व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास २

रोजच्या बोलण्याची शैली

रोजच्या बोलण्याची शैली

२ करिंथकर २:१७

सारांश: आपण एरवी जसं बोलतो तसं आणि प्रामाणिकपणे बोला. यावरून, तुम्ही बोलत असलेल्या विषयाबद्दल आणि लोकांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे समोरच्याला समजलं पाहिजे.

हे कसं कराल:

  • प्रार्थना करून चांगली तयारी करा. बोलत असताना स्वतःवर नाही तर संदेशावर लक्ष केंद्रित करायला मदत मिळावी म्हणून प्रार्थना करा. तुम्हाला जे मुख्य मुद्दे सांगायचे आहेत ते आधी तुमच्या मनात स्पष्ट असले पाहिजेत. छापलेल्या माहितीमधील शब्द न्‌ शब्द वाचून दाखवण्याऐवजी स्वतःच्या शब्दांत ते सांगा.

  • मनापासून बोला. श्रोत्यांनी तुमचा संदेश का ऐकला पाहिजे याचा विचार करा. त्यांच्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. तुम्ही जसं उभं राहता, तुमचे हावभाव व चेहऱ्‍यावरील भाव यांवरून तुमचं बोलणं प्रामाणिक व मैत्रीपूर्ण आहे हे दिसून येईल.

  • ऐकणाऱ्‍यांकडे बघून बोला. समोरच्या व्यक्‍तीच्या नजरेला नजर भिडवून बोलणं जर चुकीचं समजलं जात नसेल तर तशा प्रकारे बोला. मंडळीत भाषण देताना सर्व श्रोत्यांवर नजर फिरवण्याऐवजी, एका वेळी श्रोत्यांमध्ये बसलेल्या कोणा एकाकडेच बघून बोला.