व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग दोन

‘तू माझं मंदिर अशुद्ध केलंस’—शुद्ध उपासना भ्रष्ट झाली

‘तू माझं मंदिर अशुद्ध केलंस’—शुद्ध उपासना भ्रष्ट झाली

यहेज्केल ५:११

भाग कशाबद्दल आहे: यहूदा आणि यरुशलेमच्या लोकांची उपासना भ्रष्ट होते आणि त्यांची नैतिकता खालच्या थराला जाते

यहोवाचं इस्राएली लोकांवर प्रेम होतं आणि तो त्यांची काळजी घ्यायचा. तो त्यांना “मौल्यवान संपत्ती” समजायचा. (निर्ग. १९:५, तळटीप) पण इस्राएली लोकांनी काय केलं? जे मंदिर खरंतर यहोवाचं होतं तिथेच ते खोट्या दैवतांची उपासना करू लागले! असं करून त्यांनी यहोवाचं मन दुखावलं आणि त्याच्या नावाची बदनामी केली. पण इस्राएली लोक इतक्या खालच्या थराला कसे गेले? यहेज्केलने यरुशलेमच्या नाशाबद्दल केलेल्या भविष्यवाणीतून आपण काय शिकू शकतो? आणि इस्राएली लोकांनी आजूबाजूच्या राष्ट्रांसोबत जे संबंध ठेवले त्यातून आपण कोणते धडे घेऊ शकतो? या प्रश्‍नांची उत्तरं आपल्याला या भागातून मिळतील.

या विभागात

अध्याय ५

“लोक किती वाईट आणि घृणास्पद कामं करत आहेत ते बघ”

यहेज्केलला दृष्टान्तात मंदिरात होणाऱ्‍या गोष्टी दाखवल्या जातात. त्याला चार धक्कादायक दृश्‍यं दिसतात. त्यावरून राष्ट्राची उपासना किती भ्रष्ट झाली आहे ते दिसून येतं.

अध्याय ६

“तुमचा अंत जवळ आलाय”

यहोवा यरुशलेमला शिक्षा कशी करेल याबद्दलची भविष्यवाणी यहेज्केलने अभिनयाच्या स्वरूपात करून दाखवली.

अध्याय ७

राष्ट्रांना “कळून येईल की मी यहोवा आहे”

ज्या राष्ट्रांनी यहोवाच्या नावाची बदनामी केली त्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावेच लागले. इस्राएली लोकांनी त्या राष्ट्रांसोबत जे संबंध ठेवले त्यातून आपण कोणते धडे घेऊ शकतो?