व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट ९घ

बंदिवासाबद्दलच्या आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलच्या भविष्यवाण्या

बंदिवासाबद्दलच्या आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याबद्दलच्या भविष्यवाण्या

यहुदी लोक बाबेलच्या बंदिवासात जातील याबद्दलच्या अनेक भविष्यवाण्यांची दुसऱ्‍यांदा मोठ्या प्रमाणात पूर्णता झाली. ख्रिस्ती मंडळी मोठ्या बाबेलच्या बंदिवासात गेली तेव्हा त्या पूर्ण झाल्या. त्यांपैकी काही भविष्यवाण्या पुढे दिल्या आहेत.

१. इशारे

२. बंदिवास

३. शुद्ध उपासना पुन्हा सुरू

पहिली पूर्णता

इ.स.पू. ६०७ च्या आधी—यशया, यिर्मया आणि यहेज्केल देवाच्या लोकांना इशारा देतात; पण तरी धर्मत्याग वाढतच जातो

इ.स.पू. ६०७—यरुशलेमचा नाश होतो; देवाच्या लोकांना बाबेलच्या बंदिवासात नेलं जातं

इ.स.पू. ५३७ आणि तिथून पुढे—काही विश्‍वासू यहुदी यरुशलेमला परत येतात, मंदिर पुन्हा बांधतात आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू करतात

मोठी पूर्णता

पहिलं शतक—येशू, पौल आणि योहान मंडळीला इशारा देतात; पण तरी धर्मत्याग वाढतच जातो

दुसऱ्‍या शतकापासून—खऱ्‍या ख्रिश्‍चनांना मोठ्या बाबेलच्या बंदिवासात नेलं जातं

१९१९ आणि तिथून पुढे—येशूच्या राज्याधिकाराखाली विश्‍वासू अभिषिक्‍त जनांना बंदिवासातून सोडवलं जातं आणि ते शुद्ध उपासना पुन्हा सुरू करतात

अध्याय ९, परिच्छेद ६-११, २५-३२ वर परत जाण्यासाठी