व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग एक

“आकाश उघडलं”

“आकाश उघडलं”

यहेज्केल १:१

भाग कशाबद्दल आहे: यहोवा जिथे राहतो त्याची एक झलक

सर्वोच्च देव यहोवाला पहिल्यावर कोणताही माणूस जिवंत राहू शकत नाही. (निर्ग. ३३:२०) पण यहोवा देवाने यहेज्केलला दृष्टान्ताद्वारे त्याच्या निवासस्थानाची झलक दिल्यामुळे आपल्याला त्याच्या संघटनेच्या स्वर्गातल्या भागाची माहिती मिळते. ही माहिती रोमांचक तर आहेच, पण त्यासोबत एकच खरा देव यहोवा याची उपासना करायचा जो बहुमान आपल्याला मिळाला आहे त्याबद्दलची आपली कदरही वाढते.

या विभागात

अध्याय ३

“मला देवाकडून दृष्टान्त मिळू लागले”

पहिला दृष्टान्त पाहून यहेज्केल खूप चकित होता. देवाच्या विश्‍वासू सेवकांना त्यातून खूप काही शिकायला मिळतं.

अध्याय ४

‘चार तोंडं असलेले जिवंत प्राणी’ कशाला सूचित करतात?

यहोवाने यहेज्केलला न दिसणाऱ्‍या खऱ्‍या गोष्टींबद्दलचे दृष्टान्त दाखवले. त्यामुळे आज आपण ते समजू शकतो.