भाग तीन
‘मी तुम्हाला गोळा करीन’—शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याचं वचन
भाग कशाबद्दल आहे: शुद्ध उपासना पुन्हा कशी सुरू होईल हे यहेज्केलच्या भविष्यवाण्यांमध्ये सांगितलं आहे
धर्मत्याग केल्यामुळे इस्राएल राष्ट्र विभाजित झालं आहे. त्या राष्ट्रात एकी राहिली नाही. त्या राष्ट्राने शुद्ध उपासना भ्रष्ट केली आणि देवाच्या नावाची बदनामी केली. याचेच वाईट परिणाम ते भोगत आहेत. पण अशा वाईट काळात यहोवा यहेज्केलला एकापाठोपाठ एक अनेक भविष्यवाण्या करायला सांगतो. त्यांमुळे लोकांना आशा मिळते. यहोवा त्या भविष्यवाण्यांमध्ये लक्ष वेधून घेणाऱ्या शब्दचित्रांचा आणि विस्मयकारक दृष्टान्तांचा वापर करतो. यामुळे बंदिवासात असलेल्या इस्राएली लोकांना आणि शुद्ध उपासना पुन्हा सुरू होण्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या सगळ्यांनाच खूप प्रोत्साहन मिळतं.
या विभागात
अध्याय ८
“मी एक मेंढपाळ नेमीन”
देवाने यहेज्केलला मसीहाबद्दल भविष्यवाण्या लिहिण्याची प्रेरणा दिली. भविष्यात येणारा यहोवाच्या लोकांचा हा राजा आणि मेंढपाळ शुद्ध उपासना पुन्हा कायमसाठी सुरू करेल.
अध्याय ९
“मी त्या सगळ्यांचं हृदय एक करीन”
बाबेलच्या बंदिवासात असलेल्या विश्वासू यहुद्यांना दिलेल्या भविष्यवाण्या आज आपल्यासाठीही महत्त्वाच्या आहेत का?
अध्याय १०
“तुम्ही परत जिवंत व्हाल”
यहेज्केल दृष्टान्तात खडखडीत वाळून गेलेल्या हाडांनी भरलेलं एक खोरं पाहतो. या दृष्टान्ताचा काय अर्थ होतो?
अध्याय ११
‘मी तुला पहारेकरी म्हणून नेमलंय’
पहारेकऱ्याची भूमिका आणि त्याच्या जबाबदाऱ्या काय आहेत? त्याला कोणत्या गोष्टीबद्दल इशारा द्यायचा आहे?
अध्याय १४
“हाच मंदिराचा कायदा आहे”
यहेज्केलने पाहिलेल्या मंदिराच्या दृष्टान्तातून बंदिवासातल्या यहुद्यांनी कोणते व्यावहारिक धडे घेतले असतील? या दृष्टान्तातून आज आपल्याला शुद्ध उपासनेबद्दल काय शिकायला मिळतं?