व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १६ख

रडणं व शोक करणं, खूण करणं, चुराडा करणं—केव्हा आणि कसं होईल?

रडणं व शोक करणं, खूण करणं, चुराडा करणं—केव्हा आणि कसं होईल?

यहेज्केलच्या ९ व्या अध्यायात दिलेल्या दृष्टान्ताची आजच्या काळातही पूर्णता होणार आहे. या घटना कोणत्या क्रमाने घडणार आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यामुळे या दुष्ट व्यवस्थेच्या अंताचा आपण खंबीरपणे सामना करू शकू.

‘रडणं आणि शोक करणं’

केव्हा: शेवटच्या दिवसांदरम्यान, मोठ्या संकटाच्या आधी

कसं: चांगल्या मनाचे लोक आज आपल्या वागण्या-बोलण्यातून हे दाखवून देतात, की त्यांना या जगात होणाऱ्‍या दुष्टतेबद्दल मनापासून घृणा वाटते. असे लोक आनंदाचा संदेश स्वीकारतात, ख्रिस्तासारखे गुण स्वतःमध्ये वाढवत राहतात, यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घेतात आणि ख्रिस्ताच्या बांधवांना मनापासून पाठिंबा देतात

‘खूण करणं’

केव्हा: मोठ्या संकटादरम्यान

कसं: सचिवाची दौत असलेला माणूस येशूला सूचित करतो. आणि जेव्हा येशू राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी येईल, तेव्हा तो हे खूण करण्याचं काम करेल. मोठ्या लोकसमुदायाच्या लोकांवर ‘मेंढरं’ म्हणून खूण केली जाईल. यावरून कळतं की ते हर्मगिदोनमधून वाचतील

‘चुराडा करणं’

केव्हा: हर्मगिदोनच्या युद्धामध्ये

कसं: येशू आपल्या स्वर्गातल्या सैन्याचं नेतृत्व करेल. त्यात त्याचे पवित्र स्वर्गदूत आणि १,४४,००० अभिषिक्‍त जन असतील. येशू आणि त्याचं स्वर्गातलं सैन्य या दुष्ट जगाचा पूर्णपणे नाश करेल. आणि ते शुद्ध उपासना करणाऱ्‍या सगळ्यांना नवीन जगात घेऊन जातील

अध्याय १६, परिच्छेद १७-१९ वर परत जाण्यासाठी