व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास ७

अचूक आणि पटण्यासारखं

अचूक आणि पटण्यासारखं

लूक १:३

सारांश: लोकांना योग्य निष्कर्ष काढता यावा म्हणून भरवसालायक पुरावे द्या.

हे कसं कराल:

  • भरवशालायक माहितीचा उपयोग करा. तुम्ही जे काही बोलता ते देवाच्या वचनाच्या आधारावरच असलं पाहिजे; शक्य असेल तेव्हा सरळ बायबलमधूनच वाचून दाखवा. तुम्ही एखादा वैज्ञानिक पुरावा देणार असाल, बातमी किंवा अनुभव सांगणार असाल किंवा इतर पुरावे सादर करणार असाल, तर ती माहिती भरवशालायक आहे, तसंच जुनी नाही याची खातरी करा.

  • पुराव्यांचा योग्य उपयोग करा. शास्त्रवचनांचा संदर्भ, बायबलचा एकूण संदेश आणि “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” यांनी तयार केलेली प्रकाशनं, यांच्या आधारावर स्पष्टीकरण द्या. (मत्त. २४:४५) तुम्ही बायबलच्या व्यतिरिक्‍त इतर पुरावे सादर करत असाल, तर त्यांचा मूळ अर्थ बदलू नका किंवा लेखकाने जे म्हटलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही सांगू नका.

  • पुराव्यांवर तर्क करा. एखादं वचन वाचल्यावर किंवा माहिती सांगितल्यावर, व्यवहारकुशलतेने प्रश्‍न विचारा किंवा उदाहरण द्या. यामुळे श्रोत्यांना स्वतःच निष्कर्षावर पोचता येईल.