व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट २०क

देशाच्या जमिनीची वाटणी

देशाच्या जमिनीची वाटणी

देशाच्या सीमा कुठून कुठपर्यंत असतील आणि इस्राएलच्या प्रत्येक वंशाला कुठून कुठपर्यंत जमिनीचा हिस्सा द्यावा हे दृष्टान्तात अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं. यामुळे बंदिवासात असलेल्या यहुद्यांना याचं आश्‍वासन मिळालं, की ते पुन्हा आपल्या मायदेशात जाऊन राहतील. या दृष्टान्तातून आज आपल्यालाही काही गोष्टी शिकायला मिळतात. चला, अशा दोन गोष्टी आता आपण पाहू या:

प्रत्येकाला एक सुरक्षित जागा आणि प्रत्येकाची सेवा मौल्यवान

दृष्टान्तातून प्रत्येकाला याचं आश्‍वासन मिळालं, की तो आपल्या मायदेशात परत जाईल तेव्हा त्याला देशाच्या जमिनीचा वाटा वारसा म्हणून नक्की मिळेल. त्याचप्रमाणे आज आध्यात्मिक देशात यहोवाच्या सगळ्या सेवकांना महत्त्वाचं स्थान आहे. यहोवाच्या संघटनेत आपली भूमिका कितीही लहान असली, तरी प्रत्येकाची सेवा मौल्यवान आहे. यहोवा आपल्या सगळ्या सेवकांवर सारखंच प्रेम करतो.

एकसारखे वाटे

यहेज्केलच्या दृष्टान्तात, देशाच्या जमिनीची वाटणी अशा प्रकारे करण्यात आली होती ज्यामुळे सगळ्या वंशांना देशाच्या सुपीक जमिनीचा आणि मुबलक पाण्याचा एकसारखा फायदा होईल. त्याचप्रमाणे आज यहोवाने आपल्या सगळ्या सेवकांना आध्यात्मिक नंदनवनात राहण्याची आणि त्याचे आशीर्वाद अनुभवण्याची एकसारखी संधी दिली आहे.

अध्याय २०, परिच्छेद ५-११ वर परत जाण्यासाठी