अभ्यास २०
प्रभावी समाप्ती
उपदेशक १२:१३, १४
सारांश: सादरीकरणाच्या समाप्तीला शिकलेल्या गोष्टी स्वीकारून त्या आपल्या जीवनात लागू करण्याचं श्रोत्यांना उत्तेजन द्या.
हे कसं कराल:
-
समाप्तीला तुमच्या संपूर्ण भाषणाच्या विषयाशी जोडा. समाप्तीला पुन्हा एकदा तुमच्या भाषणाचा मुख्य विषय आणि मुख्य मुद्दे यांचा उल्लेख करा.
-
श्रोत्यांना कार्य करण्याचं उत्तेजन द्या. आता त्यांनी काय केलं पाहिजे व असं का केलं पाहिजे त्याची ठोस कारणं त्यांना द्या. मनापासून आणि खातरीने बोला.
-
समाप्ती सोपी आणि संक्षिप्त ठेवा. समाप्तीला नवीन मुद्दे सांगू नका. गरजेनुसार थोडक्यातच श्रोत्यांना कार्य करण्याचं पुन्हा एकदा उत्तेजन द्या.