व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास ४

शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय

शास्त्रवचनांचा चांगल्या प्रकारे परिचय

मत्तय २२:४१-४५

सारांश: शास्त्रवचन वाचण्याआधी श्रोत्यांचं मन तयार करा.

हे कसं कराल:

  • तुम्ही वचन का वाचून दाखवत आहात त्याचा विचार करा. प्रत्येक वचनाचा परिचय देताना त्या वचनातल्या मुख्य मुद्द्‌याकडे श्रोत्यांचं लक्ष गेलं पाहिजे.

  • बायबलचा वापर करा. देवावर विश्‍वास ठेवणाऱ्‍या लोकांशी बोलताना, बायबल हे “देवाचं वचन” आहे या गोष्टीकडे त्यांचं लक्ष वेधा. असं करून तुम्ही दाखवून देता, की बुद्धीचा खरा स्रोत देवच आहे.

  • शास्त्रवचनात आवड निर्माण करा. असा प्रश्‍न विचारा किंवा अशा एखाद्या समस्येचा उल्लेख करा ज्याचं उत्तर त्या वचनात आहे. किंवा असं एखादं तत्त्व सांगा जे समजायला शास्त्रवचनातील अहवाल त्यांना मदत करेल.