व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १६

उत्तेजन देणारं आणि सकारात्मक

उत्तेजन देणारं आणि सकारात्मक

ईयोब १६:५

सारांश: समस्येवर नव्हे तर उपायावर आणि श्रोत्यांना उत्तेजन मिळेल अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांबद्दल मनात सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमच्या सहउपासकांची यहोवाला संतुष्ट करण्याची इच्छा आहे हा भरवसा बाळगा. सल्ला द्यायचा असला, तरी शक्य तेव्हा आधी मनापासून त्यांची प्रशंसा करा.

  • नकारात्मक माहिती कमी सांगा. एखाद्या विषयाच्या बाबतीत तुम्हाला नकारात्मक माहिती द्यायची असेल, तरीसुद्धा तो मुद्दा स्पष्ट होईपर्यंतच ती सादर करा. तुमचं संपूर्ण सादरीकरण सकारात्मक वाटलं पाहिजे.

  • देवाच्या वचनाचा चांगला वापर करा. यहोवाने मानवजातीसाठी काय केलं आहे, काय करत आहे आणि तो पुढे काय करणार आहे त्याकडे श्रोत्यांचं लक्ष वेधा. त्यांना उत्तेजन द्या आणि त्यांचं धैर्य वाढवा.