व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अभ्यास ८

शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा

शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा

मत्तय १३:३४, ३५

सारांश: लोकांची आवड वाढवणाऱ्‍या व त्यांना महत्त्वपूर्ण मुद्दे शिकवणाऱ्‍या साध्या-सोप्या उदाहरणांचा उपयोग करून आपल्या शिकवण्याच्या कलेत सुधारणा करा.

हे कसं कराल:

  • साधी-सोपी उदाहरणं निवडा. येशूने जसं मोठ्या गोष्टी समजावण्यासाठी लहान गोष्टींची उदाहरणं दिली आणि कठीण गोष्टी समजवण्यासाठी सोपी उदाहरणं दिली, तसंच तुम्हीदेखील करा. बारीक-सारीक अनावश्‍यक गोष्टी सांगून उदाहरण समजायला कठीण करू नका. तुम्ही देत असलेलं उदाहरण, तुम्ही शिकवत असलेल्या गोष्टीशी जुळत आहेत याची खातरी करा. कारण तुमच्या उदाहरणातील गोष्टी लागू होत नसतील तर ऐकणारे लोक आणखीनच गोंधळून जातील.

  • लोकांना फायदा कसा होईल याचा विचार करा. श्रोत्यांच्या दररोजच्या जीवनाशी व त्यांच्या आवडीच्या विषयांशी संबंधित असलेली उदाहरणं निवडा. पण तुमच्या उदाहरणामुळे त्यांना लाजल्यासारखं होऊ नये किंवा त्यांना ते खटकू नये याची काळजी घ्या.

  • मुख्य मुद्दा शिकवा. बारीक-सारीक गोष्टींच्या ऐवजी मुख्य मुद्द्‌यांवर लक्ष केंद्रित करा. श्रोत्यांना फक्‍त तुमचं उदाहरणच नव्हे तर ते उदाहरण देण्यामागचा मुद्दादेखील लक्षात राहिला पाहिजे.