व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास ११

आवेश

आवेश

रोमकर १२:११

सारांश: आवेशाने बोलून श्रोत्यांच्या मनाला चालना व उत्तेजन द्या.

हे कसं कराल:

  • मनापासून तयारी करा. सादरतेची तयारी करताना तुमचा संदेश किती महत्त्वाचा आहे यावर मनन करा. ती माहिती इतक्या चांगल्या प्रकारे समजून घ्या की ती सादर करताना तुम्ही मनापासून बोलू शकाल.

  • श्रोत्यांचा विचार करा. तुम्ही जी माहिती वाचून दाखवाल किंवा शिकवाल तिचा इतरांना कसा फायदा होईल यावर मनन करा. श्रोत्यांच्या मनात कदर वाढवण्यासाठी ही माहिती कोणकोणत्या पद्धतीने सादर करता येईल त्याचा विचार करा.

  • तुमच्या सादरतेत जिवंतपणा आणा. आवेशाने बोला. तुमचे हावभाव नाटकी नाही, तर स्वाभाविक आहेत हे इतरांना समजलं पाहिजे.