व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट ७ख

यहेज्केलच्या पुस्तकातले काही खास शब्द

यहेज्केलच्या पुस्तकातले काही खास शब्द

“मनुष्याच्या मुला”

९० पेक्षा जास्त वेळा

यहोवाने यहेज्केलला ९० पेक्षा जास्त वेळा “मनुष्याच्या मुला” म्हटलं. (यहे. २:१) यहोवाला यहेज्केलला सांगायचं होतं, की त्याला मोठमोठ्या जबाबदाऱ्‍या आणि बहुमान मिळाले असले, तरी तो फक्‍त एक मनुष्यच आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शुभवर्तमानांच्या पुस्तकात येशूलासुद्धा जवळजवळ ८० वेळा ‘मनुष्याच्या मुला’ म्हटलं आहे. यावरून दिसून येतं, की येशू पृथ्वीवर आला तेव्हा तो नुसतंच माणसाच्या रूपात आलेला स्वर्गदूत नव्हता, तर तो खरोखर एक माणूस होता.—मत्त. ८:२०.

“. . . तेव्हा तुम्हाला समजेल की मी यहोवा आहे”

जवळपास ५० वेळा

यहेज्केलने आपल्या पुस्तकात जवळपास ५० वेळा “तुम्हाला समजेल की मी यहोवा आहे” किंवा “तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे,” या देवाने म्हटलेल्या शब्दांचा उल्लेख केला. त्याला या गोष्टीवर भर द्यायचा होता, की शुद्ध उपासना मिळण्याचा हक्क फक्‍त यहोवालाच आहे.—यहे. ६:७.

“सर्वोच्च प्रभू यहोवा”

२१७ पेक्षा जास्त वेळा

यहेज्केलच्या पुस्तकात “सर्वोच्च प्रभू यहोवा” हे शब्द २१७ पेक्षा जास्त वेळा आले आहेत. यहोवाच्या नावाला जितकं महत्त्व मिळालं पाहिजे ते देण्यासाठी आणि सगळी सृष्टी यहोवाच्या अधीन आहे हे दाखवण्यासाठी हे शब्द वापरले आहेत.—यहे. २:४.

अध्याय ७, परिच्छेद २८ वर परत जाण्यासाठी