व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट २ख

यहेज्केल—त्याचं जीवन आणि त्याचा काळ

यहेज्केल—त्याचं जीवन आणि त्याचा काळ

यहेज्केल या नावाचा अर्थ “देव शक्‍ती देतो,” असा आहे. त्याने केलेल्या भविष्यवाण्यांमध्ये जास्तकरून इशारे देण्यात आले असले, तरी त्याचा एकंदरीत संदेश त्याच्या नावाच्या अर्थाशी मेळ खातो. या भविष्यवाण्यांमुळे देवाची शुद्ध उपासना करण्याची इच्छा असलेल्यांचा विश्‍वास मजबूत होतो.

यहेज्केलच्या काळातले संदेष्टे

  • यिर्मया

    तो याजक कुटुंबातला होता. त्याने जास्तकरून यरुशलेममध्ये सेवा केली (इ.स.पू. ६४७-५८०)

  • हुल्दा

    तिने इ.स.पू ६४२ च्या आसपास मंदिरात नियमशास्त्राचं पुस्तक सापडलं त्या काळात सेवा केली

  • दानीएल

    हा यहूदा वंशातला, म्हणजेच शाही घराण्यातला होता. इ.स.पू. ६१७ मध्ये त्याला बाबेलच्या बंदिवासात नेण्यात आलं

  • हबक्कूक

    त्याने यहूदामध्ये सेवा केली; कदाचित यहोयाकीम राजाने राज्य करायला सुरुवात केली त्या काळात

  • ओबद्या

    त्याने अदोमच्या न्यायदंडाबद्दल भविष्यवाणी केली; कदाचित यरुशलेमचा नाश झाला त्या काळात

त्यांनी भविष्यवाण्या कधी केल्या? (इ.स.पू.)

यहेज्केलच्या काळातल्या खास घटना (इ.स.पू.)

  1. सु. ६४३: जन्म

  2. ६१७: बाबेलच्या बंदिवासात नेण्यात आलं

  3. ६१३: भविष्यवाणी करायला सुरुवात करतो; देवाकडून दृष्टान्त मिळू लागतात

  4. ६१२: मंदिरात होणाऱ्‍या खोट्या उपासनेचा दृष्टान्त पाहतो

  5. ६११: यरुशलेमच्या नाशाचा संदेश सांगायला सुरुवात करतो

  6. ६०९: पत्नीचा मृत्यू होतो आणि यरुशलेमला शेवटचा वेढा पडायला सुरुवात होते

  7. ६०७: यरुशलेमचा नाश झाल्याची पक्की खबर मिळते

  8. ५९३: मंदिराचा दृष्टान्त पाहतो

  9. ५९१: नबुखद्‌नेस्सर इजिप्तवर हल्ला करेल अशी भविष्यवाणी करतो; आपल्या पुस्तकाचं लिखाण पूर्ण करतो

यहूदा आणि बाबेलचे राजे

  1. ६५९-६२९: योशीया शुद्ध उपासनेला बढावा देतो, पण फारो-नखोसोबत लढताना युद्धात मारला जातो

  2. ६२८: दुष्ट राजा यहोआहाज तीन महिने राज्य करतो आणि नंतर फारो-नखो त्याला ताब्यात घेतो

  3. ६२८-६१८: फारो-नखो याच्या अधिकाराखाली दुष्ट राजा यहोयाकीम राज्य करतो

  4. ६२५: नबुखद्‌नेस्सर इजिप्तच्या सैन्याला हरवतो

  5. ६२०: नबुखद्‌नेस्सरचा यहूदावर पहिला हल्ला; तो आपल्या अधिकाराखाली यहोयाकीमला यरुशलेममध्ये राजा म्हणून नेमतो

  6. ६१८: यहोयाकीम नबुखद्‌नेस्सरविरुद्ध बंड करतो. पण बाबेलचे लोक वचन दिलेल्या देशावर दुसऱ्‍यांदा हल्ला करतात तेव्हा कदाचित त्याचा मृत्यू होतो

  7. ६१७: दुष्ट राजा यहोयाखीन तीन महिने राज्य करतो आणि मग नबुखद्‌नेस्सरला शरण जातो. यहोयाखीनला यखन्या या नावानेही ओळखलं जातं

  8. ६१७-६०७: नबुखद्‌नेस्सर आपल्या अधिकाराखाली दुष्ट आणि भित्र्या सिद्‌कीयाला राजा बनवतो

  9. ६०९: सिद्‌कीया नबुखद्‌नेस्सरविरुद्ध बंड करतो; नबुखद्‌नेस्सर तिसऱ्‍यांदा यहूदावर हल्ला करतो

  10. ६०७: नबुखद्‌नेस्सर यरुशलेमचा नाश करतो, सिद्‌कीयाला ताब्यात घेतो, त्याचे डोळे फोडतो आणि बाबेलला घेऊन जातो

अध्याय २, परिच्छेद २८, २९ वर परत जाण्यासाठी