व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १०ग

’आपल्या पायांवर उभं राहायला’ यहोवा आपल्याला बळ देईल

’आपल्या पायांवर उभं राहायला’ यहोवा आपल्याला बळ देईल

यहेज्केल ३७:१-१४ मध्ये जो जबरदस्त दृष्टान्त दिला आहे त्यावर मनन केल्यामुळे आपल्याला कठीण काळाचा सामना करायला मदत मिळू शकते.

कधीकधी आपण आपल्या जीवनातल्या चिंतांच्या आणि समस्यांच्या ओझ्याखाली इतके दबून जातो, की आपल्याला वाटतं ‘आता बस्स! मी आणखी सहन करू शकत नाही.’ पण अशा वेळी आपण शुद्ध उपासनेबद्दल यहेज्केलला दिलेल्या या दृष्टान्तावर मनन केलं, तर आपल्याला खूप बळ मिळू शकतं. असं आपण का म्हणू शकतो? कारण यहोवा जर निर्जीव हाडांना पुन्हा जिवंत करू शकतो, तर तो आपल्याला कोणत्याही समस्यांचा सामना करण्यासाठी नक्कीच ताकद देऊ शकतो; मग त्या समस्या डोंगरासारख्या मोठ्या असल्या तरीही.—स्तोत्र १८:२९ वाचा; फिलिप्पै. ४:१३.

यहेज्केलच्या काळाच्या बऱ्‍याच शतकांआधी मोशे संदेष्ट्याने यहोवाबद्दल काय म्हटलं होतं ते आपल्याला आठवत असेल. त्याने म्हटलं होतं, की यहोवाकडे आपल्या लोकांना मदत करायची फक्‍त ताकदच नाही, तर इच्छासुद्धा आहे. मोशेने म्हटलं: “प्राचीन काळापासून देव तुझा आश्रय आहे, त्याचे सर्वकाळाचे बाहू तुला आधार देतात.” (अनु. ३३:२७) त्यामुळे आपण हा पक्का भरवसा ठेवू शकतो, की दुःखात असताना आपण जर यहोवाला मदतीसाठी हाक मारली तर तो प्रेमाने आपल्याला हात देईल आणि पुन्हा ‘आपल्या पायांवर उभं राहायला’ बळ देईल.—यहे. ३७:१०.

अध्याय १०, परिच्छेद १५, १६ वर परत जाण्यासाठी