात चढ-उतार

आवाजात चढ-उतार

नीतिसूत्रे ८:४, 

सारांश: आवाजात चढ-उतार करून, आवाज कमी-जास्त करून, बोलण्याची गती कमी-जास्त करून, मुद्दे स्पष्टपणे सांगा आणि श्रोत्यांच्या मनापर्यंत पोचा.

हे कसं कराल:

  • आवाजात चढ-उतार. मुख्य मुद्दे सांगण्यासाठी आणि श्रोत्यांना उत्तेजन देण्यासाठी आवाज थोडा वाढवा. तसंच, वचनात न्यायदंडाविषयी काही असेल तर ते वाचतानाही आवाज थोडासा वाढवा. श्रोत्यांच्या मनात उत्सुकता वाढवण्यासाठी किंवा भीती, चिंता यांबद्दल सांगताना आवाज कमी करा.

  • आवाज कमी-जास्त करा. तुमच्या भाषेत योग्य असेल तर आवेश व्यक्‍त करण्यासाठी किंवा आकार, अंतर यांबद्दल सांगण्यासाठी मोठ्याने बोला. दुःख किंवा चिंता व्यक्‍त करताना कमी आवाजात बोला.

  • बोलण्याची गती कमी-जास्त करा. एखादी आनंदाची गोष्ट व्यक्‍त करत असाल तर बोलण्याची गती वाढवा. महत्त्वाचे मुद्दे सांगत असता तेव्हा हळूहळू बोला.