व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

चौकट १०ख

‘वाळून गेलेली हाडं’ आणि ‘दोन साक्षीदार’—यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?

‘वाळून गेलेली हाडं’ आणि ‘दोन साक्षीदार’—यांचा एकमेकांशी काय संबंध आहे?

१९१९ या वर्षी दोन भविष्यवाण्या पूर्ण झाल्या; एक ‘वाळलेल्या हाडांबद्दलची’ आणि दुसरी ‘दोन साक्षीदारांबद्दलची.’ या दोन्ही भविष्यवाण्यांचा एकमेकांशी जवळचा संबंध आहे. वाळलेल्या हाडांची भविष्यवाणी एका खूप मोठ्या काळाला (अनेक शतकांच्या काळाला) सूचित करते. या काळाच्या शेवटी देवाच्या लोकांचा एक मोठा गट जिवंत झाला. (यहे. ३७:२-४; प्रकटी. ११:१-३, ७-१३) ‘दोन साक्षीदारांबद्दलची’ भविष्यवाणी एक छोट्या काळाला (१९१४ च्या शेवटापासून ते १९१९ च्या सुरुवातीपर्यंतच्या काळाला) सूचित करते. या काळाच्या शेवटी देवाच्या लोकांचा एक छोटा गट जिवंत झाला. दोन्ही भविष्यवाण्यांमध्ये लाक्षणिक अर्थाने पुन्हा जिवंत होण्याबद्दल सांगितलं आहे. आणि या दोन्ही भविष्यवाण्या १९१९ मध्ये पूर्ण झाल्या. त्या वर्षी यहोवाने त्याच्या अभिषिक्‍त सेवकांना ‘त्यांच्या पायांवर उभं केलं.’ त्याने त्यांना मोठ्या बाबेलच्या बंदिवासातून सोडवलं आणि पुन्हा सुरू झालेल्या ख्रिस्ती मंडळीत एकत्र आणलं.—यहे. ३७:१०.

पण लक्ष द्या, या दोन्ही भविष्यवाण्यांच्या पूर्णतेमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. ‘वाळलेल्या हाडांच्या’ भविष्यवाणीमध्ये पृथ्वीवर उरलेले सगळे अभिषिक्‍त जन लाक्षणिक अर्थाने पुन्हा जिवंत होतील याबद्दल सांगितलं आहे. पण ‘दोन साक्षीदारांच्या’ भविष्यवाणीमध्ये उरलेल्या अभिषिक्‍त जनांमधले काही जण लाक्षणिक अर्थाने जिवंत होण्याबद्दल सांगितलं आहे. त्या वेळी हे अभिषिक्‍त जन संघटनेत पुढाकार घेत होते आणि त्यांना ‘विश्‍वासू आणि बुद्धिमान दास’ म्हणून नेमण्यात आलं होतं.—मत्त. २४:४५; प्रकटी. ११:६. a

‘पूर्णपणे हाडांनी भरलेलं खोरं’​—यहे. ३७:१

  1. इ.स. १०० नंतर

    दुसऱ्‍या शतकापासून अभिषिक्‍त ख्रिस्ती मंडळीची लाक्षणिक रितीने कत्तल करण्यात आली तेव्हा ‘खोरं हाडांनी भरून गेलं’

  2. १९१९ च्या सुरुवातीला

    १९१९: ‘वाळलेली हाडं’ पुन्हा जिवंत झाली. या वर्षी, यहोवाने सगळ्या अभिषिक्‍त जनांची मोठ्या बाबेलमधून सुटका केली आणि त्यांना पुन्हा सुरू झालेल्या ख्रिस्ती मंडळीत एकत्र आणलं

‘दोन साक्षीदार’​—प्रकटी. ११:३

  1. १९१४ च्या शेवटी

    “गोणपाट घालून” प्रचार

    १९१४: ‘दोन साक्षीदारांनी’ साडेतीन वर्षं “गोणपाट घालून” प्रचार केला. या काळाच्या शेवटी त्यांची लाक्षणिक रितीने कत्तल करण्यात आली

  2. लाक्षणिक मृत्यू

  3. १९१९ च्या सुरुवातीला

    १९१९: ‘दोन साक्षीदार’ जिवंत झाले. या वर्षी, संघटनेत पुढाकार घेणाऱ्‍या बांधवांच्या एका लहान गटाला “विश्‍वासू आणि बुद्धिमान दास” म्हणून नेमण्यात आलं

अध्याय १०, परिच्छेद ९, १४ वर परत जाण्यासाठी

a टेहळणी बुरूज मार्च २०१६ यातलं “वाचकांचे प्रश्‍न” पाहा.