व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाग ६

यहोवाने आपल्याला का निर्माण केले?

यहोवाने आपल्याला का निर्माण केले?

जीवनाच्या उद्देशाविषयी शलमोन राजाने चिंतन केले

 यहोवाला जाणून घेतल्यामुळे तुमच्या जीवनावर काय परिणाम होईल? तुम्हाला अशा एका प्रश्‍नाचे उत्तर मिळेल ज्याने पुष्कळांना बुचकळ्यात पाडले आहे: ‘माझ्या जीवनाचा काय उद्देश आहे?’ याविषयी तुम्हीही कधी न कधी विचार केलाच असेल. आपल्या काळातील “सर्व राजांहून श्रेष्ठ” असणाऱ्‍या एका बुद्धिमान राजाने देखील जीवनाच्या उद्देशाविषयी बरेच चिंतन केले. (२ इतिहास ९:२२; उपदेशक २:१-१३) तो राजा म्हणजे शलमोन. तो खूप शक्‍तिशाली आणि अत्यंत धनाढ्य होता, तसेच त्याच्याजवळ अतुलनीय बुद्धिमत्ता होती. मग त्याच्या चिंतनातून कोणता निष्कर्ष निघाला? त्याने म्हटले, “सर्व काही तुम्ही ऐकले; सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ; मनुष्यकर्तव्य काय ते एवढेच आहे.” (उपदेशक १२:१३) शलमोनाला बहुतेक लोकांपेक्षा जीवनात अधिक अनुभव होता त्यामुळे त्याचा हा निष्कर्ष निदान विचारात घेण्याजोगा निश्‍चितच आहे.—उपदेशक २:१२.

शलमोनाने जे भय बाळगण्याचा सल्ला दिला ते कोणा अज्ञात आत्मिक शक्‍तीविषयी वाटणारे, थरकाप उडवणारे भय नाही. उलट ज्याच्यावर तुमचे मनापासून प्रेम आहे त्याला न आवडणारी कोणतीही कृती करण्याचे हे सकारात्मक भय आहे. साहजिकच ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे त्याला संतुष्ट करण्याचाच तुम्ही सदैव प्रयत्न कराल आणि त्याला आवडणार नाही अशी कोणतीही कृती करण्याचे तुम्ही टाळाल. जसजसे तुम्ही यहोवावर प्रेम करू लागाल तसतसे तुम्हाला त्याच्याविषयीही असेच वाटू लागेल.

बायबलचे वाचन करण्याद्वारे तुम्ही आपल्या निर्माणकर्त्याला काय आवडते आणि काय आवडत नाही याबद्दल, तसेच ही पृथ्वी निर्माण करण्यामागच्या त्याच्या उद्देशाविषयीही जाणून घेऊ शकता. “पृथ्वीचा घडणारा व कर्ता” असे यहोवाचे वर्णन करण्यासोबतच बायबल असेही सांगते की “त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही, तर तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” (यशया ४५:१८) यहोवाने माणसांना राहण्याकरता ही पृथ्वी तयार केली आणि त्यांना पृथ्वीची आणि पृथ्वीवर राहणाऱ्‍या सर्व प्राणीमात्रांची निगा राखण्याची आज्ञा दिली. (उत्पत्ति १:२८) पण मानवांना निर्माण करण्याचा यहोवाचा केवळ हाच उद्देश होता का—की त्यांनी पृथ्वीची देखरेख करावी?

आदाम आणि हव्वा यांचा देवासोबत अर्थपूर्ण नातेसंबंध होता

नाही, यहोवाच्या मनात याहीपेक्षा एक श्रेष्ठ उद्देश होता. पहिला मनुष्य आदाम याचा यहोवासोबत एक अर्थपूर्ण नातेसंबंध होता. तो आपल्या निर्माणकर्त्यासोबत थेटपणे संवाद करू शकत होता. देव जे काही सांगेल ते तो ऐकायचा आणि आपल्या भावना देखील यहोवाला सांगायचा. (उत्पत्ति १:२८-३०; ३:८-१३, १६-१९; प्रेषितांची कृत्ये १७:२६-२८) त्यामुळे आदाम आणि त्याची पत्नी हव्वा यांना यहोवाला अधिक चांगल्याप्रकारे जाणून घेण्याची आणि त्याच्यासोबत अधिक घनिष्ट नातेसंबंध विकसित करण्याची सुसंधी होती. यहोवाला जाणून घेऊन त्याच्या गुणांचे अनुकरण केल्यामुळे त्यांचे जीवन निश्‍चितच अधिक समाधानी बनले असते कारण यहोवा एक ‘आनंदी देव’ आहे. (१ तीमथ्य १:११, NW) ‘आपल्या उपभोगासाठी सर्व काही विपुल देणाऱ्‍या’ परमेश्‍वर यहोवाने पहिल्या मनुष्याला एदेन बाग म्हटलेल्या एका रम्य परादिसात ठेवले आणि त्याला सर्वकाळ जगण्याची आशा देऊ केली.—१ तीमथ्य ६:१७; उत्पत्ति २:८, ९, १६, १७.

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा) मानवी कोशिकांसंबंधी अलीकडील शोध काय दाखवतात?

सर्वकाळ? सार्वकालिक जीवनाची कल्पना तर्कहीन आहे असे कदाचित तुम्ही म्हणाल; पण हे खरे आहे का? वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की कोशिका जुन्या का होतात हे आता त्यांना समजले आहे. प्रत्येकवेळी कोशिकांचे विभाजन होते तेव्हा गुणसूत्रांच्या टोकांजवळ असलेले अंत्यखंड नावाचे जननिक पदार्थ दर वेळी थोडे छोटे होतात. कोशिकेचे ५० ते १०० वेळा विभाजन झाल्यानंतर हे अंत्यखंड जुने होतात आणि बहुतेक कोशिकांचे यानंतर विभाजन होण्याचे थांबते. पण अलीकडील वैज्ञानिक शोधांवरून असे दिसते की टीलोमरेझ नावाच्या एका एन्झाइमच्या साहाय्याने मानवांच्या शरीरातील कोशिकांचे विभाजन अनिश्‍चित काळापर्यंत सुरू राहू शकते. अर्थात, यहोवा देव या एन्झायमच्या साहाय्याने सार्वकालिक जीवन मानवांना देतो असा या शोधाचा अर्थ होत नाही, पण एक गोष्ट मात्र यावरून निश्‍चितच सूचित होते: सार्वकालिक जीवनाची कल्पना तर्कहीन नाही!

होय, पहिल्या मानवी जोडप्याला सर्वकाळ जगण्यासाठी बनवण्यात आले होते असे दाखवणारा बायबलमधील अहवाल विश्‍वास ठेवण्याजोगा आहे. मानवांनी सर्वकाळ यहोवासोबतचा आपला नातेसंबंध विकसित करत जावे असा देवाचा उद्देश होता. पृथ्वीवरील मानवांकरता आपल्या स्वर्गीय पित्याचा उद्देश जाणून तो पूर्ण करण्याद्वारे त्यांनी त्याच्यासोबत एक घनिष्ट बंधन जोडायचे होते. त्यांना जीवनात काबाडकष्ट करावे लागणार नव्हते. आदाम व हव्वा यांच्यासमोर सबंध पृथ्वी आपल्या आनंदी व परिपूर्ण संततीने भरण्याची अद्‌भुत आशा होती. त्यांच्याजवळ सर्वकाळ समाधान देणारे आणि अर्थपूर्ण कार्य असणार होते. त्यांचे जीवन खऱ्‍या अर्थाने समाधानी असते!—उत्पत्ति १:२८.