व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास १९

हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा

हृदयापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करा

नीतिसूत्रे ३:१

सारांश: शिकत असलेल्या गोष्टींचं महत्त्व समजून त्यानुसार आपल्या जीवनात बदल करण्यास श्रोत्यांना मदत करा.

हे कसं कराल:

  • श्रोत्यांना स्वतःचं परीक्षण करण्याचं उत्तेजन द्या. असे प्रश्‍न विचारा ज्यामुळे श्रोते स्वतःच्या मनातील भावनांचं परीक्षण करून पाहतील.

  • चांगली मनोवृत्ती बाळगायला मदत करा. ते चांगली कामं का  करतात याचं परीक्षण करायला श्रोत्यांना मदत करा. चांगली मनोवृत्ती बाळगायला मदत करा; जसं की यहोवा, सहमानव आणि बायबलमधील शिकवणी यांच्याबद्दल प्रेम वाढवायला त्यांना मदत करा. बायबलमध्ये बुद्धीच्या गोष्टी सांगितल्या आहेत हे पाहायला त्यांना मदत करा, पण त्यांना भाषण देऊ नका. त्यांना लाज वाटेल अशा गोष्टी बोलण्याऐवजी तुमच्या सादरतेनंतर त्यांना उत्तेजन मिळाल्यासारखं वाटलं पाहिजे. “मी शक्य तो प्रयत्न करेन” अशी प्रेरणा त्यांना मिळाली पाहिजे.

  • यहोवाकडे त्यांचं लक्ष वेधा. बायबलमधील शिकवणी, तत्त्वं, नियम यांतून देवाचे गुण, आपल्याबद्दल असलेलं त्याचं प्रेम कसं दिसून येतं त्यावर जोर द्या. कुठलीही गोष्ट करण्याआधी, यहोवाला कसं वाटेल, त्याला मी संतुष्ट कसं करू शकेन याचा विचार करण्याची इच्छा त्यांच्या मनात उत्पन्‍न करा.