व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १६क

प्राचीन यरुशलेम आजच्या काळातल्या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं का?

प्राचीन यरुशलेम आजच्या काळातल्या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं का?

आधी आपल्या प्रकाशनांमध्ये सांगितलं जायचं, की आजच्या काळातलं ख्रिस्ती धर्मजगत हे आधीच्या धर्मत्यागी यरुशलेमला सूचित करतं. ही गोष्ट खरी आहे की प्राचीन यरुशलेममध्ये मूर्तिपूजा आणि भ्रष्टाचार जसा सर्रासपणे चालायचा, तसाच तो आपल्याला आजच्या ख्रिस्ती धर्मजगतातही पाहायला मिळतो. पूर्वी आपली समज अशी होती, की भविष्यवाण्यांमध्ये दिलेल्या बऱ्‍याच घटना, व्यक्‍ती, ठिकाणं आणि अशा इतर गोष्टी भविष्यात होणाऱ्‍या काही घटनांना किंवा गोष्टींना सूचित करतात. पण हल्लीच्या काळातल्या आपल्या प्रकाशनांमध्ये तशी माहिती दिली जात नाही. फक्‍त ज्या घटनांबद्दल किंवा गोष्टींबद्दल आपल्याला बायबलमधून स्पष्ट पुरावा मिळतो, की त्या भविष्यातल्या एखाद्या गोष्टीला सूचित करतात, त्यांबद्दलचीच माहिती आपल्या प्रकाशनांमध्ये दिली जाते. हे प्रकाशनसुद्धा अशाच पद्धतीने तयार करण्यात आलं आहे. मग यरुशलेम हे आजच्या काळातल्या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं याला बायबलमध्ये काही भक्कम पुरावा आहे का? नाही.

यावर विचार करा: एकेकाळी यरुशलेम शुद्ध उपासनेचं केंद्र होतं. पण नंतर तिथले रहिवासी धर्मत्यागी बनले. याउलट, ख्रिस्ती धर्मजगताने कधीच शुद्ध उपासना केलेली नाही. ख्रिस्ती धर्मजगताच्या सुरुवातीपासून म्हणजे चौथ्या शतकापासूनच ते नेहमी खोट्या शिकवणी शिकवत आहे.

आणखी एक गोष्ट म्हणजे, बाबेलच्या लोकांनी यरुशलेमचा नाश केल्यावर, यहोवाने यरुशलेमला पुन्हा वसवलं आणि आशीर्वाद दिले. त्यानंतर ते शहर पुन्हा शुद्ध उपासनेचं केंद्र बनलं. याउलट, ख्रिस्ती धर्मजगताला देवाने कधीच स्वीकारलं नव्हतं. आणि मोठ्या संकटाच्या वेळी जेव्हा ख्रिस्ती धर्मजगताचा नाश होईल, त्यानंतर ते पुन्हा कधीच अस्तित्वात येणार नाही.

मग या सर्व गोष्टींवरून आपण काय म्हणू शकतो? अविश्‍वासू यरुशलेमवर पूर्ण झालेल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास केल्यावर आपल्याला कदाचित वाटेल, ‘याच गोष्टी तर आपल्याला ख्रिस्ती धर्मजगतात रोज घडताना दिसतात.’ पण, यरुशलेम आजच्या काळातल्या ख्रिस्ती धर्मजगताला सूचित करतं याचा कोणताही भक्कम पुरावा आपल्याला बायबलमध्ये मिळत नाही.

अध्याय १६, परिच्छेद १२, १३ वर परत जाण्यासाठी