व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग पाच

‘मी लोकांमध्ये राहीन’—यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू

‘मी लोकांमध्ये राहीन’—यहोवाची शुद्ध उपासना पुन्हा सुरू

यहेज्केल ४३:७

भाग कशाबद्दल आहे: दृष्टान्तातल्या मंदिराची काही वैशिष्ट्यं आणि त्यांपासून शुद्ध उपासनेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं

यहोवाने यहेज्केल संदेष्ट्याला आणि प्रेषित योहानला जे दृष्टान्त दाखवले त्यांत काही खास समानता आहेत. दृष्टान्तांतल्या त्या वैशिष्ट्यांपासून आज आपल्याला बरेच मोलाचे धडे शिकायला मिळतात. त्यामुळे यहोवाला आवडेल अशा प्रकारे त्याची उपासना करायला आपल्याला मदत होते. तसंच, नवीन जगातलं आपलं जीवन कसं असेल याची एक झलकही आपल्याला मिळते.

या विभागात

अध्याय १९

“जिथे-जिथे नदीचं हे पाणी वाहील तिथे-तिथे जीवन असेल”

यहेज्केलने मंदिरातून नदी वाहत असल्याचा जो दृष्टान्त पाहिला, तो पूर्ण झाला आहे आणि पुढे मोठ्या प्रमाणावर पूर्ण होणार आहे, असं आपण का म्हणू शकतो?

अध्याय २०

‘वारसा म्हणून देशाच्या जमिनीची वाटणी करा’

एका दृष्टान्तात, देव यहेज्केलला आणि बंदिवानांना वचन दिलेल्या देशाची इस्राएलच्या वंशांमध्ये वाटणी करायला सांगतो.

अध्याय २१

“त्या शहराचं नाव ‘यहोवा तिथे आहे’ असं असेल”

यहेज्केलने शहराबद्दलचा आणि त्याच्या अर्थपूर्ण नावाबद्दलचा जो दृष्टान्त पाहिला, त्यातून आपण कोणते धडे शिकू शकतो?

अध्याय २२

“देवाची उपासना कर”

फक्‍त यहोवाचीच उपासना करण्याचा आपला निर्धार आणखी पक्का करण्यासाठी हे प्रकाशन तयार करण्यात आलं आहे.