व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १५

खातरीने बोला

खातरीने बोला

१ थेस्सलनीकाकर १:५

सारांश: तुम्ही जे सांगत आहात ते सत्य आहे आणि ती माहिती अत्यंत महत्त्वाची आहे हे दाखवून द्या.

हे कसं कराल:

  • चांगली तयारी करा. तयारी करताना माहितीचा चांगला अभ्यास करा आणि शास्त्रवचनांच्या आधारावर ती कशी खरी आहे हे आधी तुम्ही समजून घ्या. तुमच्या सादरतेतील मुख्य मुद्दे थोडक्या व सोप्या शब्दात मांडायचा प्रयत्न करा. श्रोत्यांना त्याचा कसा फायदा होईल यावर लक्ष केंद्रित करा. पवित्र आत्म्याची मदत मिळावी म्हणून प्रार्थना करा.

  • खातरीने बोलत आहात हे दाखवण्यासाठी तसे शब्द वापरा. छापील साहित्यातील शब्द जसेच्या तसे बोलून दाखवण्याऐवजी स्वतःच्या शब्दात भाषण सादर करा. असे शब्द वापरा ज्यावरून कळेल, की तुम्ही जे काही सांगत आहात त्याबद्दल तुम्हाला स्वतःला खातरी आहे.

  • कळकळीने व प्रामाणिकपणे बोला. ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात बोला. लोकांना खटकणार नसेल तर श्रोत्यांच्या नजरेला नजर भिडवून बोला.